अर्थ नियोजकाने गुंतवणूकदाराच्या जोखीम घेण्याच्या क्षमतेचे मापन करणे हे डॉक्टरने औषध देण्यापूर्वी रुग्णाचे ब्लडप्रेशर तपासण्यासारखेच..

वित्तप्रवाह विश्लेषण करून बचतवृद्धी कशी करता येईल हे मागील लेखात आपण पहिले. यानंतर गुंतवणुकीला सुरुवात केली जाऊ शकते. गुंतवणूक करताना ध्येय गाठण्यासाठी लागणाऱ्या कालावधीवरून हे ठरवता येते की ही गुंतवणूक दीर्घ कालावधीसाठी करावी लागणार आहे अथवा अल्प कालावधीसाठी व त्याप्रमाणे गुंतवणूक पर्याय निवडणे सोपे जाते.

ढोबळमानाने कधी कधी शेअर बाजारात गुंतवणूक करताना असा समज असतो की, आपण तरुण आहोत, आपली मिळकत जास्त आहे त्यामुळे आपली जोखीम घेण्याची क्षमता अधिक आहे, व आपण शेअर बाजारात होणारे चढउतार सहन करू शकतो. परंतु जेव्हा शेअर बाजाराचा निर्देशांक खाली घसरण्यास सुरुवात होते तेव्हा आपल्या गुंतवणुकीत दिसणारा तोटा आपल्याला अस्वस्थ करू शकतो.

काहींच्या बाबतीत त्याची गुंतवणूक ही फक्त सुरक्षित पर्यायांमध्ये होत असते. असे गृहीत धरून की त्यांची जोखीम घेण्याची क्षमता ही कमी आहे व शेअर बाजारातील चढउतार आपण सहन करू शकणार नाही. अशा समजांमुळे केली गेलेली गुंतवणूक ही योग्य परतावा देऊ शकत नाही, ध्येयाची पूर्तता करण्यासाठी लागणारी रक्कम योग्य वेळी उपलब्ध करवून देऊ शकेल याची शाश्वती नाही. महत्त्वाचे म्हणजे होणारी गुंतवणूक योग्य प्रकारे वेगवेगळ्या पर्यायांमध्ये (अ‍ॅसेट अलोकेशन) केली जात नाही.

प्रत्येक गुंतवणूक पर्यायांबरोबर येणारी जोखीम ही वेगवेगळी असते, तसेच प्रत्येक व्यक्तीची जोखीम घेण्याची क्षमता (रिस्क प्रोफायिलग) हीदेखील वेगवेगळी असते. त्यामुळे अर्थ नियोजक गुंतवणूक पर्यायांबाबत योग्य तो सल्ला देण्यापूर्वी तुमची जोखीम घेण्याची क्षमता पडताळून पाहतात. तुमच्या क्षमतेमध्ये बसेल असे गुंतवणूक पर्याय त्यामुळे ते सुचवू शकतात. सेबी मान्यताप्राप्त नियोजक सल्लागारांसाठी तर ते क्रमप्राप्तच आहे.

जोखीम घेण्याची क्षमता (रिस्क प्रोफायिलग) म्हणजे काय तर, गुंतवणूक पर्यायांबरोबर त्याच्यामधून येणाऱ्या परताव्यासंबंधीची अनिश्चितता पचविण्याची आपली क्षमता. म्हणजेच प्रत्येक गुंतवणुकीसोबत येणारी नफा किंवा तोटा पचवायची क्षमता. ही क्षमता प्रत्येक व्यक्तीगणिक निरनिराळी असते.

व्यक्तिगणिक जोखीम पेलण्याची क्षमता वेगवेगळी असण्यामागे कारणेही आहेत. जसे जोखीम घेण्याची मानसिक कुवत, त्या विषयाची समज, पूर्वी केलेल्या गुंतवणुकीतून आलेले अनुभव, आपल्यावर असणाऱ्या जबाबदाऱ्या, आपल्या मिळकतीवर अवलंबून असणाऱ्या आपल्या कुटुंबातील व्यक्तीची संख्या वगरे.

जोखीम घेण्याच्या क्षमतेचे मापन करण्यासाठी काही मानसशात्रीय चाचण्या (Psychometric test) उपलब्ध आहेत. या चाचण्यांमध्ये आपल्याला १५ ते २५ प्रश्नांची उत्तरे देणे अपेक्षित असते. या प्रश्नाचे स्वरूप साधारणपणे वरील नमूद केलेल्या जोखीम घेण्याच्या क्षमतेच्या निरनिराळ्या कारणांची पडताळणी करणारे असते.

ही चाचणी दिल्यानंतर त्यातून एक निर्देशांक बाहेर येतो. जो त्या व्यक्तीच्या जोखीम घेण्याच्या क्षमतेची वर्गवारी दर्शवितो. यावरून तुमच्या अर्थ नियोजकाला कल्पना येते की तुमच्या जोखीम घेण्याच्या क्षमतेप्रमाणे तुमच्यासाठी कोणते गुंतवणूक पर्याय योग्य आहेत. अर्थ नियोजकाने जोखीम घेण्याच्या क्षमतेचे मापन करणे हे डॉक्टरने औषध देण्यापूर्वी तुमचे ब्लडप्रेशर तपासून पाहण्यासारखेच आहे.

आíथक नियोजनाच्या यापुढील टप्प्यांत आपण ध्येयपूर्ततेसाठी गुंतवणुकीच्या वेगवेगळ्या पर्यायांचा विचार करणार आहोत. यासाठी वर नमूद केल्याप्रमाणे तुमच्या जोखीम घेण्याच्या क्षमतेप्रमाणे गुंतवणूक योग्य प्रकारे वेगवेगळ्या पर्यायांमध्ये (अ‍ॅसेट अलोकेशन) कशा प्रकारे करावी हे आपण पुढील लेखात पाहू.
Untitled-6

kiranhake@fingenie.co.in

लेखक आíथक नियोजनातील उाढ उट पात्रताधारक व सेबी मान्यताप्राप्त गुंतवणूक सल्लागार.

कर्ते म्युच्युअल फंड 

हे नियमित सदर तांत्रिक कारणामुळे आज देता आले नाही, पुढील सोमवारी ते नेहमीप्रमाणे प्रसिद्ध होईल.