अलीकडेच एका मोठय़ा संस्थेने त्याबाबत सव्र्हे केला आहे. त्यांच्या अहवालानुसार ४५ वर्षांच्या वयावरील ३०,००० व्यक्तींपकी सुमारे ५४ टक्के लोक वाढत्या वैद्यकीय खर्चाबाबतच्या काळजीत असतात. आणि त्या काळजीमुळे आजारपणाची शक्यता वाढते.
गरज काय?
तज्ज्ञांच्या मते मोठय़ा शहरांमध्ये राहणाऱ्यांसाठी १० लाख रु. आणि इतर शहरवासीयांसाठी ७.५० लाख रुपयांचे फॅमिली फ्लोटर प्रकारातले स्वास्थ्य विम्याचे छत्र असणे आवश्यक आहे.
अडसर कोणता? अनेक पगारदारांना ते जेथे काम करतात त्या कंपन्यांकडून मेडिकल कव्हर मिळते. परंतु बऱ्याचदा ते कमी असते. नोकरी बदलल्यावर किंवा निवृत्तीनंतर ते बंद होते. खरे तर त्यावेळेस त्याची जास्त गरज असते.
अडसर कोणता?
विमा इच्छुकांना या प्रकारच्या विमाछत्राचे महत्त्व पटवून देण्याची गरजही नसते. परंतु स्वास्थ्य विमा कंपन्या, हॉस्पिटलचा खर्च आणि त्रयस्थ पक्ष व्यवस्थेमुळे (Third Party Administration- TPA) त्यांच्या मनात या प्रकाराबद्दल एक प्रकारची अढी निर्माण झालेली असते. ही धास्ती दूर करणे हा विमा कंपन्या आणि विक्रेते याच्या बाबतीतला एक मोठा अडसर आहे.
सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे हॉस्पिटल आणि थर्ड पार्टी अॅडमिनिस्ट्रेशनच्या (टीपीए) बाबतीतील वाईट अनुभव येऊनही अनेक जण दरवर्षी प्रीमियमचा हप्ता देतच असतात. क्लेमच्या बाबतीत वाईट अनुभव आला तरी पॉलिसी चालूच ठेवतात. एकंदर खर्चाचा मोठा हिस्सा परत मिळतो यावर ते खूश असतात. परंतु कुंपणावरील विमाइच्छुक अशा प्रकारची पॉलिसी काढायला धजावत नाहीत.