majha-portfolio321बंगलोरस्थित सोनाटा सॉफ्टवेअर लिमिटेड ही माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील विविध सेवा पुरवणारी एक लहान भारतीय कंपनी. मायक्रोसॉफ्ट, ओरॅकल, आयबीएम, एचपी इ. मोठय़ा कंपन्यांच्या सहकार्याने आणि भागीदारीने गेल्या काही वर्षांत सोनाटाने चांगलीच भरारी मारली आहे. शून्य कर्ज असलेल्या या कंपनीने आपल्या जावा, नेट, क्लाऊड, मोबिलिटी अशा विविध सेवांचे जाळे युरोप आणि आखाती देशांखेरीज अमेरिका आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही खंडात वेगात पसरवले आहे. अशाच अनेक सेवा विस्तृत करण्यासाठी अमेरिकेत रेड्मोंड येथे विकसन सेवा केंद्र av-04उघडले आहे. गेल्या दोन वर्षांत कंपनीने आपल्या संघरचनेमध्ये आणि व्यवस्थापनात आमूलाग्र बदल केले त्याचा सकारात्मक परिणाम आता दिसू लागला आहे. सध्या आंतरराष्ट्रीय कामगिरीत वार्षकि ३६% वाढ दाखवणाऱ्या या कंपनीकडून पुढील दोन वर्षांत भरीव कामगिरी अपेक्षित आहे. अजूनही डॉलरच्या तुलनेत रुपयाची किंमत तितकीशी चांगली नाही. त्यामुळेच आपली सेवा निर्यात करणाऱ्या या माहिती तंत्रज्ञान कंपनीचे भविष्य उज्ज्वल वाटते.
३० सप्टेंबर २०१४ अखेर समाप्त तिमाहीसाठी जाहीर झालेल्या आíथक निष्कर्षांप्रमाणे यंदाच्या तिमाहीत कंपनीच्या उलाढालीत ३७% वाढ होऊन ती ११४.६ कोटी रुपयांवर गेली आहे, तर नक्त नफ्यात तब्बल २१३% वाढ होऊन तो गत वर्षीच्या कालावधीच्या तुलनेत ९.०९ कोटीवरून २८.४९ कोटींवर गेला आहे. सध्या १३५ रुपयांच्या आसपास असलेला हा शेअर मध्यम ते दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी खरेदी करा / राखून ठेवा.