डिसेंबर महिन्याचे अतिथी विश्लेषक मनिष दवे हे चंपकलाल इन्व्हेस्टमेंट्स या दलाली पेढीत मिडकॅप विश्लेषक आहेत. ते सनदी लेखपाल असून त्यांना समभाग संशोधन व समभाग गुंतवणूक व्यवस्थापनाचा आठ वर्षांचा अनुभव आहे.
(बीएसई कोड – ५३३६५५)
” १0२.६५
वार्षिक उच्चांक/नीचांक :
” १२६ / ” ९५
दर्शनी मूल्य : ” १
 पी/ई : १६.७०

त्रिवेणी टर्बाइन्स लिमिटेड (त्रिवेणी) ही कंपनी मिडकॅप भांडवली वस्तू उत्पादक या गटात मोडते. या कंपनीचे स्टीम टर्बाइन, बॅक प्रेशर स्टीम टर्बाइन व कंडेिन्सग स्टीम टर्बाइन ही प्रमुख उत्पादने आहेत. ही उत्पादने वीजनिर्मिती व सहवीजनिर्मिती प्रकल्पांत वापरली जातात. या व्यतिरिक्त टर्बाइनची उभारणी, निगराणी, सुटय़ा भागांचे उत्पादन (ओईएम) या विक्रीपश्चात सेवा कंपनी पुरवते. भारताव्यतिरिक्त कंपनी आपली उत्पादने व सेवा आशिया, युरोप, अमेरिका आफ्रिका खंडांतील ४० देशांत पुरवते. देशातील ३० मेगावॅटपर्यंतच्या वीज उत्पादन गटात कंपनीचा बाजारपेठेतील वाटा ६५ टक्के आहे. कंपनीच्या उत्पन्नात विक्रीपश्चात सेवेतून मिळणाऱ्या महसुलाचा वाटा २६ टक्के आहे. देशातील बदलत्या आíथक वातावरणाचा लाभ घेत कंपनीने मागणीत (ऑर्डर बुक) सद्य आíथक वर्षांच्या पहिल्या तिमाहीत ४५ टक्के इतकी घसघशीत वाढ नोंदविली आहे. कंपनीची स्थापना जागतिक ऊर्जा बाजारपेठेत ऊर्जा यंत्रसामग्रीचे प्रमुख उत्पादक असलेल्या जनरल इलेक्ट्रिकल (जीई) समवेतचा संयुक्त प्रकल्प म्हणून झाली. प्रामुख्याने ३० ते १०० मेगावॅटपर्यंतच्या ऊर्जानिर्मितीसाठी लागणाऱ्या टर्बाइनचे उत्पादक म्हणून तिचे कार्यान्वयन झाले. विद्यमान आर्थिक वर्ष २०१४-१५ मध्ये कंपनीने आपल्या विविध व्यवसायांतून मिळणाऱ्या उत्पन्नाचे प्रमाण (Revenue Mix) बदलल्यामुळे कंपनीच्या नफाक्षमतेत मोठी वाढ संभवत आहे. कंपनीकडे निर्यातीसाठी असलेल्या स्टीम टर्बाइनची मोठी मागणी या वर्षी पुरी होईल. तसेच याच्या अनुषंगाने विक्रीपश्चात सेवेच्या महसुलात वाढ झाल्यामुळे घसारा, व्याज व करपूर्व नफ्याची टक्केवारी २२-२३ टक्क्यांदरम्यान असेल. कंपनीवर कर्ज जवळजवळ नसल्याने व खेळत्या भांडवलाच्या कार्यक्षम वापरामुळे भांडवलावरील परताव्याचा दर ५० टक्क्यांदरम्यान असेल.
मूल्यांकन : सध्या कंपनीच्या बाजारभावाचे उत्सर्जनाशी (ईपीएस) प्रमाण १६ पट आहे. हे प्रमाण कंपनीच्या जवळच्या प्रतिस्पर्धी असलेल्या थरमॅक्सपेक्षा ४० टक्के कमी आहे. १८ महिन्यांच्या कालावधीत १३५ रुपयांचे लक्ष्य निश्चित करून आम्ही खरेदी करण्याची शिफारस करीत आहोत.