abhyas-vargमोठय़ा संख्येने गुंतवणूकदारांच्या निधीचे पाठबळ असलेले संस्थागत गुंतवणूकदार म्हणजे बाजारातील प्रबळ मंडळी.. ही मंडळी विविध डावपेचांचा वापर करून बाजार वर-खाली हेलकावे देत असतात आणि त्याने व्यथित होणाऱ्या छोटय़ा व्यक्तिगत गुंतवणूकदारांचा बऱ्याचदा बळी जात असतो. पण यांच्या या हुलकावण्यांना समर्थपणे सामोरे जाता येईल, यासाठी उपलब्ध असलेल्या अनेक डावपेचांपकी एक म्हणजे ‘स्प्रेड्स’चा (spreads), त्याचाच हा वेध..
मागील काही अभ्यास वर्गामध्ये आपण पुट खरेदी आणि विक्रीबाबतच्या नियमांचा सविस्तर अभ्यास केला. आजच्या व यापुढील अभ्यास वर्गामध्ये आपण खरेदी-विक्रीच्या एकत्रित अशा विविध डावपेचांचा अभ्यास करणार आहोत.
प्रबळ मंडळी जसे विदेशी संस्थागत गुंतवणूकदार- एफआयआय, देशी संस्थांगत गुंतवणूकदार- डीआयआय, म्युच्युअल फंड्स, ऑपरेटर्स यांना सर्वसामान्य लोकांची तोटा सहन करण्याची व धोका पत्करण्याची क्षमता खूप कमी असते, याची पुरेपूर जाणीव असते. त्यामुळे बाजाराला थोडेफार जरी वर खाली केले तरी सर्वसामान्य लोकांना तोटा सहन करून बाहेर पडावे लागते. अशावेळी जर आपण विविध डावपेचांचा वापर करून या प्रबळ लोकांच्या हुलकावणीला समर्थपणे सामोरे जावू शकतो. यासाठी उपलब्ध असलेल्या अनेक डावपेचांपकी ‘स्प्रेड्स’चा (spreads) आज अभ्यास करू.
av-02
स्प्रेड म्हणजे धोका (Risk) वितरीत करणे अर्थात धोका प्रसारीत करणे होय. स्प्रेड हे असे डावपेच आहेत की ज्यामध्ये संभाव्य तोटा म्हणजेच धोका वितरीत किंवा प्रसारित करता येतो. म्हणजे मला नफा कमी झाला तरी चालेल पण माझा तोटा माझ्या क्षमतेच्या आत असला पाहिजे. स्प्रेड घेणे म्हणजे एखाद्या शेअर्सच्या विकल्प साखळीतील कोणत्या तरी एका स्ट्राईकचा कॉल किवा पुट विकत घेणे आणि त्याच शेअर्सच्या विकल्प साखळीतील दुसऱ्या कोणत्या तरी एका स्ट्राईकचा कॉल किवा पुट विकणे.
खूप वेळा निर्देशांक / शेअर्स वर जाईल किवा खाली जाईल हे कळत नाही. तिथी क्षय अर्थात टाईम डिकेमुळे प्रिमिअमचा दिवसागणिक ऱ्हास होतो व खरेदीदारांना नुकसान होते. पण अस्थिरता (volatility) वाढल्यास फायदा होतो व विक्रेत्यांना त्याच गोष्टीचा फायदा होतो. पण अस्थिरता वाढल्यास नुकसान होते. या सगळया गोष्टीचा विचार करता मला कमी लाभ झाला तरी चालेल पण माझे कॅपिटल / गुंतवणूक मुद्दल सुरक्षित राहावी असा विचार हा योग्य विचार आहे असे माझे प्रांजळ मत आहे.
अनेक डावपेचांपकी निवडक डावपेच खालील प्रमाणे दिलेले आहेत.
तेजीचा स्प्रेड
(बुल स्प्रेड ऑफ कॉल्स)
माझा दृष्टीकोन हा जर लतेजीचा आहे, परंतु मला धोका पत्करायचा नसल्याने व बाजारातील मोठय़ा मंडळींचे सावज बनण्यापासून सुरक्षित राहावयाचे असल्याने, कॉलचा तेजीचा स्प्रेड असा समयी आपण घेऊ शकतो.
आजच्या उदाहरणात आपण कॉलचा वापर करणार असल्याने त्या स्प्रेडला कॉलच्या तेजीचा स्प्रेड (बुल स्प्रेड ऑफ कॉल्स) म्हणू आणि या स्प्रेडमध्ये मिळकतीपेक्षा खर्च जास्त असल्याने हा डेबिट स्प्रेड आहे.   
तेजीचा स्प्रेड (बुल स्प्रेड ऑफ कॉल्स): जेव्हा एखादा शेअर वर जात आहे आणि वरच्या विशिष्ट पातळीपर्यंत जाऊ शकतो, अशी खात्रीही आहे. परंतु त्या विशिष्ट पातळीच्या आणखी वर जाणार नाही असे वाटत असेल तर आताच्या बाजार भावाजवळचा (ATM) स्ट्राईकचा कॉल खरेदी करावा आणि वरच्या पातळीवरचा कॉल (OTM) विकावा.
फायदे काय?
या डावपेचामध्ये खालील फायदे असतात. खरेदी करताना द्यावा लागणारा प्रिमियम व विकलेल्या ऑप्शन्सच्या मिळालेल्या प्रिमियममुळे एकंदरीत खर्च कमी होतो. खरेदी व विक्री केलेल्या ऑप्शन्ससाठी ग्रीक्स जसे डेल्टा, वेगा, थीटा आदींचा परिणाम परस्पर विरोधी असल्याने एकंदरीत परिणाम नगण्य होतो. परंतु १००% शून्य होत नाही. कारण मनिनेसनुसार प्रत्येक स्ट्राईकचे ग्रीकचे मूल्य कमी जास्त होत असते. बाजारातल्या मोठय़ा लोकांना तुम्हाला ट्रेड मधून बाहेर पाडणे शक्य होत नाही. हा ट्रेड एक्सपायरी (Expiry)च्या शेवटपर्यंत ठेऊ शकता.
नफा : जास्तीत जास्त दोन स्ट्राईकमधला फरक वजा एकंदर खर्च. कारण खरेदी केलेले ऑप्शन्स अमर्याद नफा देतील. पण वरच्या स्ट्राईकच्या पुढे विकलेला स्ट्राईक अमर्याद तोटा देईल.
तोटा : जास्तीत जास्त एकंदर खर्च. (दिलेला प्रिमिअम वजा घेतलेला प्रिमिअम)
केव्हा घ्यावे?
 बाजार तेजीचा / बुलिश आहे व विकलेल्या स्ट्राईकपर्यंत जाईल असे वाटत असल्यास.
केव्हा बाहेर पडावे?
बाजारामध्ये मंदी / बेअरिशनेस दाखवल्यास व तशी खात्री झाली असल्यास तात्काळ बाहेर पडावे. तसेच फायदा होत असल्यास फायदा घेऊन अथवा तोटा बुक (किमान ठेऊन) करून बाहेर पडावे. किवा वरच्या स्ट्राईकपर्यंत आल्यास किवा अगोदरच ठरवलेला तोटा किंवा फायदा झाल्यास बाहेर पडावे.
उदाहरणार्थ : मी २७ मार्च २०१५ रोजी आयडिया या शेअरचा अभ्यास केला असता तांत्रिक दृष्टीकोनातून मला असे दिसते की, उच्चतम किंमतीवर आल्यानंतर त्या शेअरमध्ये नफावसुली होऊन आता तो शेअर १७१ या स्तरावर आला आहे व त्यामुळे तेजी आहे. परंतु मला कोणताही धोका घ्यावयाचा नसल्याने मी आयडियामधील कॉलचा बुल स्प्रेड घेण्याचा विचार केला.
मी डेल्टा, थीटा, गॅमा, वेगा इत्यादीचा अभ्यास केला व नजीकच्या काळात आणखी तो १८५ च्या वर जाणार नाही याचा अंदाज घेऊन मी १८५ च्या स्ट्राईकचा कॉल विकण्याचा निर्णय घेतला व एटीएम कॉल १७०ची खरेदी केली.
वरील उदाहरणात आपणास समजले असेल की, जर बाजार वर जाईल असा विचार केल्याने नग्न कॉल (Naked Call) खरेदी केला असता मला १७,९०० रुपये एवढय़ा तोटय़ाच्या भीतीखाली राहावे लागले असते. परंतु या स्प्रेडमध्ये मला प्रत्येक दिवसागणिक होणारे नुकसान अत्यल्प आहे आणि आयडियाचे भाव नजीकच्या काळात खाली गेले तरी माझे फार नुकसान होत नाही. त्यामुळे मला घाबरण्याचे कारण नाही. फक्त माझा दृष्टीकोन एक्सपायरी पर्यंत खरा ठरून आयडीयाचा भाव वर गेला की मला नफा होईल.
प्रत्येकाची तांत्रिक विश्लेषण करण्याची पद्धत वेगळी असल्याने प्रत्येकाने शेअर्सचे भाव वर गेल्यास जास्तीत जास्त किती वर जाईल यांचा अभ्यास करून तो कॉल विकावा.
दक्षता कोणती?
 खालील महत्त्वाचे नियम वाचकांनी लक्ष्यात घ्यावे-
१) दिशा मंदीची वाटत असल्यास हा स्प्रेड घेवू नये.
२) नुकसान रोधक (Stop Loss) लावायलाच हवा आणि कमीत कमी नवशिक्या मंडळींनी दोन्ही विकल्पामधून बाहेर पडावे.
(विशेष सूचना: प्रस्तुत लेखातील चालू बाजारातील शेअरचे उदाहरण हे केवळ संकल्पना समजून सांगण्यासाठी घेतलेले आहे. कृपया वाचकांनी हा लेखकाने दिलेला सल्ला अथवा खरेदीची शिफारस आहे असे समजू नये. तथापि योग्य सल्लागाराकडून मार्गदर्शन घेऊनच व्यवहार करावा.)
info@primetechnicals.com

Farmer's Anger, Unmet Demands, Kishore Tiwari, Impact Mahayuti, Maharashtra, lok sabha elections, lok sabha 2024, election 2024, yavatmal news, marathi news, politics news,
कापूस, सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या रोषाचा महायुतीला फटका, किशोर तिवारींचा दावा,’ ३० जागांवर…’
bse listed companies marathi news
गुंतवणूकदार ४०० लाख कोटींचे धनी
Madhabi Puri Buch, SEBI, Indian market, GST, investment
गुंतवणूकदारांच्या वाढत्या आस्थेमुळे भांडवली बाजाराला उच्च मूल्यांकन – सेबी
2000 currency notes worth rs 8202 crore still in circulation
दोन हजारांच्या ८,२०२ कोटी रुपये मूल्याच्या नोटा आजही लोकांहाती!