मेष

ॐ गणनाथाय नमः मंत्र म्हणावा. आज चंद्राचे भ्रमण मीन राशीमध्ये असेल. मोठे निर्णय सावधपणे घ्यावे. कुठल्याही कामात दिरंगाई नको. प्रवास जपून करावेत. आर्थिक व्यवहारामध्ये दक्षता बाळगावी.
आजचा रंग – गडद निळा

21st April Panchang Daily Marathi Horoscope Sarvarth Siddhi Yog
२१ एप्रिल पंचांग: आजचा सर्वार्थ सिद्धी योग १२ पैकी ‘या’ राशींना देईल मान व धन; रविवारी कुणाचं नशीब चमकणार?
10th April 2024 Panchang Mesh To Meen Rashi Bhavishya Today
१० एप्रिल पंचांग: तूळ, कर्कसहित ‘या’ राशी आज धनाढ्य होऊन इतरांनाही करतील मदत; आजचे १२ राशींचे भविष्य वाचा
7th April Panchang Masik Shivratri Mesh To Meen Daily Horoscope
७ एप्रिल पंचांग: एप्रिलची शिवरात्री मेष ते मीन राशींपैकी कुणाला देईल भोलेनाथांची कृपा; तुमच्या कुंडलीत काय लिहिलंय?
3 April 2024 Panchang Horoscope Today
३ एप्रिलचे १२ राशींचे भविष्य व पंचांग: वृषभ, सिंहसह ‘या’ राशींचा आजचा दिवस असेल आनंदी; तुमची रास काय सांगते?

वृषभ

ॐ भगवंताय नमः मंत्राचा जप करावा. आज चंद्राचे भ्रमण मीन राशीमध्ये असेल. सर्व लाभांनी युक्त ग्रहमान आहे. व्यवसायामध्ये अनुकूल वातावरण आहे. आर्थिक स्थिरता प्राप्त होईल. व्यावसायिक नियोजन उत्तम राहील. कमोडिटी, मार्केट, शेअर्समध्ये अनुकूल ग्रहमान आहे.
आजचा रंग – पिवळा

मिथुन

ॐ नमः शिवाय मंत्राचा जप करावा. आज चंद्राचे भ्रमण मीन राशीमध्ये असेल. अधिकार संपन्नता येईल. उत्तम आर्थिक नियोजन करू शकाल. अनेकांचे सहकार्य लाभेल. गुरू बदलाचा लाभ होईल. बांधकाम व्यावसायिक, स्थावर मालमत्तेशी निगडीत व्यवसायिकांना अनुकूल ग्रहमान आहे.
आजचा रंग – सोनेरी

कर्क

ॐ संरक्षकाय नमः मंत्र म्हणावा. आज चंद्राचे भ्रमण मीन राशीमध्ये असेल. प्रगतीकारक ग्रहमान आहे. व्यवसाय, नोकरीमध्ये प्रतिष्ठा प्राप्त होईल. अनेक नवीन योजना राबविता येतील. वादविवाद टाळावेत. प्रवास जपून करावेत. दूरच्या प्रवासाचे योग आहेत.
आजचा रंग – लाल

सिंह

ॐ अमोघ्याय नमः मंत्राचा जप करावा. आज चंद्राचे भ्रमण मीन राशीमध्ये असेल. मोठे व्यावसायिक धाडस नको. प्रकृतीची काळजी घ्यावी. प्रवासामध्ये दक्षता घ्यावी. कमोडिटी, शेअर्स, मार्केट व्यवसायिकांनी सावधपणे गुंतवणूक करावी. वादविवाद टाळावेत.
आजचा रंग – गुलाबी

कन्या

ॐ आदिशक्त्यैय नमः मंत्राचा जप करावा. आज चंद्राचे भ्रमण मीन राशीमध्ये असेल. व्यवसायामध्ये अनुकूल ग्रहमान राहील. अडचणींवर मात करू शकाल. नवीन संधी उपलब्ध होतील. पती, पत्नींमधील दुरावा कमी होईल. कौटुंबिक सौख्य लाभेल.
आजचा रंग – हिरवा

तुळ

ॐ कपिशाय नमः हा मंत्र म्हणावा. आज चंद्राचे भ्रमण मीन राशीमध्ये असेल. आर्थिक नियोजन सावधपणे करावेत. कुठल्याही स्वरूपाचे वादविवाद टाळावेत. सहकाऱ्यांशी, कामगारांशी सुसंवाद राखावा. मोठे आर्थिक नियोजन करताना सावधानता बाळगावी.
आजचा रंग – फिक्कट पिवळा

वृश्चिक

ॐ प्रकाशाय नमः हा मंत्र म्हणावा. आजचा शुभ रंग आहे. आज चंद्राचे भ्रमण मीन राशीमध्ये असेल. महत्त्वकांक्षी योजना राबवू शकाल. धाडसी निर्णय घेऊ शकाल. नवीन योजनांचा पाठपुरावा करावा. संततीशी निगडीत प्रश्न सोडवू शकाल. उत्तम आर्थिक स्थितीचे योग आहेत.
आजचा रंग –नारंगी

धनु

ॐ अक्षराय नमः मंत्र म्हणावा. आज चंद्राचे भ्रमण मीन राशीमध्ये असेल. कौटुंबिक समस्या सोडवू शकाल. नातेवाईकांशी, आप्तेष्ठांशी भेटीचे योग आहेत. बांधकाम व्यावसायिकांना अनुकूल ग्रहमान आहे. व्यवसायामध्ये नवीन संधी उपलब्ध होतील. अनेकांचे सहकार्य लाभेल. प्रवास जपून करावेत.
आजचा रंग – पांढरा

मकर

ॐ सर्वमंगलाय नमः मंत्राचा जप करावा. आज चंद्राचे भ्रमण मीन राशीमध्ये असेल. वादविवाद टाळावेत. व्यावसायिक स्पर्धेचे योग आहेत. व्यवसायामध्ये नवीन संधी उपलब्ध होतील. आर्थिक नियोजन योग्य करू शकाल. भावंडांशी वादविवाद टाळावेत.
आजचा रंग – मोरपंखी

कुंभ

ॐ सर्वात्मने नमः मंत्राचा जप करावा. आज चंद्राचे भ्रमण मीन राशीमध्ये असेल. आर्थिक नियोजन उत्तम करू शकाल. व्यावसायिकांना आणि नोकरदार मंडळींना उत्तम ग्रहमान आहे. महत्त्वकांक्षी योजनांचा पाठपुरावा करावा. आर्थिक नियोजन उत्तम करू शकाल. उत्तम आर्थिक स्थितीचे योग आहेत.
आजचा रंग- निळा

मीन

ॐ अंतिद्रेयाय नमः मंत्राचा जप करावा. आज चंद्राचे भ्रमण मीन राशीमध्ये असेल. व्यवसायामध्ये प्रगतीकारक ग्रहमान आहे. ग्रहांच्या अनुकूलतेमध्ये व्यवसायिक स्थिरता प्राप्त होईल. प्रवासामध्ये दक्षता घ्यावी. सर्वांशी सुसंवाद राहील. वेळेचा योग्य वापर करावा. नियोजनबध्द दिवसाची आखणी करावी.
आजचा रंग – आकाशी

 

डॉ. योगेश मुळे
Dr. of Astrology, Dr. of Astro-Vastu