मेष

दुर्गा कवचाचे पठण करणे. प्रवास जपून करावेत. वृश्चिक राशीमध्ये चंद्राचे भ्रमण आहे. आर्थिक निर्णय घेताना सल्लामसलत करावे. सहकाऱ्यांशी, कामगारांशी वादविवाद टाळावेत. स्थावर मालमत्तेचे व्यवहार सावधपणे करावेत. वातविकार आणि उष्णतेचे विकार असलेल्यांनी विशेष काळजी घ्यावी.
आजचा रंग – लाल

वृषभ
ओम आदि गुरूवे नम: या मंत्राचा जप करणे. कौटुंबिक सौख्य लाभेल. व्यवसायामध्ये नवीन संधी उपलब्ध होतील. नवीन कामाचा पाठपुरावा करावा. प्रवासाचे योग आहेत.
आजचा रंग – पांढरा

मिथुन
ग्रामदैवतेचे स्मरण करणे. प्रकृतीची काळजी घ्यावी. प्रवास जपून करावेत. वादविवाद टाळावेत. कामगारांशी जुळवून घ्यावे. ज्येष्ठांच्या प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल.
आजचा रंग – आकाशी

कर्क
ओम श्री आदि गुरूवे नम: या मंत्राचा जप करणे. व्यवसायामध्ये प्रगतीकारक ग्रहमान. नोकरदारांना मोठ्या जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतील. संततीशी निगडीत प्रश्न सोडवू शकाल. आर्थिक नियोजन उत्तम राहील. दूरच्या प्रवासाचे योग येतील.
आजचा रंग – लाल

सिंह
कुलस्वामिनीचे स्तोत्र पठण करणे. कौटुंबिक सौख्याचा दिवस. कुटुंबासमवेत सहलीचा किंवा प्रवासाचा दिवस. राहत्या घराचे प्रश्न सोडवू शकाल. कर्जप्रकरणांचा पाठपुरावा करा.
आजचा रंग – गुलाबी

कन्या
ग्रामदैवतेचे दर्शन घ्यावे. धाडसी निर्णय घेऊ शकाल. भावंडांशी, आप्तेष्ठांशी वाद टाळावेत. प्रवासाचे योग संभावतात. पगारवाढ किंवा बदलीसाठी प्रयत्न करावेत. व्यवसायामध्ये कामगिरी उत्तम राहील.
आजचा रंग – राखाडी

तुळ
ओम अदभ्यो नम: जप करून दिवसाची सुरूवात करावी. आर्थिक स्थिती चांगली राहील. व्यवसाय, नोकरीमध्ये आर्थिक नियोजन कराल. व्यवसायामध्ये नवीन संधी उपलब्ध होतील. नवीन गाठीभेटी होतील. आर्थिक क्षेत्रात काम करणाऱ्यांना योग्य दिवस आहे. सर्वांचे सहकार्य लाभेल.
आजचा रंग – राखाडी

वृश्चिक
ओम श्री महालक्ष्यै नम: असा जप करावा. भाग्यकारक घटनांचा दिवस. महत्वाचे कामाचे निर्णय घ्यावेत. महत्वकांक्षी योजना राबवण्यासाठी उत्तम ग्रहमान. प्रवासाचे योग येतील. व्यावसायिकांना चांगल्या संधी उपलब्ध होतील.
आजचा रंग – हिरवा

धनु
ओम अदभ्यो नम: या मंत्राचा ११ वेळा जप करावा. आर्थिक उलाढाल जपून करावी. वादविवाद टाळावेत. स्थावर मालमत्ता, शेअरशी निगडीत मंडळींनी काळजी घ्यावी. मोठी गुंतवणूक करत असताना वरिष्ठांचा सल्ला घ्यावा. उष्णतेच्या विकारांची काळजी घ्यावी.
आजचा रंग – पांढरा

मकर
ओम अदभ्यो नम: या मंत्राचा जप करावा. सर्व लाभांसाठी उपयुक्त दिवस. महत्वाच्या निर्णयाची अंमलबजावणी करावी. महत्वकांक्षी योजनांचा पाठपुरावा करावा. आर्थिक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या महिलांनी मंडळींनी सावधानता बाळगावी. प्रवासाचे योग.
आजचा रंग – हिरवा

कुंभ
ओम क्लीं श्री नम: मंत्राचा जप करावा. अधिकारी वर्गासाठी लाभदायक संधी उपलब्ध होतील. ज्येष्ठांशी निगडीत वार्ता समजेल. कर्जप्रकरणांचा पाठपुरावा करावा. आर्थिक येणी वसूल होण्याच्या दृष्टीने चांगला दिवस. नोकरीमध्ये मोठ्या जबाबदाऱ्या स्वीकाराव्या लागतील. कामाचा ताण वाढेल.
आजचा रंग – नारंगी

मीन
पशु-पक्ष्यांना अन्नदान करावे. सुसंधी प्राप्त होतील. नोकरी व्यवसायामध्ये उत्तम सहकार्य लाभेल. परदेशाशी निगडीत व्यापार, नोकरीमध्ये चांगल्या संधी प्राप्त होतील. कामाचा ताण वाढेल. प्रवासाचे योग.
आजचा रंग – निळा

डॉ. योगेश मुळे

Dr. of Astrology, Dr. of Astro-Vastu