मेष
दुर्गा कवचाचे पाठ करावे. आज चंद्राचे भ्रमण मिथुन राशीमध्ये असेल. वादविवाद टाळावेत. व्यवसायांमध्ये मोठे निर्णय घेत असताना सावधानता बाळगावी. प्रवासाचे योग संभवतात. आर्थिक नियोजन सावधपणे करावे. कमोडिटी, मार्केट आणि शेअर्समध्ये सावधपणे गुंतवणूक करावी.
आजचा रंग – पांढरा

वृषभ
ॐ आदि गुरवे नमः या मंत्राचा जप करावा. आज चंद्राचे भ्रमण मिथुन राशीमध्ये असेल. व्यवसायिक स्थिरता प्राप्त होईल. विद्यार्थ्यांना, नोकरदार मंडळींना आजचा दिवस आनंदी राहील. महत्त्वाच्या कामांचा पाठपुरावा करावा. कमोडिटी, शेअर्स शेतीशी निगडीत व्यवसायांना लाभदायक ग्रहमान आहे.
आजचा रंग – फिक्कट पिवळा

10th April 2024 Panchang Mesh To Meen Rashi Bhavishya Today
१० एप्रिल पंचांग: तूळ, कर्कसहित ‘या’ राशी आज धनाढ्य होऊन इतरांनाही करतील मदत; आजचे १२ राशींचे भविष्य वाचा
Surya Grahan 12 Rashi Horoscope Today
८ एप्रिल पंचांग: सूर्यग्रहणाला तुमच्या राशीच्या कुंडलीत आनंद की निराशा, १२ राशींना वर्षाचा शेवटचा दिवस कसा जाईल?
india current account deficit narrows to 1 2 percent of gdp in quarter 3
चालू खात्यावरील तुटीवर नियंत्रण; ऑक्टोबर-डिसेंबर तिमाहीत १०.५ अब्ज डॉलरवर
Rahu And Shukra Conjunction
होळीनंतर राहू-शुक्रची होणार युती! या राशीच्या लोकांच्या आयुष्यात येईल आनंद, धनलाभासह मिळेल नव्या नोकरीची संधी

मिथुन
ग्रामदैवतेचे स्मरण करावे. आज चंद्राचे भ्रमण मिथुन राशीमध्ये असेल. महत्त्वाच्या कामांचा पाठपुरावा करावा. आर्थिक दृष्टिने लाभदायक स्थिती आहे. व्यवसायाशी निगडीत उत्तम स्थिती आहे. प्रवासाचे योग संभवतात.
आजचा रंग – तपकिरी

कर्क
ॐ श्रीं आदि गुरवे नमः या मंत्राचा जप करावा. आज चंद्राचे भ्रमण मिथुन राशीमध्ये असेल. महत्त्वाचे निर्णय सावधपणे घ्यावेत. मोठी आर्थिक गुंतवणूक करीत असताना दक्षता घ्यावी. दगदगीच्या प्रवासाचे योग संभवतात. शेती आणि राजकीय क्षेत्राशी निगडीत मंडळींनी दक्षता बाळगावी. वादविवाद टाळावेत.
आजचा रंग – निळा

सिंह
कुलस्वामिनीचे स्तोत्र पठण करावे. आज चंद्राचे भ्रमण मिथुन राशीमध्ये असेल. सर्व लाभांनी युक्त ग्रहमान आहे. आर्थिकदृष्टीने अनुकूल ग्रहमान आहे. कर्ज प्रकरणे आर्थिक येणी वसूल करणे यासाठी पाठपुरावा करावा. व्यवसायामध्ये आर्थिक आवक चांगली राहील. नोकरदार मंडळींना प्रतिष्ठेचे योग आहेत.
आजचा रंग – जांभळा

कन्या
ग्रामदैवतेचे दर्शन घ्यावे. आज चंद्राचे भ्रमण मिथुन राशीमध्ये असेल. अधिकारी वर्गासाठी अनुकूल ग्रहमान आहे. व्यवसायामध्ये मोठे धाडस करू शकाल. कौटुंबिक अडीअडचणी सोडवू शकाल. कायदेशीर गोष्टींमध्ये यश संभवते
आजचा रंग – जांभळा

तुळ
ॐ अदभ्यो नमः जप करून दिवसाला सुरूवात करावी. आज चंद्राचे भ्रमण मिथुन राशीमध्ये असेल. दूरच्या प्रवासाचे योग संभवतात. प्रवासाशी निगडीत व्यवसाय करणाऱ्यांना आजचा दिवस शुभ आहे. प्रवासामध्ये दक्षता बाळगावी. कोर्ट, कचेरीशी निगडीत प्रश्न सोडवू शकाल. कुटूंबासमवेत उत्तम वेळ घालवू शकाल.
आजचा रंग – जांभळा

वृश्चिक
ॐ श्रीं महालक्ष्यै नमः या मंत्राचा जप करावा. आज चंद्राचे भ्रमण मिथुन राशीमध्ये असेल. व्यवसायात धाडसी निर्णय नको. वादविवाद टाळावेत. प्रवास जपून करावेत. वाहनांशी निगडीत व्यवसाय करणाऱ्यांनी सावधानता बाळगावी. आर्थिक गुंतवणूक सावधपणे करावी.
आजचा रंग – गुलाबी

धनु
ॐ अदभ्यो नमः या मंत्राचा ११ वेळा जप करावा. आज चंद्राचे भ्रमण मिथुन राशीमध्ये असेल. व्यवसायात प्रगतीकारक  ग्रहमान आहे. कौटुंबिक  सौख्य लाभेल. पती, पत्नी मधील दुरावा कमी होईल. भाग्यकारक  घटनांचा दिवस आहे.
आजचा रंग – हिरवा

मकर
ॐ अदभ्यो नमः या मंत्राचा जप करावा. आज चंद्राचे भ्रमण मिथुन राशीमध्ये असेल. प्रकृतीची काळजी घ्यावी. पचनाचे विकार संभवतात. व्यवसायामध्ये मोठे धाडस करू नये. वाहने जपून चालवावीत. गुंतवणूक सावधपणे करावी.
आजचा रंग – पोपटी

कुंभ
ॐ क्लीं श्रीं नमः या मंत्राचा जप करावा. आज चंद्राचे भ्रमण मिथुन राशीमध्ये असेल. व्यवसायामध्ये प्रगतीकारक ग्रहमान आहे. संततीशी निगडीत प्रश्न सोडवू शकाल. आनंदी ग्रहमान राहील. प्रवासाचे योग संभवतात.
आजचा रंग- जांभळा

मीन
पशुपक्षांना अन्नदान करावे. आज चंद्राचे भ्रमण मिथुन राशीमध्ये असेल. कौटुंबिक  सौख्य लाभेल. राहत्या घराशी निगडीत प्रश्न सोडवू शकाल. बांधकाम व्यवसायिक  आणि शेतीशी निगडीत व्यवसायिकांना अनुकूल ग्रहमान राहील. आर्थिक  स्थिरता प्राप्त होईल. कुटूंबासमवेत प्रवासाचे योग आहेत.
आजचा रंग – जांभळा

डॉ. योगेश मुळे

Dr. of Astrology, Dr. of Astro-Vastu