मेष
महादेवाच्या मंदिरात पांढरी फुले अर्पण करावी. आज चंद्राचे भ्रमण तुळ राशीत आहे. कौटुंबिक सौख्याचा दिवस. कुटुंबासमवेत वेळ घालवू शकाल. प्रवासाचे योग संभवतात. व्यवसायामध्ये प्रगतीकारक वातावरण आहे. वादविवाद टाळावेत. शेतीशी निगडीत व्यवसायामध्ये यश संभवतात.
आजचा रंग – राखाडी

वृषभ
शिव मानस पुजा करावी. आज चंद्राचे भ्रमण तुळ राशीत आहे. प्रकृतीची काळजी घेणे. नोकरी व्यवसायामध्ये प्रगतीकारक ग्रहमान आहे. दूरच्या प्रवासाचे योग संभवतात. वाहने जपून चालवावी. आर्थिक उलाढाल जपून करावी.
आजचा रंग – पांढरा

मिथुन
गणपतीची उपासना करून दिवसाची सुरूवात करावी. आज चंद्राचे भ्रमण तुळ राशीत आहे. कौटुंबिक सौख्य लाभेल. घरातील लहान भावंडे आणि मुलांशी निगडीत प्रश्न सोडवू शकाल. छोट्या सहलीचे योग संभवतात. व्यवसायामध्ये महत्वाचे निर्णय घेऊ शकाल. स्पर्धकांवर मात करू शकाल.
आजचा रंग – नारंगी

कर्क
कालभैरव अष्टक सकाळी, संध्याकाळी वाचावे. आज चंद्राचे भ्रमण तुळ राशीत आहे. कुटुंबाशी निगडीत समस्या सोडवू शकाल. राहत्या घराचे प्रश्न सोडवण्यासाठी उत्तम ग्रहमान आहे. कौटुंबिक सौख्य लाभेल. प्रवासाचे योग संभवतात. वादविवाद टाळावेत.
आजचा रंग – गुलाबी

सिंह
शिव मानस पुजेचे वाचन करावे. आज चंद्राचे भ्रमण तुळ राशीत आहे. व्यावसायिकांना कामामध्ये स्पर्धा जाणवेल. आर्थिक आवक चांगली राहील. नातेवाईकांमध्ये वेळ आनंदी जाईल. वादविवाद टाळावेत.
आजचा रंग – पांढरा

कन्या
महादेवाचे दर्शन घ्यावे. एकमूठ तांदूळ अर्पण करावे. आज चंद्राचे भ्रमण तुळ राशीत आहे. आर्थिक स्थिती उत्तम राहील. कर्ज प्रकरणांचा पाठपुरावा करावा. जुनी येणी वसूल होण्याच्या दृष्टीने उत्तम ग्रहमान. आर्थिक स्थितरता येईल.
आजचा रंग – निळा

तुळ
ओम नम: शिवाय या मंत्राचा जप करावा. आज चंद्राचे भ्रमण तुळ राशीत आहे. महत्वाची कामे पूर्ण करू शकाल. आनंदी दिवस. महत्वाच्या कामांचा पाठपुरावा करावा. व्यवसायामध्ये प्रगतीकारक ग्रहमान.
आजचा रंग – आकाशी

वृश्चिक
ओम महालक्ष्मेय नम: या मंत्राचा जप दिवसभर करावा. आज चंद्राचे भ्रमण तुळ राशीत आहे. व्यवसायामध्ये उलाढाल जपून करावी. वादविवाद टाळावेत. महत्वाचे निर्णय घेत असताना सल्ला मसलत करावी. मोठी आर्थिक उलाढाल करू नये. दगदगीचे प्रवास संभवतात.
आजचा रंग – पिवळा

धनु
ओम नम: शिवाय या मंत्राचा जप सुरू ठेवावा. आज चंद्राचे भ्रमण तुळ राशीत आहे. सर्व प्रकारच्या लाभांनी युक्त दिवस. महत्वाचे निर्णय घेऊ शकाल. कर्ज प्रकरणांचा पाठपुरावा करावा. महत्वाचे आर्थिक निर्णय घेऊ शकाल. जुन्या मित्र मंडळींबरोबर वेळ घालवू शकाल.
आजचा रंग – पांढरा

मकर
ओम शांभवेय नम: या मंत्राचा जप करावा. आज चंद्राचे भ्रमण तुळ राशीत आहे. मोठ्या जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतील. अधिकारी वर्गासाठी उत्तम ग्रहमान. मोठे निर्णय घेऊ शकाल. बांधकाम व्यावसायिकांना अनुकूल ग्रहमान. लोखंडाशी निगडीत व्यापार करणाऱ्यांनी सावधानता बाळगावी.
आजचा रंग – पिवळा

कुंभ
आज सकाळी आणि संध्याकाळी घरामध्ये धूप लावून सहस्त्र नामाचा पाठ करावा. आज चंद्राचे भ्रमण तुळ राशीमध्ये आहे. सामाजिक प्रतिष्ठा लाभेल. व्यवसाय, नोकरीमध्ये उत्तम ग्रहमान. वरिष्ठांची मर्जी राहील. मोठी आर्थिक उलाढाल करू नये. परदेशाशी निगडीत व्यापार व्यवसायामध्ये यश. दूरचे प्रवास संभवतात.
आजचा रंग- नारंगी

मीन
महादेवाच्या मंदिरामध्ये पांढरी फुले अर्पण करावे. आज चंद्राचे भ्रमण तुळ राशीत आहे. प्रवास जपून करावेत. मोठे निर्णय घेताना सल्लामसलत करावे. ज्येष्ठांच्या प्रकृतीची काळजी घ्यावी. आर्थिक उलाढाल जपून करावी.
आजचा रंग – गडद लाल

डॉ. योगेश मुळे

Dr. of Astrology, Dr. of Astro-Vastu