मेष
संध्याकाळी महादेवाचे दर्शन घेणे, पशुपक्ष्यांना अन्नदान करणे. आज दिवसभर चंद्राचे भ्रमण मीन राशीमध्ये असेल. व्यवसायामध्ये उलाढाल जपून करावी. वादविवाद टाळावेत. महत्वाचे निर्णय घेताना सल्ला मसलत करावे. मोठी आर्थिक उलाढाल करू नये. दगदगीचे प्रवास संभवतात.
आजचा रंग – पिवळा

वृषभ
ओम नम: शिवाय या मंत्राचा जप करणे. आज दिवसभर चंद्राचे भ्रमण मीन राशीमध्ये असेल. सर्व प्रकारच्या लाभांनी युक्त दिवस. महत्वाचे निर्णय घेऊ शकाल. कर्ज प्रकरणांचा पाठपुरावा करावा. महत्वाचे आर्थिक निर्णय घेऊ शकाल. जुन्या मित्र मंडळींबरोबर वेळ घालवू शकाल.
आजचा रंग – नारंगी

मिथुन
कुलदैवतेचे स्मरण करून दर्शन घेणे. आज दिवसभर चंद्राचे भ्रमण मीन राशीमध्ये असेल. मोठ्या जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतील. अधिकारी वर्गासाठी उत्तम ग्रहमान. मोठे निर्णय घेऊ शकाल. बांधकाम व्यावसायिकांना अनुकूल दिवस. लोखंडाशी निगडीत व्यापार करणाऱ्यांनी सावधानता बाळगावी.
आजचा रंग – हिरवा

कर्क
ओम नम: शिवाय या मंत्राचा जप सुरू ठेवणे. आज दिवसभर चंद्राचे भ्रमण मीन राशीमध्ये असेल. सामाजिक प्रतिष्ठा लाभेल. व्यवसाय, नोकरीमध्ये उत्तम ग्रहमान. वरिष्ठांची मर्जी राहील. मोठी आर्थिक उलाढाल करू नये. परदेशाशी निगडीत व्यापार व्यवसायामध्ये यश. दूरचे प्रवास संभवतात.
आजचा रंग – पोपटी

सिंह
ओम सोमाय नम: जप करून दिवसाची सुरूवात करणे. आज दिवसभर चंद्राचे भ्रमण मीन राशीमध्ये असेल. प्रवास जपून करावेत. मोठे निर्णय घेताना सल्लामसलत करावी. ज्येष्ठांच्या प्रकृतीची काळजी करावी लागेल. आर्थिक उलाढाल जपून करावी.
आजचा रंग – सिंह

कन्या
ओम नम: शिवाय जप दिवसभर मनातल्या मनात सुरू ठेवावा. आज दिवसभर चंद्राचे भ्रमण मीन राशीमध्ये असेल. कौटुंबिक सौख्याचा दिवस. कुटुंबासमवेत वेळ घालवू शकाल. प्रवासाचे योग संभवतात. व्यवसायामध्ये प्रगतीकारक वातावरण आहे. वादविवाद टाळावेत. शेतीशी निगडीत व्यवसायामध्ये यश संभवतात.
आजचा रंग – लाल

तुळ
महादेवाच्या मंदिरात अभिषेक करणे. आज दिवसभर चंद्राचे भ्रमण मीन राशीमध्ये असेल. प्रकृतीची काळजी घेणे. नोकरी व्यवसायामध्ये प्रगतीकारक ग्रहमान आहे. दूरच्या प्रवासाचे योग संभवतात. वाहने जपून चालवावी. आर्थिक उलाढाल जपून करावी.
आजचा रंग – पिवळा

वृश्चिक
ओम नम: शिवाय या मंत्राचा जप करावा. आज दिवसभर चंद्राचे भ्रमण मीन राशीमध्ये असेल. कौटुंबिक सौख्य लाभेल. घरातील लहान भावंड आणि मुलांशी निगडीत प्रश्न सोडवू शकाल. स्पर्धकांवर मात करू शकाल.
आजचा रंग – आकाशी

धनु
ओम नम: शिवाय या मंत्राचा जप करावा. आज दिवसभर चंद्राचे भ्रमण मीन राशीमध्ये असेल. कुटुंबाशी निगडीत समस्या सोडवू शकाल. राहत्या घराचे प्रश्न सोडवण्यासाठी उत्तम ग्रहमान. कौटुंबिक सौख्य लाभेल. प्रवासाचे योग संभवतात. वादविवाद टाळावेत.
आजचा रंग – पांढरा

मकर
महादेवाच्या मंदिरात धान्य आणि पांढरी फुले अर्पण करावी. आज दिवसभर चंद्राचे भ्रमण मीन राशीमध्ये असेल. व्यावसायिकांना कामामध्ये स्पर्धा जाणवेल. आर्थिक आवक चांगली राहील. नातेवाईकांमध्ये वेळ आनंदी जाईल. वादविवाद टाळावेत.
आजचा रंग – नारंगी

कुंभ
ओम नम: शिवाय या पंचाक्षरी मंत्राचा जप सुरू ठेवणे. आज दिवसभर चंद्राचे भ्रमण मीन राशीमध्ये असेल. आर्थिक स्थिती उत्तम राहील. कर्ज प्रकरणांचा पाठपुरावा करावा. जुनी येणी वसूल होण्याच्या दृष्टीने उत्तम ग्रहमान. आर्थिक स्थिरता येईल.
आजचा रंग- लाल

मीन
महादेव मंदिरामध्ये पांढरी फुले अर्पण करणे. आज दिवसभर चंद्राचे भ्रमण मीन राशीमध्ये असेल. महत्वाची कामे पूर्ण करू शकाल. आनंदी दिवस. महत्वाच्या कामांचा पाठपुरावा करावा. व्यवसायामध्ये प्रगतीकारक ग्रहमान.
आजचा रंग – निळा

डॉ. योगेश मुळे

Dr. of Astrology, Dr. of Astro-Vastu