21 October 2017

News Flash

आजचे राशीभविष्य, सोमवार, २५ सप्टेंबर २०१७

सर्व बारा राशींचे भविष्य

पुणे | Updated: September 25, 2017 1:11 AM

Daily Astrology : आजचे बारा राशींचे राशीभविष्य

मेष

घरातून निघताना ॐ नमः शिवाय जप करून निघावे. आज चंद्राचे भ्रमण वृश्चिक राशीत आहे. व्यवसायात धाडसी निर्णय नको. वादविवाद टाळावेत. प्रवास जपून करावेत. वाहनांशी निगडीत व्यवसाय करणाऱ्यांनी सावधानता बाळगावी. आर्थिक गुंतवणूक सावधपणे करावी.
आजचा रंग – निळा

वृषभ

भैरवांचे दर्शन घ्यावे. आज चंद्राचे भ्रमण वृश्चिक राशीत आहे. व्यवसायात प्रगतीकारक ग्रहमान आहे. कौटुंबिक सौख्य लाभेल. पती, पत्नी मधील दुरावा कमी होईल. भाग्यकारक घटनांचा दिवस आहे.
आजचा रंग – पांढरा

मिथुन

कालभैरवाचे दर्शन घ्यावे. आज चंद्राचे भ्रमण वृश्चिक राशीत आहे. प्रकृतीची काळजी घ्यावी. पचनाचे विकार संभवतात. व्यवसायामध्ये मोठे धाडस करू नये. वाहने जपून चालवावीत. गुंतवणूक सावधपणे करावी.
आजचा रंग – निळा

कर्क

ॐ नमः शिवाय या मंत्राचा जप करावा. आज चंद्राचे भ्रमण वृश्चिक राशीत आहे. व्यवसायामध्ये प्रगतीकारक ग्रहमान आहे. संततीशी निगडीत प्रश्न सोडवू शकाल. आनंदी ग्रहमान राहील. प्रवासाचे योग संभवतात.
आजचा रंग – पांढरा

सिंह

ॐ नमः शिवाय या मंत्राचा जप करावा. आज चंद्राचे भ्रमण वृश्चिक राशीत आहे. कौटुंबिक सौख्य लाभेल. राहत्या घराशी निगडीत प्रश्न सोडवू शकाल. बांधकाम व्यवसायिक आणि शेतीशी निगडीत व्यवसायिकांना अनुकूल ग्रहमान राहील. आर्थिक स्थिरता प्राप्त होईल. कुटूंबासमवेत प्रवासाचे योग आहेत.
आजचा रंग – निळा

कन्या

ॐ श्रीं लक्ष्मीयै नमः या मंत्राचा जप करावा. आज चंद्राचे भ्रमण वृश्चिक राशीत आहे. वादविवाद टाळावेत. व्यवसायांमध्ये मोठे निर्णय घेत असताना सावधानता बाळगावी. प्रवासाचे योग संभवतात. आर्थिक नियोजन सावधपणे करावे. कमोडिटी, मार्केट आणि शेअर्समध्ये सावधपणे गुंतवणूक करावी.
आजचा रंग – तपकिरी

तुळ

महामृत्युंजय मंत्राचा जप करावा. आज चंद्राचे भ्रमण वृश्चिक राशीत आहे. व्यवसायिक स्थिरता प्राप्त होईल. विद्यार्थ्यांना, नोकरदार मंडळींना आजचा दिवस आनंदी राहील. महत्त्वाच्या कामांचा पाठपुरावा करावा. कमोडिटी, शेअर्स शेतीशी निगडीत व्यवसायांना लाभदायक ग्रहमान आहे.
आजचा रंग – पांढरा

वृश्चिक

ॐ नमः शिवाय या मंत्राचा जप करावा. आज चंद्राचे भ्रमण वृश्चिक राशीत आहे. महत्त्वाच्या कामांचा पाठपुरावा करावा. आर्थिकदृष्टिने लाभदायक स्थिती आहे. व्यवसायाशी निगडीत उत्तम स्थिती आहे. प्रवासाचे योग संभवतात.
आजचा रंग – क्रीम

धनु

गुरू मंत्राचा जप करावा. आज चंद्राचे भ्रमण वृश्चिक राशीत आहे. महत्त्वाचे निर्णय सावधपणे घ्यावेत. मोठी आर्थिक गुंतवणूक करीत असताना दक्षता घ्यावी. दगदगीच्या प्रवासाचे योग संभवतात. शेती आणि राजकीय क्षेत्राशी निगडीत मंडळींनी दक्षता बाळगावी. वादविवाद टाळावेत.
आजचा रंग – आकाशी

मकर

भविष्यातील आर्थिक योजनांचे नियोजन करावे. आज चंद्राचे भ्रमण वृश्चिक राशीत आहे. सर्व लाभांनी युक्त ग्रहमान आहे. आर्थिकदृष्टीने अनुकूल ग्रहमान आहे. कर्ज प्रकरणे आर्थिक येणी वसूल करणे यासाठी पाठपुरावा करावा. व्यवसायामध्ये आर्थिक आवक चांगली राहील. नोकरदार मंडळींना प्रतिष्ठेचे योग आहेत.
आजचा रंग – पांढरा

कुंभ

गुरूजनांचे आशिर्वाद आणि मार्गदर्शन घेऊन महत्त्वाची कामे सुरू करावीत. आज चंद्राचे भ्रमण वृश्चिक राशीत आहे. अधिकारी वर्गासाठी अनुकूल ग्रहमान आहे. व्यवसायामध्ये मोठे धाडस करू शकाल. कौटुंबिक अडीअडचणी सोडवू शकाल. कायदेशीर गोष्टींमध्ये यश संभवते.
आजचा रंग- गडद तपकिरी

मीन

मारूतीचे दर्शन घ्यावे. आज चंद्राचे भ्रमण वृश्चिक राशीत आहे. दूरच्या प्रवासाचे योग संभवतात. प्रवासाशी निगडीत व्यवसाय करणाऱ्यांना आजचा दिवस शुभ आहे. प्रवासामध्ये दक्षता बाळगावी. कोर्ट, कचेरीशी निगडीत प्रश्न सोडवू शकाल. कुटूंबासमवेत उत्तम वेळ घालवू शकाल.
आजचा रंग – राखाडी

 

डॉ. योगेश मुळे
Dr. of Astrology, Dr. of Astro-Vastu

First Published on September 25, 2017 1:11 am

Web Title: daily horoscope astrology in marathi monday 25 september 2017