मेष

शनि मंदिरामध्ये तेल अर्पण करणे. चंद्राचे भ्रमण वृश्चिक राशीमध्ये असेल. प्रवास जपून करावेत. आर्थिक निर्णय घेताना सल्लामसलत करावे. सहकाऱ्यांशी, कामगारांशी वादविवाद टाळावेत. स्थावर मालमत्तेचे व्यवहार सावधपणे करावेत. वातविकार आणि उष्णतेचे विकार असलेल्यांनी विशेष काळजी घ्यावी.
आजचा रंग – लाल

वृषभ
शनि मंदिरात डाळीच्या पदार्थांचे दान करावेत. चंद्राचे भ्रमण वृश्चिक राशीमध्ये असेल. कौटुंबीक सौख्य लाभेल. व्यवसायामध्ये नवीन संधी उपलब्ध होतील. नवीन कामाचा पाठपुरावा करावा. प्रवासाचे योग आहेत.
आजचा रंग – पांढरा

मिथुन
आज शनि मंत्राचे पठण करावे. चंद्राचे भ्रमण वृश्चिक राशीमध्ये असेल. प्रकृतीची काळजी घ्यावी. प्रवास जपून करावेत. वादविवाद टाळावेत. कामगारांशी जुळवून घ्यावे. ज्येष्ठांच्या प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल.
आजचा रंग – आकाशी

कर्क
ओम हरये नम: या मंत्राचा जप करावा. चंद्राचे भ्रमण वृश्चिक राशीमध्ये असेल. व्यवसायामध्ये प्रगतीकारक ग्रहमान. नोकरदारांना मोठ्या जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतील. संततीशी निगडीत प्रश्न सोडवू शकाल. आर्थिक नियोजन उत्तम राहील. दूरच्या प्रवासाचे योग येतील.
आजचा रंग – लाल

सिंह
शनि मंत्राचा पठण करावे. चंद्राचे भ्रमण वृश्चिक राशीमध्ये असेल. कौटुंबीक सौख्याचा दिवस. कुटुंबासमवेत सहलीचे किंवा प्रवासाचे योग. राहत्या घराचे प्रश्न सोडवू शकाल. कर्ज प्रकरणांचा पाठपुरावा करावा.
आजचा रंग – गुलाबी

कन्या
शनि मंदिरात डाळीच्या पदार्थाचे दान करावे. चंद्राचे भ्रमण वृश्चिक राशीमध्ये असेल. धाडसी निर्णय घेऊ शकाल. भावंड, आप्तेष्ठांशी वाद टाळावेत. प्रवासाचे योग संभवतात. पगारवाढ किंवा बदलीसाठी प्रयत्न करावेत. व्यवसायामध्ये कामगिरी उत्तम राहील.
आजचा रंग – राखाडी

तुळ
शनि व मारूतीचे दर्शन घ्यावे. चंद्राचे भ्रमण वृश्चिक राशीमध्ये असेल. आर्थिक स्थिती चांगली राहील. व्यवसाय, नोकरीमध्ये आर्थिक नियोजन करू शकाल. व्यवसायामध्ये नवीन संधी उपलब्ध होतील. नवीन गाठीभेटी होतील. आर्थिक क्षेत्रद्धात काम करणाऱ्यांना योग्य दिवस आहेत. सर्वांचे सहकार्य लाभेल.
आजचा रंग – राखाडी

वृश्चिक
शनि मंत्राचा जप करणे. चंद्राचे भ्रमण वृश्चिक राशीमध्ये असेल. भाग्यकारक घटनांचा दिवस. महत्वाच्या कामाचे निर्णय घ्यावेत. महत्वकांक्षी योजना राबवण्यासाठी उत्तम ग्रहमान. चांगल्या प्रवासाचे योग येतील. व्यावसायिकांना चांगल्या संधी उपलब्ध होतील.
आजचा रंग – हिरवा

धनु
शनि मंदिरात तिळाच्या तेलाचा दिवा लावणे. चंद्राचे भ्रमण वृश्चिक राशीमध्ये असेल. आर्थिक उलाढाल जपून करावी. वादविवाद टाळावेत. स्थावर मालमत्ता, शेअरशी निगडीत मंडळीनी काळजी घ्यावी. मोठी गुंतवणूक करत असताना वरिष्ठांचा सल्ला घ्यावा. उष्णतेच्या विकारांची काळजी घ्यावी.
आजचा रंग – पांढरा

मकर
मारूतीची उपासना करणे. चंद्राचे भ्रमण वृश्चिक राशीमध्ये असेल. सर्व लाभांसाठी उपयुक्त दिवस. महत्वाच्या निर्णयांची अंमलबजावणी करावी. महत्वकांक्षी योजनांचा पाठपुरावा करावा. आर्थिक क्षेत्रात काम करणाऱ्या मंडळींना सावधानता बाळगावी. प्रवासाचे योग.
आजचा रंग – हिरवा

कुंभ
मारूतीला पाच दिवे लावावेत. चंद्राचे भ्रमण वृश्चिक राशीमध्ये असेल. अधिकारी वर्गासाठी लाभदायक संधी उपलब्ध होतील. ज्येष्ठांशी निगडीत सुवार्ता समजेल. कर्ज प्रकरणांचा पाठपुरावा करावा. आर्थिक येणी वसूल होण्याच्या दृष्टीने चांगला दिवस. नोकरीमध्ये मोठ्या जबाबदाऱ्या स्वीकाराव्या लागतील. कामाचा ताण वाढेल.
आजचा रंग – नारंगी

मीन
शनि मंत्राचा जप करणे. चंद्राचे भ्रमण वृश्चिक राशीमध्ये असेल. सुसंधी प्राप्त होतील. नोकरी व्यवसायामध्ये उत्तम सहकार्य लाभेल. परदेशाशी निगडीत व्यापार, नोकरीमध्ये चांगल्या संधी निर्माण होतील. कामाचा ताण वाढेल. प्रवासाचे योग.
आजचा रंग – आकाशी

डॉ. योगेश मुळे

Dr. of Astrology, Dr. of Astro-Vastu