मेष

कुलस्वामिनी व कुलदैवताचे दर्शन घ्यावे. धनु राशीमध्ये चंद्राचे भ्रमण आहे. सुसंधी प्राप्त होतील. नोकरी, व्यवसायामध्ये उत्तम सहकार्य लाभेल. परदेशाशी निगडीत व्यापार, नोकरीमध्ये चांगल्या संधी निर्माण होतील. कामाचा ताण वाढेल. प्रवासाचे योग
आजचा रंग – निळा

वृषभ
कालभैरवाचे दर्शन घेऊन दिवसाची सुरूवात करावी. प्रवास जपून करावेत. आर्थिक निर्णय घेताना सल्लामसलत करावे. सहकाऱ्यांशी, कामगारांशी वादविवाद टाळावेत. स्थावर मालमत्तेचे व्यवहार सावधपणे करावेत. वातविकार, उष्णतेचे विकार असलेल्यांनी काळजी घ्यावी.
आजचा रंग – हिरवा

मिथुन
कुलदैवताचे स्मरण करून दिवसाची सुरूवात करावी. कौटुंबिक सौख्य लाभेल. व्यवसायामध्ये नवीन संधी उपलब्ध होतील. नवीन कामाचा पाठपुरावा करावा. प्रवासाचे योग आहेत.
आजचा रंग – आकाशी

कर्क
आमे इंद्राग्निभ्मां नम: या मंत्राचा जप करावा. प्रकृतीची काळजी घ्यावी. प्रवास जपून करावेत. वादविवाद टाळावेत. कामगारांशी जुळवून घ्यावे. ज्येष्ठांच्या प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल.
आजचा रंग – पिवळा

सिंह
कालभैरवाचे दर्शन घ्यावे. व्यवसायामध्ये प्रगतीकारक ग्रहमान. नोकरदारांना मोठ्या जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतील. संततीशी निगडीत प्रश्न सोडवू शकाल. आर्थिक नियोजन उत्तम राहील. दूरच्या प्रवासाचे योग येतील.
आजचा रंग – निळा

कन्या
कालभैरवाचे दर्शन घ्यावे. कौटुंबिक सौख्याचा दिवस. कुटुंबासमवेत सहलीचे किंवा प्रवासाचे योग. राहत्या घराचे प्रश्न सोडवून शकाल. कर्ज प्रकरणांचा पाठपुरावा करावा.
आजचा रंग – गुलाबी

तुळ
कुलदैवतेचे दर्शन घ्यावे. धाडसी निर्णय घेऊ शकाल. भावंडाशी, आप्तेष्ठांशी वाद टाळावेत. प्रवासाचे योग संभवतात. पगारवाढ किंवा बदलीसाठी प्रयत्न करावेत. व्यवसायामध्ये कामगिरी उत्तम राहील.
आजचा रंग – निळा

वृश्चिक
ओम हरये नम: या मंत्राचा जप करणे. आर्थिक स्थिती चांगली राहील. व्यवसाय, नोकरीमध्ये आर्थिक नियोजन करू शकाल. व्यवसायामध्ये नवीन संधी उपलब्ध होतील. नवीन गाठीभेटी होतील. आर्थिक क्षेत्रात काम करणाऱ्यांना योग्य दिवस. सर्वांचे सहकार्य लाभेल.
आजचा रंग – पांढरा

धनु
कालभैरवाची उपासना करणे. भाग्यकारक घटनांचा दिवस. महत्वाच्या कामांचे निर्णय घ्यावेत. महत्वकांक्षी योजना राबवण्यासाठी उत्तम ग्रहमान. चांगल्या प्रवासाचे योग येतील. व्यावसायिकांना चांगल्या संधी उपलब्ध होतील.
आजचा रंग – निळा

मकर
महादेव मंदिरात दर्शन घ्यावे. आर्थिक उलाढाल जपून करावेत. वादविवाद टाळावेत. स्थावर मालमत्ता, शेअरशी निगडीत मंडळींनी काळजी घ्यावी. मोठी गुंतवणूक करत असताना वरिष्ठांचा सल्ला घ्यावा. उष्णतेच्या विकारांची काळजी घ्यावी.
आजचा रंग – नारंगी

कुंभ
ओम हरये नम: या मंत्राचा जप करणे. सर्व लाभांसाठी उपयुक्त दिवस. महत्वाच्या निर्णयाच्या अंमलबजावणी करावी. महत्वकांक्षी योजनांचा पाठपुरावा करावा. आर्थिक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या मंडळीनी सावधानता बाळगावी. प्रवासाचे योग.
आजचा रंग – पांढरा

मीन
कालभैरवाचे दर्शन घेणे. अधिकारी वर्गासाठी लाभदायक संधी उपलब्ध होतील. ज्येष्ठांशी निगडीत सुवार्ता समजेल. कर्ज प्रकरणांचा पाठपुरावा करावा. आर्थिक येणी वसूल होण्याच्या दृष्टीने चांगला दिवस. नोकरीमध्ये मोठ्या जबाबदाऱ्या स्वीकाराव्या लागतील. कामाचा ताण वाढेल.
आजचा रंग – पांढरा

डॉ. योगेश मुळे

Dr. of Astrology, Dr. of Astro-Vastu