मेष
कुलस्वामिनी व कुलदैवताचे दर्शन घ्यावे. आज चंद्राचे भ्रमण कर्क राशीत आहे. कौटुंबिक स्थिरता जाणवेल. कुटुंबातील सदस्यांबरोबर वेळ घालवू शकाल. छोट्या सहलीचे योग. राहत्या घराशी निगडीत प्रकरणे मार्गी लावू शकाल. आर्थिक स्थिती उत्तम राहील.
आजचा रंग – निळा

वृषभ
कालभैरवाचे दर्शन घेऊन दिवसाची सुरूवात करावी. आज चंद्राचे भ्रमण कर्क राशीत आहे. व्यावसायिक स्पर्धा वाढेल. नोकरी व्यवसायात प्रगतीकारक ग्रहमान. व्यवसायाच्या नवीन संधी उपलब्ध होतील. प्रवासाचे योग संभवतात. भावंडांशी वादविवाद टाळावेत.
आजचा रंग – हिरवा

10th April 2024 Panchang Mesh To Meen Rashi Bhavishya Today
१० एप्रिल पंचांग: तूळ, कर्कसहित ‘या’ राशी आज धनाढ्य होऊन इतरांनाही करतील मदत; आजचे १२ राशींचे भविष्य वाचा
9th April 2024 Panchang & Marathi Horoscope
गुढीपाडवा विशेष राशी भविष्य: ९ एप्रिलला मेष ते मीनपैकी कुणाचं नशीब घेईल कलाटणी; तुमचं नववर्ष होणार गोड?
4th April Panchang Rashi Bhavishya Guruvaar
४ एप्रिल राशी भविष्य: गुरुवारी श्रवण नक्षत्रात मेष ते मीन पैकी कुणाचे नशीब चमकणार? धन, आरोग्य कसे असेल?
26 March Panchang Marathi Rashi Bhavishya Today For Mesh To Meen
२६ मार्च पंचांग: वृषभ, तूळसह ‘या’ राशींच्या हाती पैसे राहतील खेळते तर ‘या’ मंडळींच्या प्रेमाला येईल वसंताचा बहर

मिथुन
कुलदैवताचे स्मरण करून दिवसाची सुरूवात करावी. आज चंद्राचे भ्रमण कर्क राशीत आहे. उत्तम आर्थिक स्थितीचा दिवस. जुनी येणी वसूल करू शकाल. तुमच्या कार्यक्षेत्रात प्रतिष्ठा वाढेल. स्थिरता प्राप्त होईल. प्रवासाचे योग संभवतात.
आजचा रंग – आकाशी

कर्क
ओम इंद्राग्निभ्मा नम: या मंत्राचा जप करावा. आज चंद्राचे भ्रमण कर्क राशीत आहे. भाग्यकारक घटनांचा दिवस. महत्वपूर्ण निर्णय घेऊ शकाल. आर्थिक व्यवहारात सावधानता बाळगावी. नवीन हितसंबंध जुळतील. प्रवासाचे योग संभवतात.
आजचा रंग – पिवळा

सिंह
कालभैरवाचे दर्शन घ्यावे. आज चंद्राचे भ्रमण कर्क राशीत आहे. वादविवाद टाळावेत. आर्थिक उलाढाल जपून करावी मोठे निर्णय सावधपणे घ्यावेत. उसने पैसे देऊ नयेत.
आजचा रंग – निळा

कन्या
कालभैरवाचे दर्शन घ्यावे. आज चंद्राचे भ्रमण कर्क राशीत आहे. सर्व लाभांनी युक्त ग्रहमान. महत्वाचे निर्णय घेताना सल्लामसलत करावी. आर्थिक स्थिती उत्तम राहील. प्रगतीकारक ग्रहमान.
आजचा रंग – गुलाबी

तुळ
कुलदैवतेचे दर्शन घ्यावे. आज चंद्राचे भ्रमण कर्क राशीत आहे. अधिकारी वर्गासाठी उत्तम ग्रहमान. व्यवसायामध्ये आर्थिक लाभ उत्तम. नोकरदारांना आज दगदगीच्या प्रवासाचे योग. कमोडिटी, शेअर्स, बँकिंग क्षेत्रातील गुंतवणूकदारांना आज अनुकूल ग्रहमान.
आजचा रंग – निळा

वृश्चिक
ओम हरये नम: या मंत्राचा जप करावा. आज चंद्राचे भ्रमण कर्क राशीत आहे. प्रगतीकारक ग्रहमान. कौटुंबिक सौख्य लाभेल. दूरच्या प्रवासाचे योग संभवतात. प्रकृतीची काळजी घ्यावी.
आजचा रंग – पांढरा

धनु
कालभैरवाची उपासना करावी. आज चंद्राचे भ्रमण कर्क राशीत आहे. प्रकृतीची काळजी घेणे. व्यवसायामध्ये मोठे धाडस करू नये. लोखंडाशी निगडीत व्यापार करणाऱ्यांनी दक्षता बाळगणे. शेतीशी निगडीत व्यवसायासाठी अनुकूल ग्रहमान.
आजचा रंग – निळा

मकर
महादेव मंदिरात दर्शन घ्यावे. आज चंद्राचे भ्रमण कर्क राशीत आहे. व्यावसायिक प्रगतीचे दिवस. उत्तम संधी उपलब्ध होतील. कुटुंबासमवेत आनंदी वेळ घालवू शकाल. प्रवासाचे योग. कौटुंबिक सौख्याचा दिवस.
आजचा रंग – नारंगी

कुंभ
ओम हरये नम: या मंत्राचा जप करावा. आज चंद्राचे भ्रमण कर्क राशीत आहे. आर्थिक स्थिती उत्तम राहील. विद्यार्थ्यांना, व्यावसायिकांना, नोकरदारांना नवीन संधी उपलब्ध होतील. प्रकतीची काळजी घेणे. पचनाशी निगडीत विकारांकडे दुर्लक्ष करू नये. प्रवास जपून करावेत. वाहने सावकाश चालवावीत.
आजचा रंग- पांढरा

मीन
कालभैरवाचे दर्शन घ्यावे. आज चंद्राचे भ्रमण कर्क राशीत आहे. महत्वकांक्षी निर्णयांचा दिवस. व्यावसायिकांना नव्या संधी उपलब्ध होतील. नोकरदारांना बदलांची शक्यता. संततीशी निगडीत प्रश्न सोडवू शकाल. प्रवासाचे योग संभवतात.
आजचा रंग – पांढरा

डॉ. योगेश मुळे

Dr. of Astrology, Dr. of Astro-Vastu