मेष
ओम द्रां दत्तात्राय नम: या मंत्राचा जप करावा. आज चंद्राचे भ्रमण कुंभ राशीत आहे. सर्व प्रकारच्या लाभांनी युक्त दिवस. महत्वाचे निर्णय घेऊ शकाल. कर्ज प्रकरणांचा पाठपुरावा करावा. महत्वाचे आर्थिक निर्णय घेऊ शकाल. जुन्या मित्र मंडळींबरोबर वेळ घालवू शकाल.
आजचा रंग – नारंगी

वृषभ
लक्ष्मी अष्टकाचे पाठ करणे. आज चंद्राचे भ्रमण कुंभ राशीत आहे. मोठ्या जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतील. अधिकारी वर्गासाठी उत्तम ग्रहमान. मोठे निर्णय घेऊ शकाल. बांधकाम व्यावसायिकांना अनुकूल ग्रहमान. लोखंडाशी निगडीत व्यापार करणाऱ्यांनी सावधानता बाळगावी.
आजचा रंग – हिरवा

मिथुन
दत्त महाराजांच्या मंदिरात पांढरे पदार्थ अर्पण करणे. आज चंद्राचे भ्रमण कुंभ राशीत आहे. सामाजिक प्रतिष्ठा लाभेल. व्यवसाय, नोकरीमध्ये उत्तम ग्रहमान. वरिष्ठांची मर्जी राहील. मोठी आर्थिक उलाढाल करू नये. परदेशाशी निगडीत व्यापार व्यवसायामध्ये यश. दूरचे प्रवास संभवतात.
आजचा रंग – आकाशी

कर्क
गणपती पूजन अर्थव शीर्षाचे पाठ करावे. आज चंद्राचे भ्रमण कुंभ राशीत आहे. प्रवास जपून करावेत. मोठे निर्णय घेताना सल्लामसलत करावे. ज्येष्ठांच्या प्रकृतीची काळजी करावी लागेल. आर्थिक उलाढाल जपून करावी.
आजचा रंग – पिवळा

सिंह
ओम श्रीं दत्तात्रयाय नम: या मंत्राचा जप करावा. आज चंद्राचे भ्रमण कुंभ राशीत आहे. कौटुंबिक सौख्याचा दिवस. कुटुंबासमवेत वेळ घालवू शकाल. प्रवासाचे योग संभवतात. व्यवसायामध्ये प्रगतीकारक वातावरण आहे. वादविवाद टाळावेत. शेतीशी निगडीत व्यवसायामध्ये यश संभवतात.
आजचा रंग – नारंगी

कन्या
दत्त मंदिरात पांढरी फुले अर्पण करणे. ओम श्रीं आदि गुरवे नम: या मंत्राचा २१ वेळा जप करणे. आज चंद्राचे भ्रमण कुंभ राशीमध्ये आहे. प्रकृतीची काळजी घेणे. नोकरी व्यवसायामध्ये प्रगतीकारक ग्रहमान आहे. दूरच्या प्रवासाचे योग संभवतात. वाहने जपून चालवावी. आर्थिक उलाढाल जपून करावी.
आजचा रंग – गुलाबी

तुळ
ओम श्रीं आदि गुरवे नम: या मंत्राचा जप करणे. आज चंद्राचे भ्रमण कुंभ राशीत आहे. कौटुंबिक सौख्य लाभेल. घरातील लाहन भावंड आणि मुलांशी निगडीत प्रश्न सोडवू शकाल. छोट्या सहलीचे योग संभवतात. व्यवसायामध्ये महत्वाचे निर्णय घेऊ शकाल. स्पर्धकांवर मात करू शकाल.
आजचा रंग – नारंगी

वृश्चिक
ओम शांभवे नम: या मंत्राचा जप करणे. आज चंद्राचे भ्रमण कुंभ राशीत आहे. कुटुंबाशी निगडीत समस्या सोडवू शकाल. राहत्या घराचे प्रश्न सोडवण्यासाठी उत्तम ग्रहमान आहे. कौटुंबिक सौख्य लाभेल. प्रवासाचे योग संभवतात. वादविवाद टाळावेत.
आजचा रंग – पांढरा

धनु
ओम द्रां द्रीं दत्तात्रयाय नम: या मंत्राचा जप करणे. आज चंद्राचे भ्रमण कुंभ राशीत आहे. व्यावसायिकांना कामामध्ये स्पर्धा जावणेल. आर्थिक आवक चांगली राहील. नातेवाईकांमध्ये वेळ आनंदी जाईल. वादविवाद टाळावेत.
आजचा रंग – निळा

मकर
ओम द्रां द्रीँ दत्तात्रय नम: या मंत्राचा जप करणे. आज चंद्राचे भ्रमण कुंभ राशीत आहे. आर्थिक स्थिती उत्तम राहील. कर्ज प्रकरणांचा पाठपुरावा करावा. जुनी येणी वसूल होण्याच्या दृष्टीने उत्तम ग्रहमान. आर्थिक स्थिरता येईल.
आजचा रंग – नारंगी

कुंभ
आज पांढऱ्या वस्तूंचे दान दत्त मंदिरात करावे. आज चंद्राचे भ्रमण कुंभ राशीत आहे. महत्वाची कामे पूर्ण करू शकाल. आनंदी दिवस. महत्वाच्या कामांचा पाठपुरावा करावा. व्यवसायामध्ये प्रगतीकारक ग्रहमान.
आजचा रंग- पांढरा

मीन
दत्त महाराजांच्या मंदिरात दर्शन घ्यावे. आज चंद्राचे भ्रमण कुंभ राशीत आहे. व्यवसायामध्ये उलाढाल जपून करावी. वादविवाद टाळावेत. महत्वाचे निर्णय घेत असताना सल्ला मसलत करावी. मोठी आर्थिक उलाढाल करू नये. दगदगीचे प्रवास संभवतात.
आजचा रंग – पांढरा

डॉ. योगेश मुळे

Dr. of Astrology, Dr. of Astro-Vastu