मेष
ओम श्री अदभ्यौ नम: या मंत्राचा जप करावा. व्यवसायात प्रगतीकारक ग्रहमान. नोकरदारांना मोठ्या जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतील. संततीशी निगडीत प्रश्न सोडवू शकाल. आर्थिक नियोजन उत्तम राहील. दूरच्या प्रवासाचे योग येतील. सिंह राशीमध्ये चंद्राचे भ्रमण
आजचा रंग – राखाडी

वृषभ
ओम आदि गुरूवै नमः या मंत्राचा जप करावा. कौटुंबिक सौख्याचा दिवस आहे. कुटुंबासमवेत सहलीचे किंवा प्रवासाचे योग. राहत्या घराचे प्रश्न सोडवू शकाल. कर्ज प्रकरणांचा पाठपुरावा करावा.
आजचा रंग – पांढरा

मिथुन
ओम राम दत्तात्रय नम: या मंत्राचा जप करावा. धाडसी निर्णय घेऊ शकाल. भावंडाशी, आप्तेष्ठांशी वाद टाळावेत. प्रवासाचे योग संभवतात. पगारवाढ किंवा बदलीसाठी प्रयत्न करावेत. व्यवसायांमध्ये कामगिरी उत्तम राहील.
आजचा रंग – नारंगी

कर्क
दत्त महाराजांच्या मंदिरामध्ये पांढरी फुले अर्पण करावीत. आर्थिक स्थिती चांगली राहील. व्यवसाय नोकरीमध्ये आर्थिक नियोजन करू शकाल. व्यवसायामध्ये नवीन संधी उपलब्ध होतील. नवीन गाठीभेठी होतील. आर्थिक क्षेत्रात काम करणाऱ्यांना योग्य दिवस आहे. सर्वांचे सहकार्य लाभेल.
आजचा रंग – गडद गुलाबी

सिंह
श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करावा. भाग्यकारक घटनांचा दिवस. महत्वाच्या कामांचे निर्णय घ्यावेत. महत्वकांक्षी योजना राबवण्यासाठी उत्तम ग्रहमान. चांगल्या प्रवासाचे योग येतील. व्यावसायिकांना चांगल्या संधी उपलब्ध होतील.
आजचा रंग – पांढरा

कन्या
श्री दत्तात्रय नम: या मंत्राचा जप करावा. आर्थिक उलाढाल जपून करावी. वाद-विवाद टाळावेत. स्थावर मालमत्ता, शेअरशी निगडीत मंडळींनी काळजी घ्यावी. मोठी गुंतवणूक करत असताना वरिष्ठांचा सल्ला घ्यावा. उष्णतेच्या विकारांची काळजी घ्यावी.
आजचा रंग – निळा

तुळ
दत्त मंदिरामध्ये निशिगंधाची फुले अर्पण करावीत. सर्व लाभांसाठी उपयुक्त दिवस. महत्वाच्या निर्णयांची अंमलबजावणी करावी. महत्वकांक्षी योजनांचा पाठपुरावा करावा. आर्थिक क्षेत्रात काम करणाऱ्या मंडळींनी सावधानता बाळगावी. प्रवासाचे योग
आजचा रंग – आकाशी

वृश्चिक
दत्त मंदिरामध्ये पांढऱ्या पदार्थाचे अन्नदान करावे. अधिकारा वर्गासाठी लाभदायक संधी उपलब्ध होतील. ज्येष्ठांशी निगडीत सुवार्ता समजेल. कर्ज प्रकरणांचा पाठपुरावा करावा. आर्थिक येणी वसूल होण्याच्या दृष्टीने चांगला दिवस. नोकरीमध्ये मोठ्या जबाबदाऱ्या स्वीकाराव्या लागतील. कामाचा ताण वाढेल.
आजचा रंग – पिवळा

धनु
श्री भानवे नम: या मंत्राचा जप करावा. सुसंधी प्राप्त होतील. नोकरी व्यवसायांमध्ये उत्तम सहकार्य लाभेल. परदेशाशी निगडीत व्यापार नोकरीमध्ये चांगल्या संधी निर्माण होतील. कामाचा ताण वाढेल. प्रवासाचे योग.
आजचा रंग – पांढरा

मकर
ओम अंतिद्रेयाय नम: या मंत्राचा जप करावा. प्रवास जपून करावे. आर्थिक निर्णय घेताना सल्लामसलत करावी. सहकाऱ्यांशी, कामगारांशी वाद-विवाद टाळावेत. स्थावर मालमत्तेचे व्यवहार सावधपणे करावेत. वातविकार आणि उष्णतेचे विकार असलेल्यांनी विशेष काळजी घ्यावी.
आजचा रंग – पिवळा

कुंभ
ओम राहवै नम: या मंत्राचा जप करावा. कौटुंबिक सौख्य लाभेल. व्यवसायांमध्ये नवीन संधी उपलब्ध होतील. नवीन कामांचा पाठपुरावा करावा. प्रवासाचे योग आहेत.
आजचा रंग – नारंगी

मीन
दत्त महाराजांच्या मंदिरात पांढरी फुले अर्पण करावीत. प्रकृतीची काळजी घ्यावी. प्रवास जपून करावेत. वादविवाद टाळवेत. कामगारांशी जुळवून घ्यावे. ज्येष्ठांच्या प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल.
आजचा रंग – गडद लाल

डॉ. योगेश मुळे

Dr. of Astrology, Dr. of Astro-Vastu