मेष
ओम ही क्लीम श्रीं या बीज मंत्राचा ११ वेळा जप करून दिवसाची सुरूवात करावी. आज चंद्राचे भ्रमण मकर राशीत आहे. मोठ्या जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतील. अधिकारी वर्गासाठी उत्तम ग्रहमान. मोठे निर्णय घेऊ शकाल. बांधकाम व्यावसायिकांना अनुकूल ग्रहमान. लोखंडाशी निगडीत व्यापार करणाऱ्यांनी सावधानता बाळगावी.
आजचा रंग – लाल

वृषभ
गुरूंचे आणि गणपतीचे स्मरण ठेवावे. कार्यात ज्येष्ठांचा आशिर्वाद घ्यावा. आज चंद्राचे भ्रमण मकर राशीत आहे. सामाजिक प्रतिष्ठा लाभेल. व्यवसाय, नोकरीमध्ये उत्तम ग्रहमान. वरिष्ठांची कर्जी राहील. मोठी आर्थिक उलाढाल करू नये. परदेशाशी निगडीत व्यापार व्यवसायामध्ये यश. दूरचे प्रवास संभवतात.
आजचा रंग – पांढरा

मिथुन
कुलस्वामिनीचे दर्शन घ्यावे आणि देवी कवचाचे पाठ करावेत. आज चंद्राचे भ्रमण मकर राशीत आहे. प्रवास जपून करावेत. मोठा निर्णय घेत असताना सल्लामसलत करावे. ज्येष्ठांच्या प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल. आर्थिक उलाढाल जपून करावी.
आजचा रंग – आकाशी

कर्क
गणपती अर्थव शीर्ष म्हणून दिवसाची सुरूवात करावी. आज चंद्राचे भ्रमण मकर राशीत आहे. कौटुंबिक सौख्याचा दिवस. कुटुंबासमवेत वेळ घालवू शकाल. प्रवासाचे योग संभवतात. व्यवसायामध्ये प्रगतीकारक वातावरण आहे. वादविवाद टाळावेत. शेतीशी निगडीत व्यवसायामध्ये यश संभवतात.
आजचा रंग – लाल

सिंह
कुलदैवतेचे पुजन व स्मरण करून दिवसाची सुरूवात करावी. आज चंद्राचे भ्रमण मकर राशीत आहे. प्रकृतीची काळजी घेणे. नोकरी व्यवसायामध्ये प्रगतीकारक ग्रहमान आहे. दूरच्या प्रवासाचे योग संभवतात. वाहने जपून चालवावी. आर्थिक उलाढाल जपून करावी.
आजचा रंग – गुलाबी

कन्या
गणपती मंदिरामध्ये लाल फुल अर्पण करणे. आज चंद्राचे भ्रमण मकर राशीत आहे. कौटुंबिक सौख्य लाभेल. घरातील भावंडं आणि मुलांशी निगडीत प्रश्न सोडवू शकाल. छोट्या सहलीचे योग संभवतात. व्यवसायामध्ये महत्वाचे निर्णय घेऊ शकाल.
आजचा रंग – राखाडी

तुळ
ओम गं गणपतेय नम: या मंत्राचा जप करावा. आज चंद्राचे भ्रमण मकर राशीत आहे. कुटुंबाशी निगडीत समस्या सोडवू शकाल. राहत्या घराचे प्रश्न सोडवण्यासाठी उत्तम ग्रहमान आहे. कौटुंबिक सौख्य लाभेल. प्रवासाचे योग संभवतात. वादविवाद टाळावेत.
आजचा रंग – राखाडी

वृश्चिक
गणपती अर्थव शीर्षाचे पाठ करावेत. आज चंद्राचे भ्रमण मकर राशीत आहे. व्यावसायिकांना कामामध्ये स्पर्धा जाणवेल. आर्थिक आवक चांगली राहील. नातेवाईकांमध्ये वेळ आनंदी जाईल. वादविवाद टाळावेत.
आजचा रंग – हिरवा

धनु
मारूती मंदिरामध्ये अन्नदान करावे. आज चंद्राचे भ्रमण मकर राशीत आहे. आर्थिक स्थिती उत्तम राहील. कर्ज प्रकरणांचा पाठपुरावा करावा. जुनी येणी वसूल होण्याच्या दृष्टीने उत्तम ग्रहमान. आर्थिक स्थिरता येईल.
आजचा रंग – पांढरा

मकर
गणपती मंदिरामध्ये अन्नदान करावे. आज चंद्राचे भ्रमण मकर राशीत आहे. महत्वाची कामे पूर्ण करू शकाल. आनंदी दिवस. महत्वाच्या कामाचा पाठपुरावा करावा. व्यवसायामध्ये प्रगतीकारक ग्रहमान.
आजचा रंग – हिरवा

कुंभ
मारूतीचे दर्शन घ्यावे आणि अन्नदान करावे. आज चंद्राचे भ्रमण मकर राशीत आहे. व्यवसायामध्ये उलाढाल जपून करावी. वादविवाद टाळावेत. महत्वाचे निर्णय घेत असताना सल्ला मसलत करावीत. मोठी आर्थिक उलाढाल करू नये. दगदगीचे प्रवास संभवतात.
आजचा रंग- नारंगी

मीन
मारूती स्त्रोत म्हणावे. आज चंद्राचे भ्रमण मकर राशीत आहे. सर्व प्रकारच्या लाभांनी युक्त दिवस. महत्वाचे निर्णय घेऊ शकाल. कर्ज प्रकरणांचा पाठपुरावा करावा. महत्वाचे आर्थिक निर्णय घेऊ शकाल. जुन्या मित्र मंडळींबरोबर वेळ घालवू शकाल.
आजचा रंग – आकाशी

डॉ. योगेश मुळे

Dr. of Astrology, Dr. of Astro-Vastu