मेष
ओम भानवै नम: या मंत्राचा जप करावा. आज चंद्राचे भ्रमण स.९.३७ नंतर वृषभ राशीत असेल. उत्तम आर्थिक स्थितीचे दिवस. जुनी येणी वसूल करू शकाल. तुमच्या कार्यक्षेत्रात प्रतिष्ठा वाढेल. स्थिरता प्राप्त होईल. प्रवासाचे योग संभवतात.
आजचा रंग – नारंगी

वृषभ
मारूतीचे दर्शन घ्यावे आणि अन्नदान करावे. आज चंद्राचे भ्रमण स. ९.३७ नंतर वृषभ राशीत असेल. भाग्यकारक घटनांचा दिवस. महत्वपूर्ण निर्णय घेऊ शकाल. आर्थिक व्यवहारात सावधानता बाळगावी. नवीन हितसंबंध जुळतील. प्रवासाचे योग संभवतात.
आजचा रंग – हिरवा

मिथुन
गणपती मंदिरात अन्नदान करावे. आज चंद्राचे भ्रमण स. ९.३७ नंतर वृषभ राशीत असेल. वादविवाद टाळावेत. आर्थिक उलाढाल जपून करावी. मोठे निर्णय सावधपणे घ्यावेत. उसने पैसे देऊ नयेत.
आजचा रंग – पांढरा

कर्क
मारूती मंदिरात अन्नदान करावे. आज चंद्राचे भ्रमण स.९.३७ नंतर वृषभ राशीत असेल. सर्व लाभांनी युक्त ग्रहमान. महत्वाचे निर्णय घेताना सल्लामसलत करावी. आर्थिक स्थिती उत्तम राहील. प्रगतीकारक ग्रहमान.
आजचा रंग – पिवळा

सिंह
गणपती अथर्व शीर्षाचे पाठ करावेत. आज चंद्राचे भ्रमण स.९.३७ नंतर वृषभ राशीत असेल. अधिकारी वर्गासाठी आर्थिक लाभ उत्तम. नोकरदारांना आज दगदगीच्या प्रवासाचे योग. कमोडिटी, शेअर्स, बँकिंग क्षेत्रातील गुंतवणूकदारांना आज अनुकूल ग्रहमान.
आजचा रंग – गुलाबी

कन्या
ओम गं गणपतेय नम: या मंत्राचा जप करावा. आज चंद्राचे भ्रमण स.९.३७ नंतर वृषभ राशीत असेल. प्रगतीकारक ग्रहमान. कौटुंबिक सौख्य लाभेल. दूरच्या प्रवासाचे योग संभवतात. प्रकृतीची काळजी घ्यावी.
आजचा रंग – लाल

तुळ
गणपती मंदिरामध्ये लाल फुल अर्पण करावी. आज चंद्राचे भ्रमण स.९.३७ नंतर वृषभ राशीत असेल. प्रकृतीची काळजी घेणे. व्यवसायामध्ये मोठे धाडस करू नये. लोखंडाशी निगडीत व्यापार करणाऱ्यांनी दक्षता बाळगणे. शेतीशी निगडीत व्यवसायासाठी अनुकूल.
आजचा रंग – पांढरा

वृश्चिक
कुलदैवतेचे पूजन व स्मरण करून दिवसाची सुरूवात करावी. आज चंद्राचे भ्रमण स.९.३७ नंतर वृषभ राशीत असेल. व्यावसायिक प्रगतीचे दिवस. उत्तम संधी उपलब्ध होतील. कुटुंबासमवेत आनंदी वेळ घालवू शकाल. प्रवसाचे योग. कौटुंबिक सौख्याचा दिवस.
आजचा रंग – आकाशी

धनु
गणपती अथर्व शीर्ष म्हणून दिवसाची सुरूवात करावी. आज चंद्राचे भ्रमण स.९.३७ नंतर वृषभ राशीत असेल. आर्थिक स्थिती उत्तम राहील. विद्यार्थ्यांना, व्यावसायिकांना, नोकरदारांना नवीन संधी उपलब्ध होतील. प्रकतीची काळजी घेणे. पचनाशी निगडीत विकारांकडे दुर्लक्ष करू नये. प्रवास जपून करावेत. वाहने सावकाशी चालवावीत.
आजचा रंग – नारंगी

मकर
कुलस्वामिनीचे दर्शन घ्यावे आणि देवी कवचाचे पाठ करावेत. आज चंद्राचे भ्रमण स.९.३७ नंतर वृषभ राशीत असेल. महत्वकांक्षी निर्णयांचा दिवस. व्यावसायिकांना नव्या संधी उपलब्ध होऊ शकतील. नोकरदारांना बदलाची शक्यता. संततीशी निगडीत प्रश्न सोडवू शकाल. प्रवासाचे योग संभवतात.
आजचा रंग – नारंगी

कुंभ
गुरूंचे आणि गणपतीचे स्मरण ठेवावे. कार्यात ज्येष्ठांचा आशीर्वाद घ्यावा. आज चंद्राचे भ्रमण स.९.३७ नंतर वृषभ राशीत असेल. कौटुंबिक स्थिरता जाणवेल. कुटुंबातील सदस्यांबरोबर वेळ घालवू शकाल. छोट्या सहलीचे योग. राहत्या घराशी निगडीत प्रकरणे मार्गी लावू शकाल. आर्थिक स्थिती उत्तम राहील.
आजचा रंग- राखाडी

मीन
ओम ऱ्हीं क्लीम श्रीं या बीज मंत्राचा ११ वेळा जप करून दिवसाची सुरूवात करावी. आज चंद्राचे भ्रमण स.९.३७ नंतर वृषभ राशीत असेल. व्यावसायिक स्पर्धा वाढेल. नोकरी व्यवसायात प्रगतीकारक ग्रहमान. व्यवसायाच्या नवीन संधी उपलब्ध होतील. प्रवासाचे योग संभवतात. भावंडांशी वादविवाद टाळावेत.
आजचा रंग – पांढरा

डॉ. योगेश मुळे

Dr. of Astrology, Dr. of Astro-Vastu