मेष

ओम श्री आदि गुरूवे नम: या मंत्राचा जप करणे. सकाळी ११.३५ नंतर चंद्र भ्रमण मकर राशीत असेल. अधिकारी वर्गासाठी लाभदायक संधी उपलब्ध होतील. ज्येष्ठांशी निगडीत सुवार्ता समजेल. कर्ज प्रकरणांचा पाठपुरावा करावा. आर्थिक येणी वसूल होण्याच्या दृष्टीने चांगला दिवस. नोकरीमध्ये मोठ्या जबाबदाऱ्या स्वीकाराव्या लागतील. कामाचा ताण वाढेल.
आजचा रंग – पिवळा

वृषभ
ओम श्री आदि गुरूवे नम: या मंत्राचा जप करणे. सकाळी ११.३६ नंतर चंद्रभ्रमण मकर राशीत असेल. सुसंधी प्राप्त होतील. नोकरी व्यवसायामध्ये उत्तम सहकार्य लाभेल. परदेशाशी निगडीत व्यापार, नोकरीमध्ये चांगल्या संधी निर्माण होतील. कामाचा ताण वाढेल. प्रवासाचे योग.
आजचा रंग – पांढरा

मिथुन
दत्त महाराजांच्या आणि गणपती मंदिरात फुले अर्पण करणे. सकाळी ११.३६ नंतर चंद्रभ्रमण मकर राशीत असेल. प्रवास जपून करावेत. आर्थिक निर्णय घेताना सल्लामसलत करावी. सहकाऱ्यांशी, कामगारांशी वादविवाद टाळावेत. स्थावर मालमत्तेचे व्यवहार सावधपणे करावेत. वातविकार आणि उष्णतेचे विकार असलेल्यांनी विशेष काळजी घ्यावी.
आजचा रंग – नारंगी

कर्क
ओम श्री आदि गुरूवे नम: या मंत्राचा जप करणे. सकाळी ११.३६ नंतर चंद्रभमण मकर राशीत असेल. कौटुंबिक सौख्य लाभेल. व्यवसायामध्ये नवीन संधी उपलब्ध होतील. नवीन कामाचा पाठपुरावा करावा. प्रवासाचे योग आहेत.
आजचा रंग – निळा

सिंह
दत्त महाराजांच्या आणि गणपती मंदिरात फुले अर्पण करणे. सकाळी ११.३६ नंतर चंद्रभ्रमण मकर राशीत असेल. प्रकृतीची काळजी घ्यावी. प्रवास जपून करावेत. वादविवाद टाळावेत. कामगारांशी जुळवून घ्यावे. ज्येष्ठांच्या प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल.
आजचा रंग – पिवळा

कन्या
गणपती मंदिरात पांढऱ्या वस्तूचे अर्पण करावे. सकाळी ११.३६ नंतर चंद्रभमण मकर राशीत असेल. व्यवसायामध्ये प्रगतीकारक ग्रहमान. नोकरदारांमध्ये मोठ्या जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतील. संततीशी निगडीत प्रश्न सोडवू शकाल. आर्थिक नियोजन उत्तम राहील. दूरच्या प्रवासाचे योग येतील.
आजचा रंग – नारंगी

तुळ
गणपती मंदिरामध्ये अभिषेक करावा. सकाळी ११.३६ नंतर चंद्रभ्रमण मकर राशीत असेल. कौटुंबिक सौख्याचा दिवस. कुटुंबासमवेत सहलीचे किंवा प्रवासाचे योग. राहत्या घराचे प्रश्न सोडवू शकाल. कर्ज प्रकरणांचा पाठपुरावा करावा.
आजचा रंग – पिवळा

वृश्चिक
कुलस्वामिनीचे दर्शन घ्यावे. सकाळी ११.३६ नंतर चंद्रभ्रमण मकर राशीत असेल. धाडसी निर्णय घेऊ शकाल. भावंडांशी, आप्तेष्टांशी वाद टाळावेत. प्रवासाचे योग संभवतात. पगारवाढ किंवा बदलीसाठी प्रयत्न करावेत. व्यवसायामध्ये कामगिरी उत्तम राहील.
आजचा रंग – पांढरा

धनु
ओम गं गणपतेय नम: या मंत्राचा जप करणे. सकाळी ११.३६ नंतर चंद्रभ्रमण मकर राशीत असेल. आर्थिक स्थिती चांगली राहील. व्यवसाय, नोकरीमध्ये आर्थिक नियोजन करू शकाल. व्यवसायामध्ये नवीन संधी उपलब्ध होतील. नवीन गाठीभेटी होतील. आर्थिक क्षेत्रांत काम करणाऱ्यांना योग्य दिवस आहे. सर्वांचे सहकार्य लाभेल.
आजचा रंग – आकाशी

मकर
गणपती मंदिरामध्ये गुळ खोबऱ्याचा नेवैद्य दाखवावा. सकाळी ११.३६ नंतर चंद्रभ्रमण मकर राशीत असेल. भाग्यकारक घटनांचा दिवस. महत्वाच्या कामाचे निर्णय घ्यावेत. महत्वकांक्षी योजना राबवण्यासाठी उत्तम ग्रहमान. चांगल्या प्रवासाचे योग येतील. व्यावसायिकांना चांगल्या संधी उपलब्ध होतील.
आजचा रंग – मोरपंखी

कुंभ
गणपती व दत्त महाराजांच्या मंदिरामध्ये फुले अर्पण करुन दिवसाची सुरूवात करावी. सकाळी ११.३६ नंतर चंद्रभ्रमण मकर राशीत असेल. आर्थिक उलाढाल जपून करावेत. वादविवाद टाळोवत. स्थावर मालमत्ता, शेअरशी निगडीत मंडळींनी काळजी घ्यावी. मोठी गुंतवणूक करत असताना वरिष्ठांचा सल्ला घ्यावा. उष्णतेच्या विकारांची काळजी घ्यावी.
आजचा रंग – पांढरा

मीन
दत्त महाराजांची उपासना करणे. सकाळी ११.३६ नंतर चंद्रभ्रमण मकर राशीत असेल. सर्व लाभांसाठी उपयुक्त दिवस. महत्वाच्या निर्णयाची अंमलबजावणी करावी. महत्वकांक्षी योजनांचा पाठपुरावा करावा. आर्थिक क्षेत्रांमध्ये काम करणाऱ्यांना सावधानता बाळगावी. प्रवासाचे योग.
आजचा रंग – पोपटी

डॉ. योगेश मुळे

Dr. of Astrology, Dr. of Astro-Vastu