मेष
दत्त महाराजांच्या मंदिरात दर्शन घ्यावे. आज चंद्राचे भ्रमण स.११.५६ नंतर मिथुन राशीत असेल. व्यावसायिक स्पर्धा वाढेल. नोकरी व्यवसायात प्रगतीकारक ग्रहमान. व्यवसायाच्या नवीन संधी प्राप्त होतील. प्रवासाचे योग संभवतात. भावंडांशी वादविवाद टाळावेत.
आजचा रंग – गडद निळा

वृषभ
आज पांढऱ्या वस्तूंचे दान दत्त मंदिरात करावे. आज चंद्राचे भ्रमण स.११.५६ नंतर मिथुन राशीत असेल. उत्तम आर्थिक स्थितीचे दिवस. जुनी येणी वसूल करू शकाल. तुमच्या कार्यक्षेत्रात प्रतिष्ठा वाढेल. स्थिरता प्राप्त होईल. प्रवासाचे योग संभवतात.
आजचा रंग – पिवळा

मिथुन
ओम द्रा द्राी दत्तात्रय नम: या मंत्राचा जप करावा. आज चंद्राचे भ्रमण स.११.५६ नंतर मिथुन राशीत असेल. भाग्यकारक घटनांचा दिवस. महत्वपूर्ण निर्णय घेऊ शकाल. आर्थिक व्यवहारात सावधानता ठेवावी. नवीन हितसंबंध जुळतील. प्रवासाचे योग संभवतात.
आजचा रंग – सोनेरी

कर्क
ओम द्रा द्री दत्तात्रयाय नम: या मंत्राचा जप करावा. आज चंद्राचे भ्रमण स. ११.५६ नंतर मिथुन राशीत असेल. वादविवाद टाळावेत. आर्थिक उलाढाल जपून करावी. मोठे निर्णय सावधपणे घ्यावेत. उसने पैसे देऊ नयेत.
आजचा रंग – लाल

सिंह
ओम शांभवै नम: या मंत्राचा जप करावा. आज चंद्राचे भ्रमण स.११.५६ नंतर मिथुन राशीत असेल. सर्व लाभांनी युक्त ग्रहमान. महत्वाचे निर्णय घेताना सल्लामसलत करावी. आर्थिक स्थिती उत्तम राहील. प्रगतीकारक ग्रहमान.
आजचा रंग – गुलाबी

कन्या
ओम श्री आदि गुरवे नम: या मंत्राचा जप करावा. आज चंद्राचे भ्रमण स.११.५६ नंतर मिथुन राशीत असेल. अधिकारी वर्गासाठी उत्तम ग्रहमान. व्यवसायामध्ये आर्थिक लाभ उत्तम. नोकरदारांना आज दगदगीच्या प्रवासाचे योग. कमोडिटी, शेअर्स, बँकिंग, क्षेत्रातील गुंतवणूकदारांना आज अनुकूल ग्रहमान.
आजचा रंग – हिरवा

तुळ
दत्त मंदिरात पांढरी फुले अर्पण करावे. ओम श्री आदि गुरवे नम: या मंत्राचा २१ वेळा जप करावा. आज चंद्राचे भ्रमण स.११.५६ नंतर मिथुन राशीत असेल. प्रगतीकारक ग्रहमान. कौटुंबिक सौख्य लाभेल. दूरच्या प्रवासाचे योग संभवतात. प्रकृतीची काळजी घ्यावी.
आजचा रंग – फिकट हिरवा

वृश्चिक
ओम श्रीं दत्तात्रय नम: या मंत्राचा जप करावा. आज चंद्राचे भ्रमण स.११.५६ नंतर मिथुन राशीत असेल. प्रकृतीची काळजी घेणे. व्यवसायामध्ये मोठे धाडस करू नये. लोखंडाशी निगडीत व्यापार करणाऱ्यांनी दक्षता बाळगणे. शेतीशी निगडीत व्यवसायासाठी अनुकूल ग्रहमान.
आजचा रंग – नारंगी

धनु
गणपती पूजन अथर्व शीर्षाचे पाठ करावे. आज चंद्राचे भ्रमण स.११.५६ नंतर मिथुन राशीत असेल. व्यावसायिक प्रगतीचे दिवस. उत्तम संधी उपलब्ध होतील. कुटुंबासमवेत आनंदी वेळ घालवू शकाल. प्रवासाचे योग. कौटुंबिक सौख्याचा दिवस.
आजचा रंग – पांढरा

मकर
दत्त महाराजांच्या मंदिरात पांढरे पदार्थ अर्पण करावे. आज चंद्राचे भ्रमण स.११.५६ नंतर मिथुन राशीत असेल. आर्थिक स्थिती उत्तम राहील. विद्यार्थ्यांना, व्यावसायिकांना, नोकरदारांना नवीन संधी उपलब्ध होतील. प्रकृतीची काळजी घेणे. पचनाशी निगडीत विकारांकडे दुर्लक्ष करू नये. प्रवास जपून करावेत. वाहने सावकाश चालवावीत.
आजचा रंग – मोरपंखी

कुंभ
लक्ष्मी अष्टकाचे पाठ करावे. आज चंद्राचे भ्रमण स.११.५६ नंतर मिथुन राशीत असेल. महत्वकांक्षी निर्णयांचा दिवस. व्यावसायिकांना नव्या संधी उपलब्ध होऊ शकतील. नोकरदारांना बदलांची शक्यता. संततीशी निगडीत प्रश्न सोडवू शकाल. प्रवासाचे योग संभवतात.
आजचा रंग- निळा

मीन
ओम द्रा दत्तात्रयाय नम: या मंत्राचा जप करावा. आज चंद्राचे भ्रमण स.११.५६ नंतर मिथुन राशीत असेल. कौटुंबिक स्थिरता जाणवेल. कुटुंबातील सदस्यांबरोबर वेळ घालवू शकाल. छोट्या सहलीचे योग. राहत्या घराशी निगडीत प्रकरणे मार्गी लावू शकाल. आर्थिक स्थिती उत्तम राहील.
आजचा रंग – आकाशी

डॉ. योगेश मुळे

Dr. of Astrology, Dr. of Astro-Vastu