मेष
कुलस्वामिनीचे चिंतन करावे. चंद्राचे भ्रमण मेष राशीमध्ये असेल. भाग्यकारक घटनांचा दिवस. महत्वाच्या कामाचे निर्णय घ्यावेत. महत्वकांक्षी योजना राबवण्यासाठी उत्तम ग्रहमान. चांगल्या प्रवासाचे योग येतील. व्यावसायिकांना चांगल्या संधी उपलब्ध होतील.
आजचा रंग – ऑफ व्हाइट

वृषभ
कुलदैवताचे स्मरण आणि दर्शन करावे. चंद्राचे भ्रमण मेष राशीमध्ये असेल. आर्थिक उलाढाल जपून करावी. वादविवाद टाळावेत. स्थावर मालमत्ता, शेअरशी निगडीत मंडळींनी काळजी घ्यावी. मोठी गुंतवणूक करत असताना वरिष्ठांचा सल्ला घ्यावा. उष्णतेच्या विकारांची काळजी घ्यावी.
आजचा रंग – पिवळा

मिथुन
गणपती दर्शन आणि गणपती स्त्रोत पठण करणे. चंद्राचे भ्रमण मेष राशीमध्ये असेल. सर्व लाभांसाठी उपयुक्त दिवस. महत्वाच्या निर्णयांची अंमलबजावणी करावी. महत्वकांक्षी योजनांचा पाठपुरावा करावा. आर्थिक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या मंडळींनी सावधानता बाळगावी. प्रवासाचे योग.
आजचा रंग – नारंगी

कर्क
गणपती स्त्रोत म्हणावे. चंद्राचे भ्रमण मेष राशीमध्ये असेल. अधिकारी वर्गासाठी लाभदायक संधी उपलब्ध होतील. ज्येष्ठांशी निगडीत सुवार्ता समजेल. कर्ज प्रकरणांचा पाठपुरावा करावा. आर्थिक येणी वसूल होण्याच्या दृष्टीने चांगला दिवस. नोकरीमध्ये मोठ्या जबाबदाऱ्या स्वीकाराव्या लागतील. कामाचा ताण वाढेल.
आजचा रंग – पोपटी

सिंह
ओम गं गणपतैय नम: या मंत्राचा जप करावा. चंद्राचे भ्रमण मेष राशीमध्ये असेल. सुसंधी प्राप्त होतील. नोकरी व्यवसायामध्ये उत्तम सहकार्य लाभेल. परदेशाशी निगडीत व्यापार, नोकरीमध्ये चांगल्या संधी निर्माण होतील. कामाचा ताण वाढेल. प्रवासाचे योग.
आजचा रंग – हिरवा

कन्या
दक्षिणमुखी मारूतीचे दर्शन घेणे. चंद्राचे भ्रमण मेष राशीमध्ये असेल. प्रवास जपून करावेत. आर्थिक निर्णय घेताना सल्लामसलत करावी. सहकाऱ्यांशी, कामगारांशी वादविवाद टाळावेत. स्थावर मालमत्तेचे व्यवहार सावधपणे करावेत. वातविकार आणि उष्णेतेचे विकार असलेल्यांनी विशेष काळजी घ्यावी.
आजचा रंग – जांभळा

तुळ
लक्ष्मी दर्शन घ्यावे. चंद्राचे भ्रमण मेष राशीमध्ये असेल. कौटुंबिक सौख्य लाभेल. व्यवसायामध्ये नवीन संधी उपलब्ध होतील. नवीन कामचा पाठपुरावा करावा. प्रवासाचे योग आहेत.
आजचा रंग – पिवळा

वृश्चिक
मारूतीचे दर्शन घ्यावे. चंद्राचे भ्रमण मेष राशीमध्ये असेल. प्रकृतीची काळजी घ्यावी. प्रवास जपून करावेत. वादविवाद टाळावेत. कामगारांशी जुळवून घ्यावेत. ज्येष्ठांच्या प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल.
आजचा रंग – नारंगी

धनु
ओम श्रीं क्लींम भगवतैय नम: या मंत्राचा जप करावा. चंद्राचे भमण मेष राशीमध्ये असेल. व्यवसायामध्ये प्रगतीकारक ग्रहमान. नोकरदारांना मोठ्या जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतील. संततीशी निगडीत प्रश्न सोडवू शकाल. आर्थिक नियोजन उत्तम राहील. दूरच्या प्रवासाचे योग येतील.
आजचा रंग – पांढरा

मकर
गणपती आणि मारूतीचे दर्शन घ्यावे. चंद्राचे भ्रमण मेष राशीमध्ये असेल. कौटुंबिक सौख्याचा दिवस. कुटुंबासमवेत सहलीचे किंवा प्रवासाचे योग. राहत्या घराचे प्रश्न सोडवू शकाल. कर्ज प्रकरणांचा पाठपुरावा करावा.
आजचा रंग – आकाशी

कुंभ
गणपती अर्थव शीर्ष पठण करावे. चंद्राचे भ्रमण मेष राशीमध्ये असेल. धाडसी निर्णय घेऊ शकाल. भावंडांशी, आप्तेष्ठांशी वाद टाळावेत. प्रवासाचे योग संभवतात. पगारवाढ किंवा बदलीसाठी प्रयत्न करावेत. व्यवासायामध्ये कामगिरी उत्तम राहील.
आजचा रंग – निळा

मीन
मारूती स्त्रोत म्हणावे. चंद्राचे भ्रमण मेष राशीमध्ये असेल. आर्थिक स्थिती चांगली राहील. व्यवसाय, नोकरीमध्ये आर्थिक नियोजन करू शकाल. व्यवसायामध्ये नवीन संधी उपलब्ध होतील. नवीन गाठीभेटी होतील. आर्थिक क्षेत्रात काम करणाऱ्यांना योग्य दिवस आहे. सर्वांचे सहकार्य लाभेल.
आजचा रंग – केशरी

डॉ. योगेश मुळे

Dr. of Astrology, Dr. of Astro-Vastu