मेष श्री बुधाय नम: या मंत्राचा जप करावा. चंद्राचे भ्रमण मेष राशीमध्ये आहे. भाग्यकारक घटनांचा दिवस आहे. महत्वाच्या कामांचे निर्णय घ्यावेत. महत्वकांक्षी योजना राबवण्यासाठी उत्तम ग्रहमान. चांगल्या प्रवासाचे योग येतील. व्यावसायिकांना चांगल्या संधी उपलब्ध होतील. आजचा रंग – ऑफ व्हाइट वृषभ कालभैरवाचे दर्शन घ्यावे. आर्थिक उलाढाल जपून करावी. वादविवाद टाळावेत. स्थावर मालमत्ता, शेअरशी निगडीत मंडळींनी काळजी घ्यावी. मोठी गुंतवणूक करत असताना वरिष्ठांचा सल्ला घ्यावा. उष्णतेच्या विकारांची काळजी घ्यावी. आजचा रंग – पिवळा मिथुन कुलदैवताचे स्मरण करावे. सर्व लाभांसाठी उपयुक्त दिवस. महत्वाच्या निर्णयांची अंमलबजावणी करावी. महत्वकांक्षी योजनांचा पाठपुरावा करावा. आर्थिक क्षेत्रांमध्ये काम करणाऱ्या मंडळींनी सावधानता बाळगावी. आजचा रंग – नारंगी कर्क घरामध्ये तुपाचा दिवसा लावून ओम श्री नम: या मंत्राचा जप करावा. अधिकारी वर्गासाठी लाभदायक संधी उपलब्ध होतील. ज्येष्ठांशी निगडीत सुवार्ता समजतील. कर्ज प्रकरणांचा पाठपुरावा करावा. आर्थिक येणी वसूल होण्याच्या दृष्टीने चांगला दिवस. नोकरीमध्ये मोठ्या जबाबदाऱ्या स्वीकाराव्या लागतील. कामाचा ताण वाढेल. आजचा रंग – पोपटी सिंह सकाळी गणपती दर्शन घ्यावे. सुसंधी प्राप्त होतील. नोकरी व्यवसायामध्ये उत्तम सहकार्य लाभेल. परदेशाशी निगडीत व्यापार, नोकरीमध्ये चांगल्या संधी निर्माण होतील. कामाचा ताण वाढेल. प्रवासाचे योग. आजचा रंग – जांभळा कन्या कुलस्वामिनीचे दर्शन घ्यावे. प्रवास जपून करावेत. आर्थिक निर्णय घेताना सल्लामसलत करावी. सहकाऱ्यांशी, कामगारांशी वादविवाद टाळावेत. स्थावर मालमत्तेचे व्यवहार सावधपणे करावेत. वातविकार आणि उष्णतेचे विकार असलेल्यांनी विशेष काळजी घ्यावी. आजचा रंग – जांभळा तुळ कुलस्वामिनीचे दर्शन घ्यावे. कौटुंबिक सौख्य लाभेल. व्यवसायामध्ये नवीन संधी उपलब्ध होतील. नवीन कामाचा पाठपुरावा करावा. प्रवासाचे योग आहेत. आजचा रंग - जांभळा वृश्चिक गणपती मंदिरामध्ये तांबडे फुले अर्पण करावीत. प्रकृतीची काळजी घ्यावी. प्रवास जपून करावेत. वादविवाद टाळावेत. कामगारांशी जुळवून घ्यावेत. ज्येष्ठांच्या प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल. आजचा रंग – नारंगी धनु कालभैराव दर्शन घेणे. व्यवसायामध्ये प्रगतीकारक ग्रहमान. नोकरदारांना मोठ्या जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतील. संततीशी निगडीत प्रश्न सोडवू शकाल. आर्थिक नियोजन उत्तम राहील. दूरच्या प्रवासाचे योग येतील. आजचा रंग – पांढरा मकर शिव मानस पुजेचे वाचन करावे. कौटुंबिक सौख्याचा दिवस. कुटुंबासमवेत सहलीचे किंवा प्रवासाचे योग. राहत्या घराचे प्रश्न सोडवू शकाल. कर्ज प्रकरणांचा पाठपुरावा करावा. आजचा रंग – आकाशी कुंभ कुलस्वामिनीची ओटी भरावी. धाडसी निर्णय घेऊ शकाल. भावंडांशी, आप्तेष्ठांशी वाद टाळावेत. प्रवासाचे योग संभवतात. पगारवाढ किंवा बदलीसाठी प्रयत्न करावेत. व्यवसायामध्ये कामगिरी उत्तम राहील. आजचा रंग – निळा मीन गणपती अष्टक म्हणावे. आर्थिक स्थिती चांगली राहील. व्यवसाय नोकरीमध्ये आर्थिक नियोजन करू शकाल. व्यवसायामध्ये नवीन संधी उपलब्ध होतील. नवीन गाठीभेटी होतील. आर्थिक क्षेत्रात काम करणाऱ्यांना योग्य दिवस आहे. सर्वांचे सहकार्य लाभेल. आजचा रंग – केशरी डॉ. योगेश मुळे Dr. of Astrology, Dr. of Astro-Vastu