मेष
ओम श्रीं भानवे नम: जप करून दिवसाची सुरूवात करावी. आज चंद्राचे भ्रमण सिंह राशीत आहे. कौटुंबीक सौख्य लाभेल. घरातील लहान भावंड आणि मुलांशी निगडीत प्रश्न सोडवू शकाल. छोट्या सहलीचे योग संभवतात. व्यवसायामध्ये महत्वाचे निर्णय घेऊ शकाल. स्पर्धकांवर मात करू शकाल.
आजचा रंग – पांढरा

वृषभ
ओम श्री नम: या बीज मंत्राचा जप करणे. आज चंद्राचे भ्रमण सिंह राशीत आहे. कुटुंबाशी निगडीत समस्या सोडवू शकाल. राहत्या घराचे प्रश्न सोडवण्यासाठी उत्तम ग्रहमान आहे. कौटुंबीक सौख्य लाभेल. प्रवासाचे योग संभवतात. वादविवाद टाळावेत.
आजचा रंग – पांढरा

मिथुन
आज कालभैरव अष्टक म्हणावे. आज चंद्राचे भ्रमण सिंह राशीत आहे. व्यावसायिकांना कामामध्ये स्पर्धा जाणवेल. आर्थिक आवक चांगली राहील. नातेवाईकांमध्ये वेळ आनंदी जाईल. वादविवाद टाळावेत.
आजचा रंग – ऑफ व्हाइट

कर्क
ओम बुधाय नम: हा जप करावा. आज चंद्राचे भ्रमण सिंह राशीत आहे. आर्थिक स्थिती उत्तम राहील. कर्ज प्रकरणांचा पाठपुरावा करावा. जुनी येणी वसूल होण्याच्या दृष्टीने उत्तम ग्रहमान. आर्थिक स्थिरता येईल.
आजचा रंग – फिकट पिवळा

सिंह
गणपती मंदिरात गुळ खोबरे ठेऊन दिवसाचा प्रारंभ करावा. आज चंद्राचे भ्रमण सिंह राशीत आहे. महत्वाची कामे पूर्ण करू शकाल. आनंदी दिवस. महत्वाच्या कामांचा पाठपुरावा करावा. व्यवसायामध्ये प्रगतीकारक ग्रहमान.
आजचा रंग – नारंगी

कन्या
गणपती मंदिरात दर्शन घेऊन दिवसाची सुरूवात करणे. आज चंद्राचे भ्रमण सिंह राशीत आहे. व्यवसायामध्ये उलाढाल जपून करावी. वादविवाद टाळावेत. महत्वाचे निर्णय घेताना सल्ला मसलत करावी. मोठी आर्थिक उलाढाल करू नये. दगदगीचे प्रवास संभवतात.
आजचा रंग – निळा

तुळ
गणेश अष्टक म्हणून दिवसाची सुरूवात करणे. आज चंद्राचे भ्रमण सिंह राशीत आहे. सर्व प्रकारच्या लाभांनी युक्त दिवस. महत्वाचे निर्णय घेऊ शकाल. कर्ज प्रकरणांचा पाठपुरावा करावा. महत्वाचे आर्थिक निर्णय घेऊ शकाल. जुन्या मित्र मंडळींबरोबर वेळ घालवू शकाल.
आजचा रंग – नारंगी

वृश्चिक
ओम श्रीं भानवे नम: या मंत्राचा जप करून दिवसाची सुरूवात करावी. आज चंद्राचे भ्रमण सिंह राशीत आहे. मोठ्या जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतील. अधिकारी वर्गासाठी उत्तम ग्रहमान. मोठे निर्णय घेऊ शकाल. बांधकाम व्यावसायिकांना अनुकूल ग्रहमान. लोखंडाशी निगडीत व्यापाऱ्यांनी सावधानता बाळगावी.
आजचा रंग – केशरी

धनु
ओम श्रीं नम: या बीज मंत्राचा जप करणे. आज चंद्राचे भ्रमण सिंह राशीत आहे. सामाजिक प्रतिष्ठा लाभेल. व्यवसाय, नोकरीमध्ये उत्तम ग्रहमान. वरिष्ठांची मर्जी राहील. मोठी आर्थिक उलाढाल करू नये. परदेशाशी निगडीत व्यापार व्यवसायामध्ये यश. दूरचे प्रवास संभवतात.
आजचा रंग – राखाडी

मकर
कालीमातेचे दर्शन घेणे. आज चंद्राचे भ्रमण सिंह राशीत आहे. प्रवास जपून करावेत. मोठे निर्णय घेताना सल्ला मसलत करावी लागेल. ज्येष्ठांच्या प्रकृतीची काळजी करावी लागेल. आर्थिक उलाढाल जपून करावी.
आजचा रंग – पांढरा

कुंभ
ओम क्लींम श्रीं या मंत्राचा जप करणे. आज चंद्राचे भ्रमण सिंह राशीत आहे. कौटुंबीक सौख्याचा दिवस. कुटुंबासमवेत वेळ घालवू शकाल. प्रवासाचे योग संभवतात. व्यवसायामध्ये प्रगतीकारक वातावरण आहे. वादविवाद टाळावेत. शेतीशी निगडीत व्यवसायामध्ये यश संभवतात.
आजचा रंग- मोरपंखी

मीन
देवी कवचाचे पाठ करावेत. आज चंद्राचे भ्रमण सिंह राशीत आहे. प्रकतीची काळजी घेणे. नोकरी व्यवसायामध्ये प्रगतीकारक ग्रहमान आहे. दूरच्या प्रवासाचे योग संभवतात. वाहने जपून चालवावीत. आर्थिक उलाढाल जपून करावी.
आजचा रंग – पांढरा

डॉ. योगेश मुळे

Dr. of Astrology, Dr. of Astro-Vastu