19 October 2017

News Flash

वेरुळ येथील तीर्थ कुंडात बुडून भाविकाचा मृत्यू

दर्शनासाठी आलेला असताना घडला प्रकार

औरंगाबाद | Updated: August 5, 2017 2:57 PM

चिंचवडमध्ये रेल्वेच्या धडकेत एकाचा मृत्यू

औरंगाबाद जिल्ह्यातील वेरूळ येथील तीर्थ कुंडात बुडून एका तरुण भाविकाचा मृत्यू झाला. हा तरुण येथे दर्शनासाठी आलेला असताना हा प्रकार घडला असावा असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, योगेश किशनराव परमेश्वर (वय २१) असे मृत भाविकाचे नाव आहे. योगेश हा पैठण तालुक्यातील विहामांडवा या गावातील रहिवाशी आहे. श्रावण महिना सुरु असल्याने खुलताबाद येथील भद्रा मारुतीच्या दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात भाविक येत असतात. काहीजण वेरूळ येथील कुंडातून पाणी घेऊन मारुतीच्या दर्शनासाठी जातात. योगेश त्यासाठी गेला असावा असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. काही भाविक कुंडाकडे गेले असताना त्यांना या घटनेबाबत माहिती कळाली. त्यानंतर त्यांनी खुलताबाद पोलिसांना याची माहीती दिली. तत्काळ घटनास्थळी धाव घेत पोलिसांनी स्थानिकांच्या मदतीने मृतदेह पाण्याबाहेर काढला. वेरूळ शासकीय रुग्णालयात मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले. या प्रकरणाचा अधिक तपास सुरु आहे.

First Published on August 5, 2017 2:57 pm

Web Title: a pilgrim found dead at ellora pilgrimage at aurangabad district