देवीच्या चांदीच्या पादुका चोरीला गेल्याची तक्रार १८ फेब्रुवारीला औरंगाबाद येथील उस्मानपुरा पोलिसात दाखल करण्यात आली होती. त्या प्रकरणात पोलिसांनी आरोपीला अटक केली. त्याच्याकडून जप्त करण्यात आलेल्या देवाच्या पादुका पाच महिन्यानंतर पोलिसांनी तक्रारदाराला परत केल्या. औरंगाबाद शहरातील झाम्बड इस्टेटमध्ये राहणारे महेश जोशी यांनी १८ फेब्रुवारीला अज्ञात आरोपीने मंदिरात घुसून देवाच्या चांदीच्या पादुका चोरल्या असल्याची तक्रार उस्मानपुरा पोलिसात दिली होती. जोशी यांच्या तक्रारीनंतर उस्मानपुरा पोलिसांनी तपास करत देवाच्या पादुका चोरीचा छडा लावला. आरोपीला अटक करत त्याच्याकडून चोरीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

औरंगाबादमधील कोकनवाडी परिसरात राहणारा आरोपी सूर्यकांत उर्फ सनी याने पादुका चोरल्या असल्याचे पोलीस तपासात उघडं झालं. सनीला अटक करून त्याच्याकडून गुन्ह्याचा माल जप्त करण्यात आला. त्याच्याकडून जप्त करण्यात आलेल्या बारा हजार रुपये किंमतीच्या चांदीच्या पादुका बुधवारी न्यायालयाच्या परवानगीने तक्रारदार महेश जोशी यांना परत करण्यात आल्या.