औरंगाबाद महापालिका आयुक्त पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर आयुक्त डी. एम. मूगळीकर यांनी पालिका कर्मचाऱ्यांवर शिस्तीचा बडगा उचललाय. आज सकाळी नऊ वाजल्यापासून आयुक्तांनी पालिकेच्या सर्व विभागांची पहाणी केली. यावेळी बऱ्याच विभागातील कर्मचारी गैरहजर होते. अशा ‘लेटमार्क’ कर्मचाऱ्यांना आयुक्तांकडून कारणे दाखवा नोटीस बजावण्यात येणार आहे. ४८ तासात त्याला समर्पक उत्तर दिलं नाही तर, अशा कर्मचाऱ्यांवर कारवाईचा बडगा उचलण्यात येणार असल्याचं आयुक्तांनी सांगितलं.

 

aurngabad

पालिकेच्या ज्या विभागांना जागेची कमतरता आहे. त्यांना तात्काळ अतिरिक्त जागा उपलब्ध करण्यात येणार असल्याचंही आयुक्तांनी पाहणीनंतर सांगितलं. शिवाय जन्म मृत्यू विभाग तसेच अन्य महत्वाच्या विभागात डाटा ऑपरेटरची नियुक्त करण्यात येईल. त्यामुळे ७२ तासांत नागरिकांना संबंधित कागदपत्रे मिळतील असं त्यांनी सांगितलं.

आयुक्तांच्या पाहाणीवेळी महापालिकेच्या कला दालनात धुळीचे साम्राज्य पाहायला मिळालं. तर टेनीस विभाग बंद होता. बऱ्याच विभागात असलेल्या विस्कळीत पानावरुन आयुक्तांनी अधिकाऱ्यांची कानउघडणी केली. तात्काळ स्वछता करण्याचे आदेश दिले.