‘डेरा सच्चा सौदा’चे प्रमुख बाबा राम रहिम यांना बलात्काराच्या आरोपात न्यायालयाने दोषी ठरवल्यानंतर त्यांच्या समर्थकांनी ठिकठिकाणी जाळपोळ सुरु केली आहे. यामध्ये आतापर्यंत अनेकांना जीवही गमवावा लागला. मात्र, औरंगाबाद येथील शीख सामुदयाकडून फटाके फोडून आणि मिठाईचे वाटप करीत न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत केले.

बाबा राम रहिम यांच्या समर्थकांकडून हरयाणात हिंसाचार सुरु आहे. मात्र, औरंगाबाद येथिल उस्मानपुरा भागात शहरातील शीख समुदायाचे लोक एकत्र जमले होते. यावेळी त्यांनी गुरमीत राम रहिम बाबा यांच्याविरोधात न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत केले. यावेळी फटाक्यांची आतिषबाजी करत त्यांनी एकमेकांना मिठाई भरवली.

thane, Shivsainik Viral message, Praises BJP MLA Sanjay Kelkar, Rajan Vichare, chaitra Navratri Festival, Sanjay Kelkar attennded Rajan Vichare Navratri, Rajan Vichare s Navratri Festival, thane navratri festival,
कडवट शिवसैनिक म्हणतो…, आनंद दिघेनंतर आमदार संजय केळकर करताहेत निस्वार्थपणे काम
Rohit pawar on sunetra pawar
“डोळ्यात पाणी आले, पण त्यापेक्षा…” भावूक झालेल्या सुनेत्रा पवार यांच्याबाबत रोहित पवारांची प्रतिक्रिया
election campaign, Sharad Pawar, NCP, vidarbha, nomination rally, amar kale, wardha, lok sabha election 2024
शरद पवारांच्या निवडणूक प्रचाराचा श्रीगणेशा विदर्भातून, या’ ठिकाणी होणाऱ्या रॅलीत राहणार उपस्थित
chhattisgarh, bangaram devi, tribal tradition
आदिवासींमध्ये टाकून दिलं जातं नापास झालेल्या देवांना… आपण सत्ताधाऱ्यांची निदान उलटतपासणी तरी करायला काय हरकत आहे?

न्यायालयाने दिलेल्या निर्णयामुळे भारतीय राज्य घटनेचा विजय झाला. तसेच संतांचा वेष घेऊन वाईट काम करणाऱ्यांचा चेहरा समोर आला असल्याची प्रतिक्रियाही त्यांनी यावेळी दिली. रामपाल, आसाराम यांच्यानंतर राम रहीम यांचे खर रूप समाजासमोर आले आहे. त्यामुळे त्यांच्या अनुयायांकडून जनतेला वेठीस धरण्याचे काम केले जात आहे. अशा लोकांची कृत्ये ही समाजाला एक प्रकारे लागलेली कीड असल्याचे मत मनमोहनसिंह ओबेरॉय यांनी व्यक्त केले आहे. यावेळी शीख समाजातील अनेक तरुणांची उपस्थिती होती.