ऊध्र्व गोदेवरील अतिरिक्त ठरणारी ४८ टीएमसीची धरणे कॅप्सूल बॉम्ब लावून उडवून द्यावीत, असे लेखी निवेदन महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणास देणाऱ्या भाजप आमदार प्रशांत बंब यांना शिवसेनेच्या नेत्यांनी शुक्रवारी चांगलेच फटकारले.
जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी तर प्रसिद्धीसाठी होणारी असली वक्तव्ये तातडीने थांबविली पाहिजेत, असे सांगताना चच्रेने ज्या विषयात मार्ग निघतो तेथे असे काही म्हणणे चुकीचे असल्याचे स्पष्ट केले. पालकमंत्री रामदास कदम यांनीही बंब यांना फटकारले. जायकवाडी धरणात ऊध्र्व भागात अधिक धरणे बांधल्याने पाणी येत नसल्याचे मराठवाडय़ातील अनेकांचा समज आहे. तो खरा की खोटा हे तपासला जाईल. मात्र, अशी वक्तव्ये प्रक्षोभ निर्माण करतील. जेवढा राग मराठवाडय़ात आहे, तेवढाच वरच्या भागात आहेत. तेथून पाणी सोडताना संचारबंदी लावावी लागेल काय, अशी स्थिती असते, याची बंब यांना कल्पना नसेल, असे म्हणत शिवतारे यांनी बंब यांना फटकारले.