आष्टी, जामखेड शहरात बैठका

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हजार आणि पाचशे रुपयांच्या नोटा व्यवहारातून बाद करण्याचा निर्णय घेतल्यानंतर नव्या आíथक धोरणानुसार केवळ दोन हजार रुपयांचाच नगदीने व्यवहार करता येणार असून प्रत्येकाला बँकेतूनच व्यवहार करावा लागणार आहे. शेतकरी, छोटे व्यावसायिक यांना नव्या व्यवहाराची माहिती व्हावी, यासाठी आष्टीचे माजी मंत्री सुरेश धस यांनी डाळींब उत्पादक, दूध व्यावसायिक, चहा-टपरी अशा छोटय़ा व्यावसायिकांच्या बठका घेऊन मतदारसंघ ‘कॅशलेस’ करण्याचा प्रयत्न चालवला आहे.

प्रत्येकाने राष्ट्रीयीकृत बँकेत खाते काढून आपला व्यवहार बँकद्वारे करावा, यासाठी बठकांचा सपाटा सुरू केल्याने आगामी काही दिवसात मतदारसंघातील प्रत्येकाचे व्यवहार बँकेतून व्हावे, यासाठी जागृती करत असल्याचे त्यांनी सांगितले.

केंद्र सरकारने ८ नोव्हेंबरला पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा चलनातून रद्द करण्याचा निर्णय घेतल्यानंतर बहुतांश व्यवहारावर मर्यादा आल्या आहेत.

नव्या आíथक धोरणानुसार प्रत्येक व्यक्तीला दोन हजार रुपयांपर्यंतचा रोखीने व्यवहार करता येणार आहे. ग्रामीण भागात शेतकरी, छोटे व्यावसायिकांचा व्यवहार हा रोखीनेच असतो. सरकारच्या निर्णयानंतरही फारसे कोणी गांभीर्याने घेतांना दिसत नाही.

मात्र दूध संघाचे या महिन्यापासूनचे पगार थेट बँकेमार्फत करण्याचे आदेश सरकारने बजावले आहेत. आष्टी दूध संघाला सरकारचे पत्र मिळताच राष्ट्रवादीचे नेते माजी मंत्री सुरेश धस यांनी दूध पुरवठाधारक संस्था व उत्पादकांची बठक घेऊन प्रत्येकाने राष्ट्रीयीकृत बँकेत खाते काढून व्यवहार बँकेमार्फतच होणार असल्याचे स्पष्ट केले. डाळींब उत्पादकांचीही बठक घेऊन आता बँकेमार्फत व्यवहार करण्याच्या सूचना दिल्या.

शहरातील वडापाव, पानटपरी, चहावाले, कापड व्यापारी, भुसार व्यापारी, इतर व्यावसायिक दुकानदार यांच्या स्वतंत्र बठका घेऊन प्रत्येकाने राष्ट्रीयीकृत बँकेत खाते काढून व्यवहार बँकेमार्फत करावे, असे आवाहन केले आहे. सुरेश धस मतदारसंघात सर्वत्र गटनिहाय बठका घेऊन नागरिकांना ‘कॅशलेस’ व्यवहारासाठी आवाहन करत आहेत.

आगामी काही काळात राज्यातील पहिला ‘कॅशलेस मतदारसंघ’ व्हावा यासाठी आपला प्रयत्न असल्याचे धस यांनी सांगितले. पक्षीय राजकारणाच्या पलीकडे जाऊन केंद्र सरकारच्या या निर्णयाचे स्वागत केले पाहिजे. सरकारच्या निर्णयाने बाजारामध्ये शेतकरी व सर्वसामान्यांची होणारी लूट थांबणार आहे असाही विश्वास त्यांनी व्यक्त केला.