मतदारसंघ – नांदेड

नांदेड म्हणजे अशोक चव्हाण हे समीकरण पुसून टाकण्याकरिता शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादीने एकत्र येऊन ताकद लावली. चमत्कार होईल असे चित्र निर्माण केले गेले, पण चमत्कार काही झालाच नाही. काँग्रेसने अपेक्षेप्रमाणे विजय प्राप्त केला.

काँग्रेसचे विद्यमान आमदार अमर राजूरकर यांना २५१ तर अपक्ष शामसुंदर शिंदे यांना २०८ मते मिळाली. १२ मते बाद झाली. राजूरकर हे ४३ मतांनी विजयी झाले. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्यासाठी नांदेडची जागा प्रतिष्ठेची होती. अशोकरावांना शह देण्याकरिता जिल्ह्य़ातील राजकीय विरोधक प्रताप चिखलीकर, भास्कर खतगावकर आदी सारे एकत्र आले होते. निवृत्त सनदी अधिकारी शामसुंदर शिंदे हे ताकद लावून रिंगणात उतरले होते. चिखलीकर आणि शिंदे यांचे अशोकरावांशी जुने वैर. चिखलीकर हे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे निकटवर्तीय तर शिंदे हे विलासरावांच्या विश्वासातील अधिकारी होते. मुख्यमंत्रीपदी असताना अशोकरावांनी जुने हिशेब चुकते केले त्याचा चिखलीकर आणि शिंदे यांच्या मनात राग होता. यातूनच चिखलीकर व शिंदे हे मेव्हणे रिंगणात उतरले होते, पण अशोकरावांनी मतांची फाटाफूट होणार नाही याची खबरदारी घेतली.

शिंदे यांनी काँग्रेसची मते फोडण्याचा प्रयत्न केला होता. सर्व विरोधक एकटावल्याने अशोकरावही सावध झाले. काँग्रेसची मते इतरत्र जाणार नाहीत याची खबरदारी घेतली. यामुळेच काँग्रेसला आपले संख्याबळ कायम राखणे शक्य झाले. अशोकरावांची जिल्ह्य़ातील सद्दी संपविण्याचा विरोधकांचा डाव मात्र या निवडणुकीत यशस्वी झालेला नाही.

काँग्रेसचे विद्यमान आमदार अमर राजूरकर यांना २५१ तर अपक्ष शामसुंदर शिंदे यांना २०८ मते मिळाली. १२ मते बाद झाली. राजूरकर हे ४३ मतांनी विजयी झाले. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्यासाठी नांदेडची जागा प्रतिष्ठेची होती.