18 August 2017

News Flash

नगरसेवकांना इंग्रजी कळत नाय, औरंगाबाद महापालिकेत मातृभाषेचा अट्टाहास

अहवाल इंग्रजीमध्ये असल्याने नगरसेवकांची अडचण

औरंगाबाद | Updated: August 2, 2017 4:20 PM

औरंगाबाद महापालिकेने भूमिगत गटार योजनेसंदर्भातील ऑडिट अहवाल इंग्रजीमध्ये सादर केला आहे.

‘मराठीत सांगितलेलं समजत नाही, इंग्लिशमध्ये सांगू’, नागराज मंजुळेच्या ‘सैराट’ चित्रपटातील आर्चीचा डायलॉग औरंगाबादमध्ये नगरसेवकांनी थोडा उलट करुन सादर केल्याचे दिसतंय. त्यांनी इंग्रजीमधील अहवाल समजत नाही, तो मातृभाषेतच द्या, अशी मागणी केली. भूमिगत गटार योजनेसंदर्भात स्थायी समितीत इंग्रजीत अहवाल सादर करण्यात आला आहे. या अहवालावर शिवसेना, भाजप आणि एमआयएमच्या नगरसेकांनी आक्षेप घेतला. शिवसेना आणि भाजपच्या नगरसेवकांना हा अहवाल मराठीत हवा आहे, तर तर दुसरीकडे एमआयएम नगरसेवक हा अहवाल उर्दूत सादर करण्याची मागणी करत आहेत.

औरंगाबाद महापालिकेने भूमिगत गटार योजनेसंदर्भातील ऑडिट अहवाल इंग्रजीमध्ये सादर केला आहे. तो समजत नसल्याचे सांगत नगरसेवकांनी हा अहवाल मराठी आणि उर्दू भाषेत भाषांतर करून द्यावा, अशी मागणी स्थायी समितीच्या बैठकीत केली. शहरात राबवल्या जात असलेल्या भूमिगत गटार योजनेत गैरव्यवहार झाल्याची तक्रार वारंवार करण्यात येत होती. त्यामुळे नगरसेवकांच्या मागणी नंतर योजनेचं तांत्रिक आणि आर्थिक ऑडिट करण्याचे आदेश देण्यात आले. दीर्घ प्रतीक्षेनंतर प्रशासनाकडून स्थायी समितीमधील सदस्यांना याबाबतचा अहवाल सादर केला. मात्र, तो इंग्रजीमध्ये असल्याने नगरसेवकांची अडचण झाली. ही अडचण नगरसेवकांनी स्थायी सभेच्या बैठकीत बोलून दाखवली.

First Published on August 2, 2017 4:20 pm

Web Title: corporator objection for english audit report in aurngabad corporation
 1. V
  Vishal
  Aug 3, 2017 at 11:45 am
  उर्दूच नाटक महाराष्ट्रात फारच वाढत आहे.
  Reply
 2. V
  Vishnu Karnataki
  Aug 2, 2017 at 8:43 pm
  इंग्रजीमध्ये अहवाल सादर केलेल्या अधिकारीना कर्नाटकांत, केरळ किंवा तामिळनाडू मध्ये पाठवा. त्याच्यासाठी मराठी भाषेचा वर्ग चालू करा .
  Reply
 3. G
  Girish
  Aug 2, 2017 at 7:48 pm
  बरेच महाराष्ट्रीय मुसलमान धर्मांधतेमुळे जाणीवपूर्वक मराठी भाषा न बोलता धेडगुजर हिंदी बोलतात. भाषा ही खरेतर धर्माची नसते तर भौगोलिक प्रांताची असते. वसई तालुक्यात ख्रिश्चन-कॅथलिक धर्मिय लोक खूप मोठ्या संख्येने राहतात. ते मुळचे महाराष्ट्रीय आहेत. त्यांनी मराठी भाषा-संस्कृती त्यांच्या चर्च, प्रार्थना, दैनंदिन व्यवहारात खूप आस्थेने आचरणात टिकवून ठेवली आहे. परंतु महाराष्ट्रीय मुस्लिम स्वतःला मक्का-मदीनेचे वारसदार समजतात. यांच्या या भाषिक अरेरावीला बऱ्याच अंशी हिंदू धर्मिय जबाबदार आहेत, मुस्लिम दिसला की लगेचच तोडक्यामोडक्या हिंदी भाषेत बोलतात. जे मुस्लिम चांगले मराठी बोलतात, समजतात त्यांच्या सोबत देखील हिंदू लोक हिंदीत बोलतात.
  Reply
 4. M
  Mohan
  Aug 2, 2017 at 7:25 pm
  मराठीची मागणी रास्त आहे पण उर्दूची मागणी कशी काय होऊ शकते?
  Reply
 5. S
  Shailendra
  Aug 2, 2017 at 5:51 pm
  अहवाल मराठीतूनच हवा. मराठी ही राजभाषा झाली पाहिजे.
  Reply
 6. Load More Comments