संत जगमित्र नागा सूतगिरणी कर्जप्रकरणी गुन्हा दाखल असलेल्या विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांना अंबाजोगाई न्यायालयाने जामीन अर्जावर ६ ऑगस्टपर्यंत तात्पुरता दिलासा दिला. जिल्हा बँकेतील गरव्यवहारप्रकरणी माजी अध्यक्ष सुभाष सारडा, धर्यशील सोळंके व संचालक शोभा काळे यांनाही बीड न्यायालयाने २ ऑगस्टपर्यंत तात्पुरता जामीन मंजूर केला.

जिल्हा बँक नियमबाह्य व बनावट कर्जप्रकरणी गुन्हे दाखल असलेल्या १०३ तत्कालीन संचालक व लाभार्थी संस्थांच्या संचालकांची पोलिसांच्या विशेष पथकाने चौकशी करुन न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करीत आरोपींना फरारी घोषित करण्याची विनंती केली. तेव्हापासून संचालक राहिलेले विविध पक्षांचे दिग्गज नेते भूमिगत आहेत. जिल्हा बँकेकडून संत जगमित्र नागा सूतगिरणीला कर्ज घेतल्याप्रकरणी गुन्हा दाखल असलेले विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी अंबाजोगाई न्यायालयात दाखल केलेल्या जामीन अर्जावर शुक्रवारी सुनावणी झाली. त्यात न्यायालयाने ६ ऑगस्टपर्यंत तात्पुरता दिलासा दिला, तर जिल्हा बँक गरव्यवहारप्रकरणी गुन्हा दाखल असलेल्या माजी अध्यक्ष सुभाष सारडा, धर्यशिल सोळंके व शोभा काळे यांनाही बीड न्यायालयाने २ ऑगस्टपर्यंत तात्पुरता जामीन मंजूर केला. त्यामुळे या संचालकांना काहीसा दिलासा मिळाला असला, तरी गुन्हा दाखल असलेल्या लोकांमध्ये भीतीचे वातावरण कायम आहे.