औरंगाबाद येथील एमआयएमचे आमदार इम्तियाज जलील आणि इतर १७ जणांवर जाळपोळ आणि शिवीगाळ केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामध्ये एमआयएमच्या ९ नगरसेवक आणि एका नगरसेविकेच्या पतीचा समावेश आहे. सिटी चौक पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शाहगंज येथील पाण्याच्या टाकीजवळ देशी दारुची विक्री केली जाते. या परिसरात प्राथमिक शाळा, माध्यमिक शाळा, रुग्णालय ,मंदिर, मशिद, आठवडी बाजार, अशी सार्वजनिक स्थळे आहेत. त्यामुळे या परिसरात दारू विक्री दुकानाला परवानगी देऊ नये, अशी मागणी एमआयएमकडून करण्यात आली होती. याबाबद आयुक्तांना पत्र देखील दिलं होतं. यामध्ये राजेश द्वारकप्रसाद जैस्वाल हे बार सुरु करणार असल्याचं म्हटलं होत. आणि परवानगी दिली, तर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल, असा इशारा दिला होता.

aurngabad

एमआयएमने १७ मार्च रोजी जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त, महानगर पालिका आयुक्त यांना पत्र दिले होते. मात्र, तरी देखील त्याची दखल न घेतल्यानं आज एमआयएमने आंदोलन केलं. आंदोलनादरम्यान, एआयएमआयएम कार्यकत्यांनी देशी दारु दुकानाची तोडफोड केली. तसेच दुकानातील दारूचे बॉक्स बाहेर फेकून दिले. त्यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झालं होत. त्यामुळे जलील आणि त्यांच्या कार्यकर्त्यां विरोधात जाळपोळ केल्या प्रकरणी सिटी चौक पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.