विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या गटाला जिल्ह्य़ातील फुलंब्री बाजार समिती निवडणुकीत पराभवाला सामोरे जावे लागले. समितीच्या निवडणुकीत काँग्रेसचे माजी आमदार कल्याण काळे यांच्या नेतृत्वाखालील १५ संचालक सोमवारी निवडून आले. या निवडणुकीमुळे फुलंब्री मतदारसंघातील सर्व सहकारी संस्थांवर काँग्रेसचा वरचष्मा निर्माण झाला आहे.

समितीच्या १८ पैकी ३ जागांवर बागडे समर्थक निवडून आले. २ हजार ९७ पैकी २ हजार ७४ मतदारांनी निवडणुकीत मतदान केले. फुलंब्री बाजार समिती निवडणुकीत बागडे गटाच्या समर्थकांसमवेत राष्ट्रवादी काँग्रेसचा एक गटही रिंगणात होता. या निवडणुकीच्या प्रचारात स्वत: बागडेही उतरले होते. यापूर्वी औरंगाबाद व फुलंब्री मतदारसंघांतील खरेदी-विक्री संघाच्या निवडणुकीतही माजी आमदार डॉ. काळे यांच्या गटानेच विजय मिळवला. देवगिरी सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीतही त्यांनीच बाजी मारली. बाजार समिती निवडणुकीत शिवाजीराव पाथ्रीकर, रोशन अवसारी व रवींद्र कासार हे तीन बागडे गटाचे समर्थक निवडून आले. अन्य १५ समर्थक डॉ. काळे यांच्या गटाचे आहेत.

Maha Vikas Aghadi,
वसई विरारमध्ये महाविकास आघाडीच्या प्रचाराचा शुभारंभ, शिवसेना उपनेते नितीन बानगुडे पाटील यांचा भाजपावर घणाघात
Displeasure of office bearers in BJPs election planning meeting
अलिबाग : भाजपच्या निवडणूक नियोजन बैठकीतही पदाधिकाऱ्यांचा नाराजीचा सूर…
pratibha dhanorkar
काँग्रेसच्या प्रतिभा धानोरकरांकडे ३९ कोटींचे ‘हातउसने’!
ajit awar discussed about satara nashik madha constituencies with party workers
सातारा, नाशिक, माढा मतदारसंघांबाबत अजित पवार यांची सावध भूमिका, पुण्यात पदाधिकाऱ्यांबरोबर बैठक

फुलंब्री बाजार समितीसाठी ९८.९० टक्के मतदान झाले. या सहकारी संस्थांच्या मतदारसंघात रामेश्वर गाडेकर, चंद्रकांत जाधव, महादू डकले, राहुल डकले, संदीप बोरसे, विजय मोरे, महिला मतदारसंघात कौशल्या काळे, केशरबाई वाळके, विठ्ठल लुटे विजयी झाले. निवडणुकीत भाजपचे तालुकाध्यक्ष गोविंद वाघ व राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष कल्याण चव्हाण यांनाही पराभवाचा सामना करावा लागला. डॉ. काळे यांच्या बाजूने काँग्रेस, शिवसेनेतील काही नेते व राष्ट्रवादीचे नितीन देशमुख यांचे समर्थक निवडणुकीच्या रिंगणात होते, तर भाजपने राष्ट्रवादीच्या एका गटाबरोबर युती केली होती. विजयानंतर कल्याण काळे यांच्या समर्थकांनी जल्लोष केला.