बेकायदेशीरपणे गर्भपात करणाऱ्या केंद्रावर औरंगाबाद पोलिसांनी बुधवारी कारवाई केली. सुमेय्या अंजूम या महिलेने तक्रार केल्यावर पोलिसांनी ही कारवाई केली असून गर्भपात केंद्रातून  डॉक्टासह एका मदतनीसाला अटक करण्यात आली आहे.

सुमेय्या अंजूम या महिलेचे १९ एप्रिलरोजी डॉ. गायकवाड यांच्या गर्भपात केंद्रात गर्भपात करण्यात आले होते. सुमेय्या अंजूम यांच्या इच्छेविरोधात हा गर्भपात झाला होता. सुमेय्या यांचे पती सलाउद्दीन आणि सासरे शहबोद्दीन यांनी त्यांना जबरदस्तीने गर्भपात करायला लावला. मात्र हा अन्याय सुमेय्याने सहन केला नाही. त्यांनी आईवडीलांच्या मदतीने पोलीस आयुक्तांकडे तक्रार दाखल केली. पोलीस आयुक्तांच्या आदेशानुसार पोलिसांच्या एका पथकाने सापळा रचून गर्भपात केंद्रातील डॉक्टरांना पकडले.

Shanthappa Jademmanavar PSI
आईच्या मजुरीचं पांग फेडलंस! UPSC मध्ये सात वेळा नापास झालेल्या पोलीस उपनिरीक्षकाची यशाला गवसणी
Panvel Municipal Commissioner, Inspects Drain Cleaning Work, Emphasizes Pre Monsoon Preparedness, before monsoon Drain Cleaning Work, drain cleaning in panvel, panvel municipal commissioner, kalamboli,
पावसाळ्यापूर्वी कामोठे, कळंबोलीत नालेसफाईला सुरूवात आयुक्तांचा अचानक काम पाहणी दौरा
Nagpur Central Jail, Notorious Gangster, Chetan Hazare , Assaulted by Inmate, crime news, police,
धक्कादायक! मध्यवर्ती कारागृहात टोळीयुद्ध, टिनाच्या पत्र्याने प्राणघातक हल्ला
death of Uttar Pradesh gangster Mukhtar Ansari
अन्सारीच्या मृत्यूची न्यायालयीन चौकशी, उपचारादरम्यान मृत्यू; तुरुंगात विषप्रयोग केल्याचा कुटुंबीयांचा आरोप

सुमेय्यांच्या नातेवाईकांना वेशांतर करुन गर्भपात केंद्रात पाठवण्यात आले होते. केंद्रातील डॉक्टरांनी त्यांना गर्भपातापासाठी तपासणी करावी लागेल असे सांगितले. यासाठी दोन हजार रुपये आणि एक इंजेक्शन घेऊन या असे या डॉक्टरांनी सांगितले. यानंतर पोलिसांनी केंद्रात धडक देऊन डॉक्टरांना अटक केली. डॉ. चंद्रकला गायकवाड (६०) आणि मदतनीस शांताबाई सातदिवे (४६) अशी या आरोपींची नावे आहेत.