बीड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

नवीन रोहित्र (ट्रान्सफॉर्मर) देण्याच्या कारणावरून वीज कंपनीच्या सहायक अभियंत्याला भाजप कार्यकर्त्यांनी मारहाण केल्यानंतर शुक्रवारी वाद ठाण्यात गेला. तेथे सहायक अभियंत्याकडून तक्रार देण्यात येत असताना आलेले गेवराईचे भाजपचे आमदार लक्ष्मण पवार यांनी ठाण्यातच उपस्थित असलेले उप कार्यकारी अभियंता डी. बी. काळे यांना मारहाण केली. या प्रकरणी बीड शहर पोलिस ठाण्यात दाखल केलेल्या तक्रारीवरून आमदार लक्ष्मण पवार यांच्यासह पंधरा जणांविरुद्ध मारहाण आणि सरकारी कामात अडथळा या कलमाअन्वये गुन्हा दाखल झाला आहे. काही दिवसांपूर्वीच नगरपालिकेचे अतिक्रमण काढण्याच्या कारणावरून एका कार्यकर्त्यांला मारहाण झाल्यानंतर आ. पवार यांच्याविरुद्ध अ‍ॅट्रॉसिटी अ‍ॅक्टचा गुन्हा नोंदवण्यात आला होता.

thane, Jitendra Awhad, mumbai High Court, quash the FIR
गुन्हा रद्द करण्यासाठी जितेंद्र आव्हाड उच्च न्यायालयात
Loan guarantee only to those who show vote power is Mahayuti condition for sugar factory leaders
‘मत’शक्ती दाखविणाऱ्यांनाच कर्जहमी; महायुतीची साखर कारखानदार नेत्यांसाठी अट?
indusInd bank officials arrested
बनावट शेअर ट्रेडिंग घोटाळा: इंडसइंड बँकेच्या अधिकाऱ्यांना अटक; सायबर पोलीस ठाण्याची कारवाई
gopal shetty poonam mahajan absent from bjp meeting
Lok Sabha Election 2024 : बैठकीला गोपाळ शेट्टी, पूनम महाजन गैरहजर; भाजपकडून निवडणूक तयारीचा आढावा

गेवराई तालुक्यातील बागिपपळगाव परिसरात रोहित्र नसल्यामुळे गोदावरी नदीच्या उजव्या कालव्यातून पाणी वाहत असताना शेतकऱ्यांना पिकांना पाणी देणे कठीण झाले आहे. महिनाभरापूर्वी रोहित्र जळाल्यानंतर ते बदलून घेण्यासाठी शेतकरी खेटे मारत असले तरी वीज कंपनीचे अधिकारी दाद देण्यास तयार नव्हते. त्यामुळे संतप्त शेतकऱ्यांसह रेवकी-देवकीतील भाजप कार्यकत्रे शुक्रवारी दुपारी गेवराईच्या वीज वितरण कंपनीच्या कार्यालयात आले. त्यांनी रोहित्राची मागणी केली. या वेळी सहायक अभियंता नीतेश खंडारे यांच्याशी कार्यकर्त्यांची बाचाबाची झाल्यानंतर वाद वाढला आणि मारहाणीचा प्रकार घडला. याबाबत खंडारे यांनी थेट पोलिस ठाणे गाठून भाजप कार्यकत्रे बाळासाहेब मस्के व इतरांविरुद्ध तक्रार दाखल दिली. या घटनेची माहिती आमदार लक्ष्मण पवार यांना समजताच तत्काळ पवार पोलिस ठाण्यात दाखल झाले. भाजप कार्यकर्त्यांविरुद्ध तक्रार देता का? वीज कंपनीचे लोक पसे घेतल्याशिवाय काम करत नाहीत. वाद झाला असेल तर विषय मिटवून टाका अशी भूमिका घेतली. तेव्हाही वीज कंपनीचे अधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये शाब्दिक चकमक उडाली. त्यातून उप कार्यकारी अभियंता डी. बी. काळे यांना ठाण्यातच मारहाण करण्यात आली.

आमदार पवार यांनी व त्यांच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याची तक्रार खंडारे यांनी शुक्रवारी रात्री उशिरा बीड शहर पोलिस ठाण्यात दाखल केली. यावरून आमदार लक्ष्मण पवार यांच्यासह पंधरा जणांविरुद्ध सरकारी कामात अडथळा व मारहाण या कलमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर वीज वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी दोन तास गेवराई तालुक्यातील वीजपुरवठा खंडित ठेवून राग व्यक्त केला. काही दिवसांपूर्वी आमदार लक्ष्मण पवार यांनी नगरपालिकेच्या अतिक्रमण विरोधी मोहिमेला विरोध करणाऱ्या एका कार्यकर्त्यांला मारहाण केल्याप्रकरणी त्यांच्याविरुद्ध अ‍ॅट्रॉसिटी अ‍ॅक्ट अनुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. यावरून बराच गदारोळ झाल्यानंतर खुद्द पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी घटनास्थळी भेट देऊन या प्रकरणात आमदारांना पाठबळ दिले होते. पोलिस तपासात आमदारांवरील गुन्हा मागे घेण्यात आला होता.