महावितरणच्या परळी येथील बील भरणा केंद्रातील अडीच कोटींच्या अपहारप्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या कर्मचाऱ्याला अटकपूर्व जामिनाच्या मदतीसाठी तक्रारदाराकडून एक लाख रुपयांची लाच घेताना महावितरणच्या तांत्रिक विभागाचा उपमहाव्यवस्थापक योगेश खैरनार व खासगी ठेकेदार मिलिंद कांबळे यास लाचलुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी रंगेहाथ पकडले. अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. महावितरणच्या वरिष्ठालाच लाच घेताना पकडल्याने अधिकाऱ्यांची बिनबोभाट सुरू असलेली खाबुगिरी पुन्हा एकदा समोर आली आहे.
परळी वीजबिल भरणा केंद्रात संगणकीय नोंदीमध्ये हातचलाखी करून तब्बल २ कोटी ४४ लाखांची रक्कम हडप करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी उच्च पातळीवरून चौकशी झाल्यानंतर ४ कर्मचाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. हे सर्व कर्मचारी फरारी आहेत. पकी एकाच्या मुलाने वडिलांना अटकपूर्व जामीन मिळावा, या साठी अपहार प्रकरणात चौकशी समितीचे प्रमुख असलेल्या लातूर परिमंडळ तांत्रिक विभागाचा उपमहाव्यवस्थापक योगेश रमाकांत खैरनार (वय ४५) याच्याशी संपर्क केला. खैरनारने बिल पंचिंग ठेकेदार मिलिंद कांबळे याच्यामार्फत अटकपूर्व जामिनास मदतीसाठी २ लाख रुपये लाचेची मागणी केली. तक्रारदाराने या बाबत लाचलुचपत विभागाशी संपर्क साधल्यानंतर लाच मागितल्याची खात्री करण्यात येऊन सापळा लावण्यात आला. मात्र, मागील काही दिवसांपासून खैरनार सातत्याने जागा बदलत असल्यामुळे लाचलुचपत विभागाचे अधिकारीही हैराण झाले. अखेर मंगळवारी रात्री खैरनार याने तक्रारदाराला संपर्क करून पसे घेऊन येण्यास सांगितल्यानंतर लातूर शहरातील राजीव गांधी चौकातील गंधर्व हॉटेलच्या समोर एक लाख रुपयांची लाच घेताना खैरनार व खासगी ठेकेदार कांबळे या दोघांना रंगेहाथ पकडले.

trees cut, Metro-3,
मेट्रो-३ प्रकल्पासाठी तोडलेल्या झाडांच्या पुनर्रोपणाचे प्रकरण : कामातील प्रामाणिकपणावर उच्च न्यायालयाच्या विशेष समितीचे बोट
port at vadhvan, vadhvan,
वाढवण येथील पर्यावरणस्नेही बंदराचा मार्ग मोकळा
stealing liquor, liquor Kalyan,
कल्याण : महागड्या मद्याच्या बाटल्यांवर चोरट्यांचा डल्ला, माल चोरून ढाब्यांना विक्री
Panvel Municipal Commissioner, Inspects Drain Cleaning Work, Emphasizes Pre Monsoon Preparedness, before monsoon Drain Cleaning Work, drain cleaning in panvel, panvel municipal commissioner, kalamboli,
पावसाळ्यापूर्वी कामोठे, कळंबोलीत नालेसफाईला सुरूवात आयुक्तांचा अचानक काम पाहणी दौरा