डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या ५८ व्या वर्धापनदिनानिमित्त विद्यापीठ अनुदान आयोगाचे अध्यक्ष प्रा. वेदप्रकाश यांच्या हस्ते विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या पाच मान्यवरांना ‘जीवनगौरव’ पुरस्कार प्रदान करण्यात आले.

विद्यापीठाच्या नाटय़गृहात मंगळवारी हा कार्यक्रम झाला. कुलगुरु डॉ. बी. ए. चोपडे अध्यक्षस्थानी होते. या वेळी ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी अ‍ॅड. भगवानराव देशपांडे (विधी), लातूरच्या विवेकानंद रुग्ण्यालयाचे संस्थापक डॉ. अशोक कुकडे (वैद्यकीय सेवा, संशोधन व समाजकार्य), ज्येष्ठ विचारवंत, साहित्यिक डॉ. गंगाधर पानतावणे (साहित्य), माजी कृषी आयुक्त तथा विद्यमान विभागीय आयुक्त डॉ. उमाकांत दांगट (प्रशासन, कृषी व जलसंधारण) यांना प्रदान करण्यात आला. विद्यापीठ अनुदान आयोगाचे माजी अध्यक्ष डॉ. सुखदेव थोरात (शिक्षण) यांच्या वतीने प्रा. एस. एस. वालदे यांनी पुरस्कार स्वीकारला. कार्यक्रमास कुलसचिव डॉ. प्रदीप जब्दे, बीसीयुडी संचालक डॉ. सतीश पाटील, डॉ. सीमला वेदप्रकाश, नलिनी चोपडे यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.  पाहुण्यांचा परिचय डॉ. हमीदखान यांनी करून दिला. डॉ. बिना सेंगर यांनी सूत्रसंचालन केले.

((   डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या ५८ व्या वर्धापनदिनानिमित्त विद्यापीठ अनुदान आयोगाचे अध्यक्ष प्रा.वेदप्रकाश यांच्या हस्ते व कुलगुरू डॉ. बी ए चोपडे यांच्या उपस्थितीत ‘जीवन गौरव’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. या वेळी ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी डॉ.गंगाधर पानतावणे, डॉ.अशोक कुकडे, अ‍ॅड.भगवानराव देशपांडे (विधी), डॉ.उमाकांत दांगट यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला.   ))