पाणीपुरवठय़ाच्या १ हजार १८४ जोडण्या तोडल्या 

‘महावितरण’ने औरंगाबाद जालना जिल्हय़ातील घरगुती, व्यापारी, औद्योगिक व सार्वजनिक पाणीपुरवठा योजनेच्या थकबाकीदार वीज ग्राहकांविरोधात महावितरणने वीजपुरवठा खंडित करण्याची मोहीम राबविली आहे. विजेचा वापर करूनही वीजबिले न भरणाऱ्या १९ हजार ६७७ वीज ग्राहकांचा १६ कोटी ४८ लाख ६७ हजार रुपये थकबाकीसाठी वीजपुरवठा खंडित केला आहे. १८ हजार २४० वीज ग्राहकांकडून ७ कोटी ९२ लाख ३२ हजार रुपये वीजबिलापोटी वसूल केले. वारंवार सूचना, नोटिसा देऊनही दाद न देणाऱ्या ४७९ वीज ग्राहकांचा ८४ लाख ८८ हजार रुपयांसाठी कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित केला.

सार्वजनिक पाणीपुरवठा योजनेच्या १ हजार १८४ वीज जोडण्यांचा वीजपुरवठा २६ कोटी ८९ लाख ४४ हजार रुपयांसाठी खंडित करण्यात आला. ६४ पाणीपुरवठा योजनांकडून २३ लाख १३ हजार रुपये वसूल केले. वारंवार नोटिसा बजावूनही पैसे न भरणाऱ्या ग्राहकांचा वीजपुरवठा कायमस्वरूपी खंडित केला. तसेच जिल्हय़ातील सार्वजनिक पाणीपुरवठा योजनांची ६२१ वीजोडण्या १८ कोटी ७२ लाख ४१ हजार रुपये थकबाकीसाठी वीजपुरवठा खंडित केला असून ३५ पाणीपुरवठा योजनांकडून १९ लाख ८ हजार रुपये वसूल केले. जालना जिल्हय़ात वीजबिले न भरणाऱ्या ८ हजार १७१ ग्राहकांचा ७ कोटी २० लाख ७८ हजार रुपये थकबाकीसाठी वीजपुरवठा खंडित केला. ३ हजार ६२७ ग्राहकांकडून १ कोटी १७ लाख ११ हजार रुपये वीजबिलापोटी वसूल केले. जिल्हय़ातील सार्वजनिक पाणीपुरवठा योजनेच्या ५६३ वीजजोडण्या ८ कोटी १७ लाख ३ हजार रुपये थकबाकीसाठी वीजपुरवठा खंडित केला असून २९ पाणीपुरवठा योजनांकडून ३ लाख ३३ हजार रुपये वसूल केले.

थकबाकीदार वीज ग्राहकांविरोधात वीज खंडित करण्याची मोहीम अधिक तीव्र करण्यात येणार असल्याने वीज ग्राहकांनी अधिकृत वीजजोडणी घेऊनच विजेचा वापर करावा. तसेच थकबाकीदारांनी वीजबिले भरून वीजपुरवठा खंडित होण्यापासून वाचावे, असे महावितरणने आवाहन केले आहे.