23 October 2017

News Flash

पाच लाखांच्या बनावट नोटांसह एकाला अटक

तोतया पत्रकार, काँग्रेसचा कार्यकर्ता असल्याचे बनावट ओळखपत्र

प्रतिनिधी, औरंगाबाद | Updated: May 20, 2017 2:26 AM

7th Pay Commission Cabinet approves hike in allowances : केंद्र सरकारने आपल्या कर्मचाऱ्यांसाठी एक जानेवारी २०१६ पासून सातवा वेतन आयोग लागू केला आहे.

तोतया पत्रकार, काँग्रेसचा कार्यकर्ता असल्याचे बनावट ओळखपत्र

नवीन दोन हजार, पाचशेच्या तंतोतंत खऱ्या वाटणाऱ्या नोटा बनवणाऱ्याला गुन्हे शाखेच्या पोलिसांनी शुक्रवारी रंगेहाथ पकडले. त्याच्याकडून नोटा छापण्याचे प्रिंटर व इतर साहित्यासह ५ लाख ५ हजार ३०० रुपयांच्या बनावट पोलिसांनी जप्त केल्या आहेत. ही कामगिरी करणाऱ्या गुन्हे शाखेच्या पोलिसांना २५ हजारांचे, तर या घटनेची माहिती देणाऱ्या खबऱ्यास २० हजार रुपयांचे बक्षीस जाहीर करत असल्याचे पोलीस आयुक्त यशस्वी यादव यांनी शुक्रवारी सांगितले.

बनावट नोटांचा छापखाना उघडकीस आणल्याची माहिती सांगण्यासाठी पोलीस आयुक्त कार्यालयात आयोजित केलेल्या पत्रकार बैठकीत यशस्वी यादव यांनी ही माहिती दिली.

या वेळी ते म्हणाले, माजिद खान बिस्मिल्ला खान (वय ४२, रा. इंदिरानगर, औरंगाबाद) हा किराडपुरा भागात उत्तम यंत्र सामग्री बाळगून दोन हजार, पाचशे व शंभरच्या नव्या बनावट नोटा तयार करायचा. मागील अनेक दिवसांपासून माजिद खान हा बनावट नोटा तयार करायचा. अनेकांकडून त्याने घेतलेल्या रकमेच्या बदल्यात दुप्पट रकमेच्या बनावट नोटा पुरवायचा. लाखो रुपये त्याने बाजारात पसरवले आहेत. नोटा एवढय़ा तंतोतंत खऱ्या वाटतात, की नोटांवरील चमकी, हिरवा रंगही त्याने आणले आहेत. हा सर्व गोरखधंदा माजिद खान हा पत्रकार म्हणून व काँग्रेसचा कार्यकर्ता नावाने करायचा. पत्रकार म्हणून व काँग्रेसचा कार्यकर्ता असल्याचे बनावट कार्डही माजिद खानकडे आढळून आल्याचे पोलीस आयुक्त यशस्वी यादव यांनी सांगितले.

एका खबऱ्यामार्फत गुन्हे शाखेच्या पोलिसांना माजिद खान याच्या बनावट नोटांच्या छापखान्याची माहिती मिळाली. पोलिसांनी दोन-तीन दिवस लक्ष ठेवून खातरजमा केली. गुरुवारी मध्यरात्री सापळा रचत माजिद खान याला पकडण्यात आले.

First Published on May 20, 2017 2:26 am

Web Title: one arrested with fake currency