18 August 2017

News Flash

कोणत्या मशिदींवर कारवाई करणार?, शिवसैनिकांचा आयुक्त कार्यालयात ठिय्या

महापालिका कोर्टाची दिशाभूल करत असल्याचा आरोप

औरंगाबाद | Updated: August 1, 2017 5:45 PM

शिवसेनेचे आयुक्तांच्या कार्यालयातच ठिय्या आंदोलन

कोर्टाच्या आदेशानुसार औरंगाबाद शहरात महापालिकेकडून अनधिकृत धार्मिक स्थळावर कारवाई सुरु आहे. महापालिकेच्या कारवाईत पक्षपातीपणा होत असल्याचा आरोप शिवसेनेकडून करण्यात येत आहे. जाणून बुजून मंदिरांवर कारवाई केली जात आहे. तर मशिदीला अभय दिलं जातंय, असा आरोप शिवसेनेकडून करण्यात आला. आतापर्यंत २५ मंदिरे पाडण्यात आली. मात्र एकाही मशिदीला हात लावण्यात आलेला नाही. त्यामुळे २५ मशिदी पाडा त्यानंतरच शिवसेना मंदिर पाडायला सोबत येईल, अशी भूमिका शिवसेनेने घेतली.

महापालिका कोर्टाची दिशाभूल करत असल्याचा आरोप यावेळी शिवसेनेकडून करण्यात आला. विकास कामाला आमचा विरोध नाही. मात्र, कारवाई होत असतना ती नियमानुसार आणि निष्पक्षपातीपणे करावी, अशी मागणी शिवसेनेकडून करण्यात आली. कोणत्या धार्मिक स्थळावर कारवाई करण्यात येणार आहे, त्याची यादी महापालिकेने जाहीर करावी, अशी मागणी देखील शिवसेनेकडून करण्यात आली. तसेच खासगी जागेतील मंदिरे पाडण्यासाठी पालिकेचे कर्मचारी जात आहेत. खासगी जागेवरील कारवाई थांबली नाही तर घेराव घालून कारवाईत अडथळा निर्माण करु, असा इशारा शिवसेना जिल्हा प्रमुख अंबादास दानवे यांनी दिला.
महापालिकेकडून तयार करण्यात आलेल्या यादीचा कसलाही अभ्यास न करता कारवाई करण्यात येते आहे. त्यामुळे आतापर्यंत फक्त मंदिरे पाडण्यात आली. त्यामुळे कारवाई पथकाला बोलवून मशिदीची यादी द्या, अशी मागणी शिवसेनेकडून करण्यात आली. दर्ग्यांवर कारवाई करण्यात आल्याचे सांगत मंदिर किंवा मशिद असा भेदभाव न करता नियमानुसार कारवाई होणार असल्याचे आयुक्तांनी यावेळी स्पष्ट केले. आयुक्तांच्या स्पष्टीकरणानंतर शिवसेनेने कोणत्या मशिदीवर कारवाई करणार याची यादी द्या, अशी भूमिका घेत आयुक्तांच्या कार्यालयातच ठिय्या आंदोलन केले.

First Published on August 1, 2017 5:45 pm

Web Title: shivsena protest against unauthorized religious places action in aurngabad
 1. समीर देशमुख
  Aug 2, 2017 at 10:30 pm
  ही मोहिम हाताळणारा अधिकारी मुस्लिम आहे. त्यामुळेच तो मशिदीला अभय देत असणार. या माणसाची चौकशी व्हायलाच हवी. मंदीर पाडायला का हा तुमचा पाकिस्तान आहे का रे? हिंदुंनो जागे व्हा. नाहीतर हिंदुस्थानचा पाकिस्तान व्हायला वेळ नाही लागणार.
  Reply
 2. V
  Vijay
  Aug 2, 2017 at 5:09 pm
  शहरात २ मंदिर आहेत रेणुका मंदिर/ कला गणपती नावाचे त्यांनी तर सरसकट रास्ता अडवून/ बंद करून धंदा सुरु केलेला आहे त्याकडे सुद्धा लक्ष वेधावे
  Reply
 3. V
  Vijay
  Aug 2, 2017 at 5:06 pm
  जिथं पर्यंत ा माहित आहे औरंगाबाद शहरात एकही अवैध किंवा अतिक्रमित मस्जिद नाहीये आणि असली तरीही कोणतीही मस्जिद रस्त्यांना अडथळा नाहीत. आणि हे अवैध मंदिर बनवण्यामागे शिवसेने आलेच आहेत शहरात कामे करायची नाही आणि कुणी करत असेल तर होऊ द्यायची नाही हाच ह्यांचा अजेंडा. निवडणुका आल्या कि एखाद्या विभागात मंदिर बांधून द्या आणि तिथल्या मूर्खांची मते आपल्या पदरात पाडून घ्या हाच ह्यांचा नेहमीच धंदा. उगाच शहराच्या विकासामध्ये हिंदू-मुस्लिम असा धार्मिक अडथळा आणू नका, ते शक्यच नाही म्हणा कारण धार्मिक रंग नसेल तर ह्या बांडगुळांना कोण निवडून देणार ह्यांची लायकी नगरसेवक काय ग्रामसेवक होण्याची सुद्धा नाही फक्त औरंगाबाद ची जनता मूर्ख म्हणून निवडून येतात भिकार्डे
  Reply
 4. आर्निका
  Aug 1, 2017 at 7:31 pm
  शिवसेनेला माहिती असेल तर त्यांनी अनधिकृत मशिदी कुठल्या आहेत हे सुद्धा सांगावे आयुक्त साहेबांना आणि जरूर जावे कि कारवाई एन्जॉय करायला.
  Reply