‘अजान’ बाबत वादग्रस्त ट्विट वरून गीतकार सोनू निगमवर टीकेची झोड सुरूच आहे. औरंगाबादमध्ये सोनू निगमच्या फोटोला चपलांचा हार घालून, त्याच्या फोटोला जोडे मारत काही युवकांनी निषेध नोंदवला. औरंगाबादमध्येच या अगोदर काही संघटनांकडून सोनू निगमवर गुन्हा दाखल करा, अशी मागणी करण्यात आली होती.

सोनू निगमने ‘अजान’ विरोधात केलेल्या ट्विटमुळे इस्लाम धर्माच्या भावना दुखावल्या आहेत. तसंच गुरुद्वारा आणि मंदिराबाबतही सोनू निगमने वादग्रस्त वक्तव्य केलं. त्यामुळे अनेकांच्या भावना दुखावल्या आहेत. याची गांभीर्याने दखल घेत सोनू निगमवर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी ‘मिल्लत बचाओ तहरिक कमिटी’ने केली. त्याबाबत औरंगाबाद येथील जिन्सी पोलिसात कमिटीच्या वतीने तक्रार दाखल दाखल करण्यात आली आहे. औरंगाबाद जिल्हयातील बिडकीन येथील युवकांनी सोनू निगमच्या फोटोला चपलांचा हार घालून, चपलाचे जोड मारून सोनू निगमच्या वक्तवव्याचा निषेध केला. यावेळी सोनू निगम विरोधात घोषणाबाजी देखील करण्यात आली.

अजानच्या आवाजाचा त्रास होत असल्याची भावना सोनूने ट्विटवरवरुन व्यक्त केली होती. त्यानंतर पश्चिम बंगालचे मौलवी यांनी सोनूला चपलांचा हार घालून धिंड काढणाऱ्या तसेच त्याचे मुंडन करणाऱ्याला १० लाखांचे बक्षीस जाहीर केले होते. मौलवींच्या या फतव्याला प्रत्युत्तर देण्यासाठी सोनून स्वत:मुंडन केल्याचे पाहायला मिळाले. मुंडन करण्यापूर्वी सोनूने पत्रकार परिषदेमध्ये अजानला विरोध नसून लाउडस्पीकरला विरोध असल्याचे म्हटले होते. याप्रकरणावरुन दिवसेंदिवस वाद वाढत असताना सोनूने रविवारी अजानचा व्हिडिओ रेकॉर्डिंग करुन ट्विट केले होते.