हडको येथील ज्योती हाऊसिंग सोसायटीमध्ये २ डिसेंबर २०१५ रोजी डॉ. चित्रा गणेश डकरे यांचा झालेला खून २ महाविद्यालयीन तरुणांनी चोरीच्या उद्देशाने केला असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले असून दोघांनाही गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली. त्यातील एका आरोपीचे नाव अमोल नारायण घुगे असे असून तो पोलीस आयुक्तालयातील कर्मचाऱ्याचा मुलगा असल्याचे स्पष्ट झाले आहे. दुसरा आरोपी विधिसंघर्ष बालक असून दोन्ही आरोपी हडको येथील रहिवासी आहेत.
गेल्या काही दिवसांपासून डकरे खुनाचा तपास लावणे पोलिसांसमोर आव्हान होते. या भागातील छोटय़ा-मोठय़ा चोऱ्या करणाऱ्यांपासून ते गंभीर गुन्ह्य़ातील आरोपींची कसून चौकशी केली जात होती. या तपासादरम्यान अनेक आरोपींच्या नोंदीही अद्ययावत करण्यात आल्या. केवळ चोरीच्या उद्देशाने डॉ. स्नेहल नीलेश आस्वार यांच्या घरात दोघेजण घुसले होते. मात्र, मुलीच्या घरी राहायला आलेल्या डॉ. चित्रा डकरे यांनी खूप आरडाओरड केल्याने त्यांना आधी दोरीने बांधण्यात आले. तरीही त्यांनी आरडाओरड केल्याने आरोपींनी त्यांचा खून केला. दोन्ही आरोपींव्यतिरिक्त ही माहिती अन्य कोणाकडे नसल्याने तपास करणे अवघड जात होते. गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी दोन्ही आरोपींना त्यांच्या घरून अटक केली. त्यांनी गुन्हा केल्याचा कबुलीजबाबही दिला असल्याचा दावा पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी केला. पोलीस दलातील एका कर्मचाऱ्याचा मुलगा गुन्ह्य़ात अडकणे दुर्दैवी आहे. यात त्याच्या आई-वडिलांचा काही दोष असल्याचे दिसत नाही. मात्र त्या अंगाने तपास केला जाईल, असे ते म्हणाले. पोलीस उपायुक्त संदीप आटोळे, सहाय्यक पोलीस आयुक्त खुशालचंद बाहेती, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश आघाव, सहाय्यक पोलीस निरीक्षक गजानन कल्याणकर, उन्मेष थिटे, प्रशांत आवारे यांनी हा गुन्हा उघडकीस आणण्यासाठी विशेष प्रयत्न केल्याचे अमितेश कुमार म्हणाले.

Neha Hiremath Murder Fayaz Karnataka
“त्याला अशी शिक्षा…”, नेहाचा खून करणाऱ्या फयाजच्या वडिलांची संतप्त प्रतिक्रिया
ragging case in Pune, pune,
पुण्यातील रॅगिंग प्रकरणाला धक्कादायक वळण! अधिष्ठाताच संशयाच्या भोवऱ्यात
Love Jihad, pune, Pune University
‘लव्ह जिहाद’च्या आरोपावरून मारहाणप्रकरणी गुन्हा दाखल; पुणे विद्यापीठाच्या आवारातील घटना
youth beaten, love jihad
‘लव्ह जिहाद’चा आरोप करून तरुणाला मारहाण… सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील प्रकार