आपली पचनसंस्था ही आपल्या प्रकृतीचा आरसा असते. ती बिघडली तर सगळ्या शरीराचे कार्य बिघडते. शरीरात असंतुलन निर्माण होते. ते टाळायचे असतील तर पचनसंस्थेतील बिघाडाचे स्वरूप समजून घ्यायला हवे.

आयुर्वेद शास्त्राप्रमाणे कोणताही रोग व त्याच्या स्वरूपाचा विचार करताना मनुष्याच्या अग्निबळाचा प्रथम विचार करावा लागतो व अग्नीच्या संदर्भातच रोगाची पूर्व लक्षणे, प्रमुख लक्षणे त्याची कमीअधिक अवस्था किंवा रोगाच्या प्रवासाचा विचार करता येतो. आपल्या शरीरातील अग्नीला ‘कायाग्नी’ म्हणतात. अशा कायाग्नीचा विचार करून रोगाचे स्वरूप जे समजून घेतात त्या वैद्यांना त्यामुळेच कायाचिकित्सक असे संबोधिले जाते. त्यामुळेच पचनसंस्थेच्या बिघाडाचा विचार करताना आपल्याला प्रथम अग्निसंबंधांत काय बिघाड आहे त्याचा विचार करावा लागतो.

Loksatta kutuhal Endowment of Suryaji Pisala Artificial intelligence
कुतूहल: सूर्याजी पिसाळांचा बंदोबस्त
GST Uniform taxation of goods and services
‘जीएसटी’च्या ध्येयपूर्तीसाठी…
Inheritance of girls and women Two main types of property ownership
मुली आणि महिलांचा वारसाहक्क
In redevelopment of flat holders Redevelopment Senior
पुनर्विकासातील ज्येष्ठ!

आयुर्वेदीय तत्त्वज्ञानाप्रमाणे आपण खाल्ल्या-प्यायलेल्या आहाराचे, जलादी द्रव्यांचे दोन प्रकारे पचन होत असते. एक प्रकारचे पचन स्थूल मानाने पचन आहे. ते सर्वसाधारण माणसालाही कळते. त्यातील कमीअधिक विकृतीही कळते. या स्थूल पचनाच्या विकृतीचे उदाहरणादाखल ‘जरासे अन्न खाल्ले तर पोट जड होते. थोडेसे कमीअधिक खाल्ले तरी पोटात जळजळते’.  ‘भूक तर असते, पण प्रत्यक्ष अन्नपुढे आले तर अन्न नकोसे होते’. कोणतेही अन्न पाहिले तरी मळमळते, भूक तर अशी कडाडून लागते की काय खाऊ, काय नको असे होते, पोटात आग पडते, पोटात तर अशी आग पडते की कितीही खाल्ले तर पोट भरत नाही. जेवण जेवताना काही वाटत नाही. पण चार तासाने पोट दुखू लागते. पोट मध्यरात्री दुखू लागते. भूक व्यवस्थित असते. जेवणही व्यवस्थित असते. जेवण व्यवस्थित जाते, पण शौचाला जायची पाळी आली की पोट समाधानकारक साफ होत नाही. शौचास नीट झाल्याचे समाधान नीट मिळत नाही. पोटात बेंबीपाशी खुटखुटून दुखते. पोटात तीव्र वेदना होतात. गडबडा लोळावेसे वाटते. रिकाम्या पोटी पोट दुखते, लंघन केले तर बरे वाटते.  थोडे थोडे विभागून दिवसभरात चार वेळा खाल्ले तरच बरे वाटते, अशा एक ना अनेक प्रकारच्या तक्रारी या सगळ्या पचनाच्या तक्रारी स्थूलमानाच्या समजल्या जातात.

आयुर्वेदीय दृष्टिकोनातून आपण खाल्लेले अन्न वरील तक्रारी नसताना पचन झाले तरी त्याला अंगी लागले असे म्हणत नाही. आयुर्वेदात सूक्ष्म पचन हा एक मोठा विचार आहे. सूक्ष्म पचनाच्या मागची भूमिका अशी आहे की, आपण घेतलेल्या आहाराचे त्यावर योग्य त्या अग्नीचे संस्कार होऊन शरीरात त्या काळात गरज असणाऱ्या रस, रक्त, मांस, मेद, अस्थी, मज्जा, शुक्र या सात धातूंमध्ये ????परिगमन?????

व्हावयास हवे. उदा. माणूस थकला असेल तर त्याच्या रस, रक्त, धातूमधील कमतरता भरून निघाली पाहिजे. त्याला काही निमित्ताने बुद्धीचे, मेंदूच्या क्षेत्रातील काम वाढले असल्यास मज्जाधातूचे पोषण अधिक व्हावयास हवे. शारीरिक कष्ट, खूप हमाली करावयाची असल्यास त्याचा मांस व अस्थी धातू हा बळकट व्हावयास हवा. काही कारणाने वजन घटलेले असल्यास मेद धातूचे पोषण चांगले व्हावयास हवे. ज्या ‘नेमक्या’ क्षणी शुक्र धातूची तातडीने गरज आहे तेथे विनाविलंब, सत्त्वर शुक्र, वीर्य हे अनुपस्थित पाहिजेच. यालाच सर्वसाधारणपणे ‘खाल्लेले अंगी लागणे’ असे म्हटले जाते.

आयुर्वेदीय दृष्टिकोनातून पचनसंस्थेचा विचार करताना बिघडलेल्या पचनसंस्थेचा व्यापक विचार करावयाचा असल्यास पुढील आयुर्वेदीय संकल्पनांचा विचार करावयास पाहिजे. त्याची सुरुवात मुखापासून करून थेट गुदापर्यंत विस्ताराने ठिकठिकाणाची विकृती, विविध अवयवातील विकृती, कमी-अधिकपणा बघावयास हवा.

आयुर्वेदीय संकल्पनेप्रमाणे अन्न पाहिल्याबरोबर अन्न पचनाचे कार्य सुरू होते. अन्न पाहिल्याबरोबर ते खावेसे वाटणे याला स्वाभाविकपणा किंवा प्राकृत कार्य म्हणतात. भूक आहे पण अन्न पाहिल्यावर नकोसे वाटणे याला अरुची म्हणजे आयुर्वेदीय संकल्पनेप्रमाणे बोधक कफ जो जिभेमध्ये राहात असतो. त्याची विकृती समजावी. अरुची तर नाहीच पण अजिबात भूकच लागत नाही तेथे बेंबीपाशी असलेल्या पाचकाग्नीची विकृती समजावयास हवी. याउलट पोटात खूप आग पडणे, कितीही खाल्ले तरी समाधान न होणे यालासुद्धा पाचकाग्नीची वेगळ्या तऱ्हेची विकृती मानली आहे. भूक आहे, रुची आहे, तोंडात घास गेलेला आहे पण पुरेशी लाळ सुटत नाही. अन्न बऱ्यापैकी पुढे जात नाही त्याला रसधातूची विकृती मानावी लागते. अन्नाचा घास घेतलेला आहे, पण अन्ननलिकेमार्फत अन्न मोठय़ा कष्टाने उतरते तेव्हा त्या ठिकाणी प्राणवायूचे कार्य बिघडले आहे असे लक्षात येते. थोडेसेच अन्न आमाशयात पोहोचले आहे. एखादाच अधिक घास अधिक होऊन पोट डब्ब होते, फुगते, याचा अर्थ आमाशयाचा संकोच किंवा आमाशयातील क्लेदक कफाचा साठा वाढला आहे असे समजावे. आमाशयामध्ये अन्न आलेले आहे. सर्वसाधारणपणे दोन ते अडीच तासानंतर जास्तीत जास्त चार तासांपर्यंत पचमानाशयात उतरावयास हवे असे असूनही अन्न खूप सावकाश, मंदगतीने पुढे जाते याचा अर्थ समान अग्नीचे तसेच ग्रहणी या अवयवात बिघाड झाला आहे याची खात्री करून घ्यावी. आमाशयापर्यंत अन्न आले, पण ते अन्न पुढे जाण्याऐवजी उलटी होऊन किंवा वरवर येऊ पाहाते.

अन्न नकोसे होते याचा अर्थ पाचकपित्त प्रमाणाबाहेर वाढले आहे. त्यांची गती ऊध्र्व झालेली आहे किंवा पाचकपित्त कमी झाल्यामुळे कफ वाढून त्या विकृतीमुळेही उलटी, आम्लपित्त या तक्रारी संभवतात. अन्नपच्चनाशयात गेले आहे. पच्चनाशयात प्रवेश झाल्याबरोबर जळजळ, पोटदुखी सुरू झाली असल्यास तेथील पाचकपित्त अधिक प्रमाणात वाढले आहे व ते पचनाचे कार्य न करता अन्य विकृतकार्य करीत आहे असे समजावे. पचनाशयातून अन्न जात असताना करपट, आंबट अशा ढेकरा येत असताना आपण खाल्लेल्या अन्नाचा  तिक्तविपाक झाला आहे (तिक्तविपाक म्हणजे अपेक्षित विपाकात बिघाड झालेला आहे) असे समजावे. कारण आयुर्वेद शास्त्राप्रमाणे खाल्ल्या- प्यायलेल्या अन्नाचे बृहन किंवा कर्षण  असे दोन परिणाम अपेक्षित असतात. येथे अग्नीचे बल कमी पडणे किंवा मलावष्टम, मलावरोध, मलप्रवृत्ती चिकट होणे, घाण वास मारणे, मलप्रवृत्तीस वेळ लागणे, वारंवार मलप्रवृत्तीची भावना होणे, मलप्रवृत्ती पातळ, पसरट, नेमका आकार नसलेली किंवा खडा असलेली होणे अशा नानाविध मलसंबंधी तक्रारी असतात. या तक्रारी म्हणजे अन्य घटकांच्या विकृतींचा परिणाम असतो. मलप्रवृत्ती चिकट, पसरट व सोललेल्या केळ्यासारखी नसणे याचा अर्थ समान अग्नी व ग्रहणी यांचे कार्य बिघडलेले आहे. मलप्रवृत्ती खडा होणे, जोर करावयास लागणे याचा अर्थ वायूतील एकूण रुक्षता वाढली असून अपान वायूची गती मंदावलेली असते. मलप्रवृत्ती वारंवार होणे, एकाच वेळेस मल साफ न होणे, याचा अर्थ पनवाशय, गुदवणे या अवयवांबरोबरच अपान वायूचा प्रकोप म्हणजे त्याचे वातानुमोलन कार्य विकृत झाले आहे असे समजावे. मलप्रवृत्ती करताना गुद कंडू, बारीक कृमी असणे यांना खराब पचन शंकास्पद आहार या कारणांबरोबरच एकूण अग्निमांद्य व पाचक पित्ताचे, समान वायूचे प्रमुख कार्य दुबळे झाल्याचे मानावे. मलप्रवृत्ती लागली पण गेल्यानंतर मलप्रवृत्ती होत नाही याचा अर्थ पक्वाशयाचे मल पुढे ढकलण्याचे कार्य बिघडले आहेच, पण पक्वाशयाचे जुलाब, अतिसार, कॉलरासदृश, वारंवार पोट बिघडविणाऱ्या तक्रारींमध्ये आमाशयातील क्लेदक कफाची वृद्धी यकृत किंवा ग्रहणीचे कार्य मंद झालेले आहे व त्याचबरोबर केव्हा तरी समान व अपान वायूचे एकत्रित कार्य बिघडले आहे याची खात्री बाळगावी.

पचन का बिघडते हे समजण्याकरिता पचनसंस्थेतील विविध घटकांचे, अवयवांचे, स्रोतांचे, आयुर्वेदीय दृष्टीतून कार्य व त्यावरील उपशय -अनुपशयात्मक कल्पना म्हणजे काय हे समजून घ्यायला हवे. त्यातूनच पचन सुधारण्याची दिशा दिसते.

वैद्य प. य. खडीवाले वैद्य – response.lokprabha@expressindia.com