आजारी पडल्यावर डॉक्टरकडे जाऊन धावाधाव करण्यापेक्षा, औषधं रिचवण्यापेक्षा थोडी काळजी आधीच घेतली, काही पथ्यं आपणहून केली तर नंतरच्या अनेक गोष्टी टाळता येतात.

गोंवर कांजिण्या, डांग्या खोकला, उष्णतेची गळवे, . बालविकार

पथ्य :

सुरक्षित व खात्रीचे पाणी. गाईचे दूध.

सुकी चपाती, ज्वारीची भाकरी, नाचणी. भात, ज्वारी किंवा राजगिरा लाह्य़ा, लाह्य़ांचे उकळून पाणी. मुगाचे कढण, धनेसाखर पाणी. भाज्या उकडून घेणे. खात्रीची गोड, गोल आकाराची द्राक्षे, ताडफळ, अंजीर, जुन्या बाराचे मोसंब, वाफारून सफरचंद, कोहळा, डोंगरी आवळा.

काळ्या मनुका, देशी गुलाबाच्या पाकळ्यांचे पाणी, खात्रीचा घरगुती गुलकंद.

पूर्ण विश्रांती, मोकळी पण फार गार नसलेली हवा, पुरेसे कपडे पांघरणे व गार हवेपासून संरक्षण. मफलर, स्कार्फ, रुमाल, .

कुपथ्य :

शंकास्पद पाणी, चहा तीक्ष्ण पेये, कोल्ड्रिंक व फ्रिजमधील पदार्थ, दही, शिळे ताक.

बाजरी, मटकी, भूक नसताना जेवण, फार तेलकट तुपकट व डालडायुक्त मिठाई, फरसाण, बेकरी पदार्थ, आंबवलेले पदार्थ, शिळे अन्न.

टमाटो, काकडी, लसूण, मिरची, हिंग, मोहरी, केळे, अननस, पोपई, संत्रे, शिळी फळे, लिंबू, चिंच, कैरी, लोणचे, पापड, .

कोंदट हवा, अकारण हालचाल व श्रम, जागरण, स्ट्राँग औषधे, घाम काढणारी व ताप उतरवणारी सतत किंवा अ‍ॅन्टिबायोटिक औषधे. पंख्याखाली किंवा वातानुकूलित राहणी. कृत्रिम धाग्याचे कपडे, मशेरी, तंबाखू, टूथपेस्ट, .

अल्पार्तव, अनार्तव, कष्टार्तव

पथ्य:

सुरक्षित पाणी, गाईचे दूध, मध, केळीच्या खुंटाचा रस (वैद्यकीय सल्ल्याने) दही, लिंबू व गरम पाणी.

गहू, टरफलासकट कडधान्ये, विविध कडधान्यांचे उकळून कढण, जुना तांदूळ, ज्वारी, सर्व फळभाज्या, व पालेभाज्या, जेवणानंतर बाळंतशेपा, ओली हळद, पुदिना, आले, लसूण अशी चटणी.

सकाळी रोज एक खारीक खाणे. शक्य असल्यास कोरफडीच्या एका पानाचा गर खाणे. उसाचे तुकडे, पोपई, अननस, डोंगरी आवळा, कोहळा.

माफक प्रमाणात व्यायाम, रात्रौ जेवणानंतर किमान अर्धा तास फिरणे. प्राणायम, दीर्घश्वसन. मोकळ्या हवेत राहणे. मलमूत्र व वायूचे नैसर्गिक वेग वेळच्यावेळी पाळणे. सायंकाळी लवकर जेवण.

कुपथ्य :

शंकास्पद पाणी, दुधाचे जड पदार्थ, चहाकॉफी इ. कृत्रिम पेये, ज्यूस, कोल्डड्रिंक, गव्हाचे फाजील जड पदार्थ, मिठाई, डालडायुक्त पदार्थ, वाटाणा, हरभरा, कदान्न, शिळे अन्न, जेवणावर जेवण, असंतुलित आहार.

बटाटा, कांदा, रताळे, साबुदाणा, चुरमुरे, भडंग, भेळ, मिसळ, फरसाण, बेकरीचे पदार्थ.

मलमूत्र व वायूचे नैसर्गिक वेग अडवणे.

व्यायामाचा अभाव, फाजील श्रम व जेवणाची आबाळ; पुरेशी झोप न मिळणे, दुपारी झोप, रात्रौ जागरण, कोंदट हवा, कमी पोषण, बैठे काम, चिंता, ताणतणाव, मशेरी, तंबाखू, धूम्रपान, मद्यपान.

श्वेत प्रदर, धुपणी, अंगावर पांढरे जाणे, कंबर दुखी, काश्र्य

पथ्य :

सुरक्षित पाणी, दूध, तूप, लोणी, दुधाचे सात्त्विक पदार्थ, नारळपाणी, रात्रभर भिजवलेल्या एक चमच्या जिऱ्याचे पाणी. शतावरीकल्प दुधातून घेणे.

गहू, ज्वारी, उडीद, जुना तांदूळ, टरफलासकट कडधान्ये, मूग, नाचणी.

सर्व फळभाज्या, पालेभाज्या व फळे, आवळा, वेळेवर जेवण, माफक व्यायाम, श्वासन, दीर्घश्वसन, पुरेशी विश्रांती, रात्रौ जेवणानंतर पंधरा मिनिटे फिरणे, वेळेवर झोप.

कुपथ्य :

शंकास्पद पाणी, कृत्रिम पेये, चहा, कॉफी, कोल्डड्रिंक, डालडायुक्त पदार्थ.

जेवणाची आबाळ, उशिरा जेवण, दोन जेवणांत खूप अंतर असणे, कदान्न, फाजील उपवास, भूक मारणे.

फाजील श्रम, चिंता, मानसिक ताणतणाव, बैठे काम, व्यायामाचा अभाव, दुपारी झोप, मलमूत्रांचे वेग आडवणे, मशेरी, तंबाखू, धूम्रपान, मद्यपान.

आर्तवशूल, विटाळाच्या गाठी, कृष्णवर्ण विटाळ

पथ्य :

सुरक्षित पाणी, उकळून गार केलेले ताजे पाणी, गाईचे दूध, ताजे ताक व जिरे, नारळाचे पाणी, जिरेयुक्त तांदळाची पेज, एक चमचा जिरे भिजवून ते पाणी पिणे.

ज्वारी, मूग, सुकी चपाती, जुना तांदूळ, नाचणी, कडधान्यांचे कढण, सर्व फळभाज्या व पालेभाज्या.

वेलची केळे, जुन्या बारीचे मेसंब, अंजीर, ताडफळ, गोड संत्रे, द्राक्षे, आवळा, कोहळा, कोथिंबीर, धने, कमी तिखट असा मसला, मनुका, सुके अंजीर.

वेळेवर जेवण, जेवणांत फार अंतर नको, सायंकाळी जेवणानंतर पंधरा मिनिटे फिरून येणे, रात्रौ लवकर झोप, मलमूत्र व वायूंचे नैसर्गिक वेग पाळणे.

कुपथ्य :

खराब पाणी, फ्रिजचे पाणी व कोल्ड्रिंक, चहा, कॉफी इत्यादी कृत्रिम पेये, शिळे पाणी, दही.

गहू, जडान्न, वाटाणा, हरभरा, उडीद, मटार, मटकी, बेकरी किंवा आंबवलेले पदार्थ, शिळे अन्न, मेवा मिठाई, डालडायुक्त पदार्थ.

बटाटा, रताळे, कांदा, करडई, अंबाडी, अळू, सुकामेवा, केक, खारी बिस्किटे.

कोंदट हवा, व्यायामाचा अभाव, अतिरेकी काम, विश्रांतीचा अभाव, बैठे काम, जागरण, कमी झोप, अवेळी जेवण, अकारण उपासमार, मलमूत्र व वायूंचे वेग अडविणे, मशेरी, धूम्रपान.

वंध्यत्व

पथ्य :

खात्रीचे, सुरक्षित पाणी, गाईचे किंवा म्हशीचे सकस दूध, शेळीचे दूध, लोणी, तूप, मध, दही व मिरपूड, दहीसाखर.

गहू, जुना तांदूळ, ज्वारी, बाजरी, उडीद, हरभरा, वाटाणा, मटार, सोयाबिन, ओट्स, पोहे, शेंगदाणे, खोबरे, डिंक, मनुका, जरदाळू, खारीक.

दुध्याभोपळा, पडवळ, दोडका, टिंडा, परवल, घोसाळे, गाजर, मुळा, सुरण, डोंगरी आवळा, कोहळा शिंगाडय़ाची लापशी, चाकवत, राजगिरा, मेथी, माठ, पालक, कोथिंबीर, आंबा, केळे, चिक्कू, सफरचंद, द्राक्षे, अंजीर, ताडफळी, पेरू.

चांगल्या तुपातील मिठाई, घरगुती स्वरूपाचे अन्य फराळाचे पदर्थ, मोरावण, कोहळे पाक, घरगुती आलेपाक; केमिकलविरहित गूळ.

मोकळ्या हवेच्या घरांत निवास, माफक व्यायाम, वेळेवर जेवण व झोप, रात्रौ जेवणानंतर फिरून येणे. मलमूत्र व वायूचे नैसर्गिक वेग वेळच्यावेळी करावे.

कुपथ्य :

खराब, दूषित व शिळे पाणी, चहा व अन्य कृत्रिम तीक्ष्ण व उष्ण पेये. कोल्डड्रिंक, संकरित असणारी पेये.

मटकी, नाचणी, शेपू, अळू, करडई, अंबाडी, कलिंगड, पोपई, अननस, खूप आंबट, खारट व तिखट पदार्थ, शंकास्पद व शिळे अन्न, बाजरी, फरसाण, मिठाई व बेकरीचे पदार्थ.

कोंदट हवा, व्यायामचा अभाव तसेच अतिरेकी श्रम, खूप वजन उचलणे, अकारण डाएटिंग, चिंता, कुपोषण, मलमूत्रांचे व वायूचे वेग अडवणे, मासिक पाळीच्या काळांतील अस्वच्छता, मासिक पाळी मागेपुढे करण्याकरिता किंवा ऋतूचक्र जाणीवपूर्वक बिघडवणे. गर्भधारणा टाळण्याकरिता वारंवार गोळ्या घेणे. मशेरी, तंबाखू, धूम्रपान, मद्यपान.

अत्यार्तव, मोनोपॉज काळातील त्रास, पांडुता, रक्ताल्पता, रक्तजगुल्म, फायब्रॉईडचा त्रास

पथ्य :

सुरक्षितपाणी, गाईचे दूध, खात्रीचे म्हशीचे दूध, गोड ताजे ताक, नारळ पाणी, चंदन गंध पाणी, जांभूळ आंतरसालीचे गंध, धने पाणी.

ज्वारी, नाचणी, जुना तांदूळ, हातसडीचा तांदूळ, मूग, मुगाची डाळ, भाताच्या राजगिऱ्याच्या, ज्वारीच्या लाह्य़ा. शिंगाडय़ाच्या पिठाची लापशी. दुध्याभोपळ्या, पडवळ, दोडका, टिंडा, परवल, घोसाळे, गाजर, कोहळा, कोथिंबीर, आवळा, राजगिरा, तांबडा माठ, चाकवत, गोड द्राक्षे, अंजीर, ताडफळ, जुन्या बाराचे मोसंबे, काळ्या मनुका, सुके अंजीर, शहाळे, कोवळ्या नाराळाच्या खोबऱ्याचे दूध; केमिकलविरहित गूळ.

मोकळी हवा, पूर्ण विश्रांतीमध्ये पायाखाली दोन उश्या घेऊन झोपून राहणे, वेळेवर पण दोन घास कमी जेवण; अन्नपचन होईल एवढीच शतपावली. शवासन.

कुपथ्य :

खराब व संदिग्ध, शंकास्पद पाणी, शिळे पाणी, चहासारखी तीक्ष्ण उष्ण पेये, दही, खूप गरम पाणी.

गहू, जडान्न, बाजरी, पोहे, चुरमुरे, भडंग, खसखस, तीळ, कारळे, लसूण, पुदिना, आले, मिरी, हिंग, मिरची, लोणचे, पापड, इडली, डोसा इ. आंबवलेले पदार्थ, बेकरीचे पदार्थ, फरसाण, डालडायुक्त पदार्थ. जेवणावर जेवण, मिठाई, खूप गार व खूप चमचमीत पदार्थ.

मेथी, अंबाडी, करडई, पालक, मुळा, शेपू, डिंगऱ्या, सुरण, अननस, पोपई, आंब्याचा अतिरेक, केळे, फळांचे ज्यूस.

मलमूत्र व वायूंचे वेग अडविणे, अतिश्रम, वजन उचलणे, दुपारी झोप, चिंता, मशेरी, तंबाखू, धूम्रपान, मद्यपान.

नेत्रविकार, चिकटा, चिपडे, पाणी येणे, धुरकट दिसणे, मोतीबिंदू, दृष्टिक्षीणता

पथ्य :

उकळून गार केलेले ताजे पाणी, सुरक्षित पाणी, नारळपाण, गाईचे दूध, शेळीचे दूध, गोड ताक, मध.

गहू, ज्वारी, बाजरी, ओटस्, सोयाबीन, टरफलासकट कडधान्ये, पोहे, शेंगदाणे, खोबरे, हिरवे मूग.

सर्व पालेभाज्या, फळभाज्या, फळे, आवळा, आंबा, अंजीर, द्राक्षे, मनुका, सुके अंजीर, चांगल्या तुपातील घरगुती मिठाई, माफक प्रमाणात मसाले व मीठ कमी असे लोणची पापड इ., केमिकलविरहित गूळ.

मोकळी हवा, वेळेवर जेवण व रात्रौ लवकर झोप. डोळ्याचे विशेष व्यायाम, दीर्घश्वसन, प्राणायम, साध्या पाण्याच्या चुळा भरणे, नाकाने पाणी पिणे, स्वच्छ गार पाण्याने वारंवार डोळे धुणे.

कुपथ्य :

शंकास्पद पाणी, फ्रिजमधील पदार्थ, कोल्डड्रिंक, लस्सी, आईस्क्रीम, बर्फ, फाजील चहा, दही.

फाजील तेलतूप असणारे आंबवलेले विविध फरसाण व मिठाईचे पदार्थ, डालडायुक्त पदार्थ, श्रीखंड, बासुंदी, पेढा, बर्फी इ. बेकरीचे पदार्थ.

टमाटो, काकडी यांचा फाजील व नियमित वापर.

केळे, शिकरण, फ्रूट सॅलड, मांसाहार, मसालेयुक्त पदार्थ.

प्रखर ऊन, समोरून येणारे गार वारे, कोंदट हवा, वातानुकूलित राहणी, दुपारी झोप, रात्रौ जागरण, खूप क्लोरिनयुक्त पाणी, दीर्घकाळ टी. व्ही पाहणे, बारीक व अपुऱ्या प्रकाशात वाचन, झोपून वाचन.

प्लॅस्टिक किंवा रबरी चपला, सुरमा किंवा अनावश्यक नेत्रांजने.

मद्यपान, धूम्रपान, मशेरी, तंबाखू.

नेत्रविकार, लाली, आग आग होणे, डोळे जळजळणे, रांजणवाडी, लाल शिरा उठून दिसणे

पथ्य :

सुरक्षित पण गार पाणी, शरद ऋतूतील पाणी, क्लोरिनविरहित पाणी, गाईचे दूध, गोड ताक, नारळपाणी, शहाळे, धनेपाणी, कोकम सरबत.

ज्वारी, सुकी चाती, जुना तांदूळ, नाचणी, सातू, मूग, मुगाची डाळ; भाताच्या, राजगिऱ्याच्या, ज्वारीच्या लाह्य़ा, दुध्या भोपळा, पडवळ, दोडका, टिंडा, परवल, घोसाळे, कोथिंबीर, कोहळा, चाकवत, राजगिरा, तांबडा, माठ, पालक, गोड द्राक्षे, डोंगरी आवळा, जुन्या बाराचे मोसंबे, अंजीर, ताडफळ, पाण्यांत दोन तास भिजवून आंबा खाणे, केमिकलविरहित गूळ.

घरी भाजलेला पावाचा टोस्ट, मनुका, सुके अंजीर, मोरावळा, खात्रीचा घरगुती गुलकंद, वेळेवर जेवण, वेळेवर झोप, आवश्यक तेवढाच माफक व्यायाम, मोकळी हवा, सुती कापडे, डोळ्याला संरक्षण असणे.

कुपथ्य :

गरम पाणी, दूषित पाणी, कृत्रिम पेये, चहा कॉफी, कोल्डड्रिंक, म्हशीचे दूध, दही, फ्रिजमधील पदार्थ. बाजरी, जडान्न, वारंवार जेवण, भूक नसताना जेवण, उडीद, वाटाणा, हरभरा, मटकी, चवळी, पोहे, चुरमुरे, भडंग,

बटाटा, रताळे, मेथी, मुळा, करडई, अंबाडी, डिंगऱ्या, लसूण, पुदिना, आले, मिरची, लोणचे, पापड, हिंग, मोहरी, डालडायुक्त पदार्थ, मिठाई, फरसाण, बेकरीचे व आंबवलेले पदार्थ, लिंबू, चिंच, कैरी, मांसाहार.

खराब हवा, कडक ऊन, अनवाणी चालणे, शिरस्त्राण नसणे, समोरून, जोरदार वारे, कृत्रिम धाग्याचे कपडे, जागरण, दुपारी झोप.

प्लॅस्टिक व रबरी चपला, झोपून, प्रवासात व बारीक वाचन; मद्यपान, धूम्रपान, मशेरी, तंबाखू, तपकीर.

कानाचे विकार, कान वाहणे, रक्त येणे, आवाज येणे, ठणका, कमी ऐकू येणे

पथ्य :

सुरक्षित पाणी, गाईचे दूध, ताक फक्त सकाळी घेणे.

ज्वारी, जुना तांदूळ, हातसडीचा तांदूळ, सुकी चपाती, तांदूळ भाजून भात; भात, ज्वारी व राजगिरा लाह्य़ा; मूग, मुगाची डाळ, नाचणी, सातू.

दुध्या भोपळा, पडवळ, दोडका, टिंडा, परवल, घोसाळे, गाजर, सुरण, कोहळा, कोथिंबीर, आले, पुदिना, डोंगरी आवळा.

राजगिरा, चाकवत, तांबडा माठ, पालक, कोकम, गोड द्राक्षे, आवळा, जुन्या बाराचे मोसंबे, वेलची केळे, ताडफळ, धने, जिरे, शहाळे.

वेळेवर जेवण, वेळेवर झोप, कमी बोलणे, खालच्या पट्टीत बोलणे, माफक व्यायाम, कानाला व डोक्याला वारे लागणार नाही अशी काळजी घेणे, कानांत सतत कापूस, आवश्यक ते शिरस्त्राण.

कुपथ्य :

दही, शंकास्पद, दूध, चहा, तीक्ष्ण पेये, फार थंड पेये, फ्रिजचे पाणी, आइस्क्रीम, लस्सी, बर्फ.

गहू, उडीद, वाटाणा, हरभरा, मटार, पोहे, चुरमुरे, नवीन तांदळाचा भात, शिळे अन्न, भूक नसताना जेवण, जडान्न, बेकरीचे पदार्थ, फरसाण, मिठाई, बटाटा, कांदा, रताळे, हिरव्या सालीचे केळे, चिक्कू, शिकरण, फ्रूट सॅलड, मांसाहार.

गार वारे, खूप उन्हात व अनवाणी हिंडणे, जागरण, दुपारी झोप, डायरेक्ट पंख्याचे वारे, आरडाओरड व रागराग करणे, मलमूत्रांचे वेग आडवणे, कान कोरणे, कानाकरिता खोबरेल तेल वापरणे, मद्यपान, धूम्रपान, मशेरी, तंबाखू, तपकीर इ.