साहित्य : ३ रिकाम्या माचिसच्या डब्या, ४-६ आइस्क्रीमच्या काडय़ा, अ‍ॅक्रिलिक रंग, कार्डपेपर, कात्री, गम, ब्रश, फडकं इत्यादी.
कृती : माचिसच्या डबीतील आतील डब्या काढा व अ‍ॅक्रिलिक रंगात रंगवून वाळवा. डबीच्या बाहेरील बाजूस रंगीत कार्डपेपरमध्ये गुंडाळून व्यवस्थित बंद करा व दोन एका रंगाचे खोके तयार करा. छायाचित्रात दाखविल्याप्रमाणे रिकाम्या डब्या व रंगीत खोक्यांची रचना करून घट्ट चिकटवून वाळू द्या. ४ आइस्क्रीमच्या काडय़ा अ‍ॅक्रिलिक रंगात रंगवा व वाळू द्या. आता या आइस्क्रीमच्या काडय़ांचे घराच्या छप्पर व खांबांप्रमाणे वापर करून डब्यांच्या रचनेला आधारास चिकटवा. आपले जमवलेले छोटे शोभिवंत शंख, शिंपले, वस्तू. खजिन्यातील खडे या शोकेसमध्ये ठेवून सजवा.