साहित्य : दोन वेगवेगळ्या रंगांचे कागद, क्रेयॉन्स, कात्री, गम, पेन्सिल इ. (दोन आकारांचे लहान-मोठे असे कागद), स्केचपेन.
bal04कृती : आकृतीत दाखविल्याप्रमाणे मोठय़ा आकाराच्या कागदाचे तुम्हाला हवे तितके मोठ्ठे घर बनवून घ्या. क्रेयॉन्स व स्केचपेनच्या साहाय्याने खिडक्या, दारे, कौलं, भिंत, इ. काढून रंगवा व आकारामध्ये सुबकपणे कापा. दोन दारांच्या मध्यभागी एका बाजूला बाहेर ठेवून ठकीच्या पाठीला गम लावून चिकटवा. (जसे काही ती दार उघडून आत जातेय असा भास होईल.) घराच्याच आकृतीत पुन्हा छोटय़ा आकाराचे लहान कागद घेऊन घडय़ा घाला. पूर्ण झाल्यानंतर शेवटच्या घडय़ा न उघडता आतमध्ये ढकला. मधली बाजू वर करा (साधारण सोफा किंवा बेंच अशी मांडणी होईल) आणि बंद करून घराच्या आत चिकटवून टाका व सोफ्यासारखी सजावट दिसेल अशा प्रकारे रंगवा. त्याखाली एखादे मांजर दाखवल्यास त्या घराला अधिक शोभा येईल.    
bal01