साहित्य : हँडमेड पेपर, रंगीत कागद, कात्री, गम, क्रेयॉन्स, काळ्या रंगाचे पेन, पेन्सिल, इ.
कृती : हँडमेड पेपर दुमडून अर्धगोलात कापा. साधारण लंबगोल तयार करा. रंगीत कागदावर डोके व पुढचे पाय तसेच शेपूट व मागचे पाय एकसंधपणे कापा. काही लंबगोल आकार पिवळ्या करडय़ा रंगात रंगवा व व्यवस्थित कापा. हँडमेड पेपरच्या गोलाकारात आतील बाजूने पुढील बाजूस डोके व पुढचे पाय तसेच मागील बाजूस शेपूट व मागचे पाय चिकटवून घ्या. क्रेयॉन्सने थोडे थोडे शेडिंग करा. उठावदार दिसण्यासाठी काळ्या पेनाने डोके व नाक रंगवा. झाले आपले कागदी कासव तयार!    
पाऊस
डोळ्यांनी पाहावा
कानांनी ऐकावा तो
पाऊस सखा वाटे
मज बरवा ।।१।।

मृद्गंधातुन
त्यासी हुंगावे
इंद्रधनु मधुनी
रंग पारखावे ।।२।।

homemade mango ice cream recipe
Mango Ice-cream: मुलांसाठी घरच्या घरी बनवा आंब्याचे थंडगार आइस्क्रीम! वापरा फक्त ‘हे’ तीन पदार्थ
jun furniture poster
“या म्हाताऱ्याला अडवूनच दाखवा”; ‘जुनं फर्निचर’ मध्ये मराठी कलाकारांची मांदियाळी, पहिलं पोस्टर प्रदर्शित
How To Make Kharvas At Home With 1 Cup Milk Without Chikacha Dudh
१ वाटी दुधात बनवा विना चिकाचा खरवस; ‘ही’ सिक्रेट पेस्ट वाचवेल वेळ, मास्टरशेफचा स्पर्धक सॅमची रेसिपी, पाहा Video
Ajith Kumar made biryani video viral
बाईकने रोड ट्रिपवर निघालाय सुप्रसिद्ध अभिनेता, कॅम्पमध्ये मित्रांसाठी बनवला खास पदार्थ, व्हिडीओ व्हायरल

कधी त्याची रिपरिप
कधी कोसळे धुव्वाधार
मुले होती चिडीचूप
तरी मनी हर्ष अपार ।। ३।।

पावसाच्या सरीत
होडी ती मुलांची
चाले कशी डौलात
गिरकी घेती आनंदाची ।। ४।।

मुलांना प्रिय पाऊस
भारी होती उतावीळ
चिंब चिंब भिजण्यास
नुरे मग काळ वेळ ।। ५।।

आईचे दटावणे
होई कानाआड
विजेचे कडाडणे
मुले दाराआड ।। ६।।
शैलजा पुरोहित

सर सर सर
सर सर सर
पावसाच्या सरी
आल्या आल्या
हो जमिनीवरी

पानापानांतून
पडतंय पाणी
कोकीळ गाते
मंजूळ गाणी

पानापानांवर
दवांचा मोती
क्षणात येतो
अलगद हाती
झिंबाड पावसाला
येतंय उधाण
पाण्यासंग
हलतंय रान

पाऊस पडतोय
थेंबाथेंबानं
मोर नाचतोय
त्या नादानं
ल्ल दिनेश काळे

रिमझिम पाऊस

रिमझिम पाऊस
रानात पडे
हिरवा हिरवा रंग
पानांना चढे

रिमझिम पाऊस
अंगणात आला
घसरले पाय
हळूचकन चाला

रिमझिम पाऊस
बागेत पडतो
कुंडीतला गुलाब
ओला ओला होतो

रिमझिम पाऊस
गाठतो वाटेत
गावाला जायचे
फसतात बेत
-मुबारक शेख

पावसात
पावसात झाडांखाली
सडे मोत्यांचे
पावसात नदीवर
रांगोळ्या थेंबांच्या

पावसात पिकांमध्ये
लपंडाव पाखरांचा
पावसात रानात
राशी गंधाच्या

पावसात आकाशी
कारंजे मेघांचे
पावसात वाऱ्यावर
सुरावटी गाण्यांच्या
-रा. कों. खेडकर