साहित्य : पातळ पुठ्ठय़ाचा तुकडा, वेगवेगळ्या रंगाचे टिश्यू पेपरचे तुकडे, गम, पट्टी, कात्री.
कृती : पातळ पुठ्ठय़ाचा साडेनऊ  बाय साडेसहा इंचाचा तुकडा घेऊन, तो वरील बाजूने अ‍ॅल्युमिनियम फॉइलने bal01चिकटवून घ्या. रंगीत चिकट पट्टीने किंवा दुसऱ्या कुठल्याही रंगीत पेपरने चारही बाजूंना बॉर्डर करून घ्या. त्यावर लेडी बग, फूल, टेडी बेअर, फुलपाखरू अशा कुठल्याही चित्राची गमने (टूथपिकच्या साहाय्याने) आउट लाइन काढा. चित्रातल्या आतल्या गोष्टींच्या आऊट लाइन्स ग्ल्यूच्या साहाय्याने काढून घ्या. नंतर योग्य त्या रंगाच्या टिश्यू पेपरचे लहान लहान बॉल्स तयार करून ग्ल्यूमधे किंचित बुडवून पुठ्ठय़ावर चित्राच्या आत चिकटवा. संपूर्ण चित्र टिश्यू पेपरच्या बॉल्सनी भरा.