शंख शिंपले, सी स्लग्सनंतर आता या लेखामध्ये आपण मॉलस्क गटातल्या, ऑक्टोपसांविषयी जाणून घेऊ  या. अतिशय घट्ट पकड असणाऱ्या चूषकांनी सज्ज या आठ भुजा, निळ्या रंगाचं रक्त आणि ते शरीरभर फिरवण्याकरिता तीन हृदयं अशा वैशिष्टय़ांकरिता ऑक्टोपस ओळखले जातात. बहुतकरून हे समुद्रतळाशी वावरतात, मात्र काही ऑक्टोपस प्रजाती पाण्याच्या पृष्ठभागाजवळही वावरताना आढळतात.

ऑक्टोपस पक्के शिकारी प्राणी आहेत. ते खेकडे, कोळंबी, शेवंडा म्हणजेच लॉबस्टर्स यांची शिकार करतात. ऑक्टोपसचं भक्ष्य असलेले हे सारेच प्राणी समुद्रामध्ये कपारींमध्ये, छोटय़ा छोटय़ा फटींमध्ये आश्रय घेतात, त्यामुळेच त्यांची शिकार करण्याकरिता उपयुक्त चूषकधारी भुजा उत्क्रांती काळात ऑक्टोपसांमध्ये विकसित झाल्या. या भुजांद्वारे ऑक्टोपस भक्ष्याला पकडतात आणि या आठ भुजांच्या मुळाशी असलेल्या तोंडापर्यंत आणतात. ऑक्टोपसांचं आणखी एक वैशिष्टय़ म्हणजे यांचे जबडे पक्ष्यांच्या चोचीसारखे असतात. या जबडय़ांनी ते भक्ष्याचा चावा घेतात, त्याच्या शरीरामध्ये स्वत:ची विषारी लाळ सोडतात, ज्यामुळे शिकारी प्राणी फार प्रतिकार न करता नियंत्रणात येतो.

Heat Wave, Heat Wave in Maharashtra, Temperatures Soar Beyond 40 Degrees, 40 Degrees Celsius, heat wave, summer, summer news, temperature change, temperature rise, rising temperatures, marathi news,
तापमानाने चाळिशी ओलांडली; राज्याच्या अनेक भागात उष्णतेच्या लाटेचा इशारा
Nashik heat, Temperature Hits New High, 40 Degrees Celsius, nobody on manmad street market, summer, summer news, summer in nashik, heatwave in nashik, heat wave in manmad, manmad news, nashik news,
नाशिक : उंचावणाऱ्या तापमानाने आरोग्याच्या समस्यांमध्ये वाढ, मनमाडमधील रस्त्यांवर असलेला शुकशुकाट
An increase in the price of silver compared to gold
सोन्याच्या तुलनेत चांदीच्या दरात वाढ… हे आहे आजचे दर…
Vasai Virar
शहरबात… वन्यप्राण्यांच्या अधिवासांवर अतिक्रमणाचे परिणाम

ऑक्टोपस हे एकुटवाणे प्राणी आहेत. शार्क, ईल आणि डॉल्फिन यांची शिकार करतात. या भक्ष्यकांना चकवण्याकरिता आणि आपल्या भक्ष्यापासून लपून राहण्याकरिता यांच्याकडे अनेक क्लृप्त्या असतात. रंगानुकूलन घात लावून शिकार करण्याकामी आणि भक्ष्यकांपासून लपून राहण्यात मदत करते. मात्र ऑक्टोपसांची शिकारी प्राण्यापासून स्वत:ला वाचवण्याची लाजवाब शक्कल म्हणजे शाई. शिकाऱ्यांनी पाठलाग केल्यावर किंवा दचकल्यावर हे ऑक्टोपस पळ काढत असतानाच आपल्या शरीरातून काळ्या शाईची एक पिचकारी वेगाने पाण्यात सोडतात. शाईच्या या ढगामुळे शिकारी प्राणी अचंबित होतो. पलीकडचं पाहू शकत नाही, आणि त्या काही क्षणांतच त्याची शिकार धूम ठोकून सुरक्षित जागी पोहोचते किंवा छद्मावरणाचा आधार घेत बेमालूमपणे लपून जाते. या प्राण्यांचं आणखी एक वैशिष्टय़ म्हणजे शिकारी प्राण्यांच्या हल्लय़ामध्ये एखाददोन भुजा तुटल्याच तरी त्या पुन्हा वाढतात; अगदी पालीच्या शेपटीसारख्या. साहजिकच, समरप्रसंगी ऑक्टोपसांच्या जिवावरचं त्यांच्या भुजांवर निभावतं!

ऑक्टोपसची मादी बहुतेकदा २,००,००० ते ४,००,००० अंडी घालते आणि त्यांतून पिलं बाहेर येईतोवर संरक्षण करते. या काळात ती काहीच खात नाही. त्यामुळे साधारणपणे अंडय़ांतून पिलं बाहेर आल्यानंतर ही मादी मरून जाते.

पाण्यामध्ये ऑक्टोपस जेट प्रणोदन किंवा जेट प्रोपल्शनच्या साहाय्याने पोहतात; यांच्या प्रावरांमधून- म्हणजेच मँन्टल्समधून ते जोराने पाणी मागे फेकतात आणि त्यायोगे स्वत:ला पुढे ढकलतात. आकाशात जेट विमान उडतं अगदी त्याचप्रमाणे ऑक्टोपस पाण्यात पोहतात.

ऋषिकेश चव्हाण

rushikesh@wctindia.org

शब्दांकन : श्रीपाद